१९६६ साली आलेल्या अनुपमा सिनेमातील हे गाणे हळूवार शब्दात गुंफले आहे कैफी आझमी यांनी.
संगीत हेमंत कुमार यांचे आणि आवाज लताचा. गाण्याची नायिका सुरेखा पंडीत आणि नायक तरुण बोस आहे.
नवपरीणीत विवाहित जोडी.
एकमेकांच्या प्रेमात बुडालेले दोन जीव.
ती घरी त्याची वाट बघत आहे.त्याचा विवाह जरा उशिरा झालेला. पत्नीवर जीवापाड प्रेम करणारा
तरुण दिवसभराचे काम आटपून घरी येतो.
खोलीच्या दारातच क्षणभर थबकतो. खोलीतून येणारी सुरेल स्वरांची बरसात त्याचे मन भिजवून टाकण्यासाठी पुरेशी आहे.
त्याची घरी परतण्याची वाट बघणाऱ्या पत्नीची तो परतण्याची वेळ झाल्यामुळे ह्दयाची धडकन वाढली आहे.
जरा काही आवाज कानी पडला कि तोच तर नसेल आला ही कल्पना तिच्या ह्दयाचे ठोके वाढत आहे.
आतुरलेल्या मनाची समजूत घालणे तिला अवघड जात आहे.
ती बेकाबु मनाला बजावत आहे.बावरेपणा कमी करायला सांगत आहे. संध्याकाळची वेळ.नायिका तिच्या जोडीदाराची वाट बघत पियानोवर गाणे गात आहे.
गाण्याच्या पहिल्या कडव्यात नायक जरा लांब राहूनच गाण्याचा आस्वाद घेतो आहे.त्याच्या चेहऱ्यावर तिच्याबद्दल वाटणारे प्रेम,कौतुक ओसंडून जात आहे.
दुसऱ्या कडव्यात तिच्या जवळ उभा. त्याला बघितल्यावर तिने गायलेले
रूठके पहले जी भर सताऊँगी मै
जब मनायेंगे वो मान जाऊँगी मै…
प्रेमीजनाच्या अवखळ भावना दाखवून जाते.
धीरे धीरे मचल ऐ दिल-ए-बेक़रार
धीरे धीरे मचल ऐ दिल-ए-बेक़रार
कोई आता है
यूँ तड़प के न तड़पा मुझे बारबार
कोई आता है
मना,एवढा पण आतूर होऊ नकोस. कोणी येत आहे हे खरयं पण म्हणून तू माझी तडफड वाढवू नकोस. तुझी चंचलता जरा कमी कर.
उसके दामन की ख़ुशबू हवाओं में है
उसके कदमों की आहट फ़ज़ाओं में है
उसके दामन की ख़ुशबू हवाओं में है
उसके कदमों की आहट फ़ज़ाओं में है
मुझको करने दे, करने दे सोलासिंगार
त्याचा देहसुगंध हवेत दरवळत आहे.
त्याच्या पावलांची चाहूल ऐकू येत आहे.
त्याच्या स्वागतासाठी मला शृंगार करुन जरा सुंदर बनू दे.
मुझको छुने लगी उसकी परछाइयाँ
दिल के नज़दीक बजती हैं शहनाइयाँ
मुझको छुने लगीं उसकी परछाइयाँ
दिल के नज़दीक बजती हैं शहनाइयाँ
मेरे सपनों के आँगन में गाता है प्यार
कोई आता है
येतच आहे तो.त्याची सावली जणू मला स्पर्श करत आहे .तो येणार या कल्पनेनेच ह्दयाच्या तारा छेडल्या जात आहेत.
माझ्या स्वप्नात केवळ त्याच्या प्रणयाची धून वाजत आहे.
रूठके पहले जी भर सताऊँगी मैं
जब मनाएंगे वो, मान जाऊँगी मैं
रूठके पहले जी भर सताऊँगी मैं
जब मनाएंगे वो, मान जाऊँगी मैं
दिल पे रहता है ऐसे में कब इख्तियार
कोई आता है
तो येणार या कल्पनेने मोहरुन गेलेली मी आधी त्याच्या वर रुसण्याचे नाटक करेन आणि नंतर त्याने मनधरणी केल्यावर रुसवा सोडून देईन.
त्याची वाट बघतांना संयम सुटत चालला. अधीरता वाढत चालली.
‘अनुपमा’ मधील हे गाणे आजही तेवढेच कर्णमधूर आहे.
त्या गाण्यात जोपासलेली हळूवार प्रणयभावना आजही रसिकांना मंत्रमुग्ध करते.
हे गाणे तुम्ही शब्दपर्ण youtube channel – वर ऐकू शकता.
गायिका- मनाली राजाध्यक्ष
व्वा …सुंदर …
छानच, माझे आवडते गाणे