३ अपराधी कोण?
चवथा खून
पोस्टमार्टम रिपोर्ट
दोनच दिवसांनी पुन्हा एक खून झाला.तसाच.कोर्टाने पुराव्याअभावी निर्दोष सोडलेल्या व्यक्तीचा.
उदय नगराळे-सर,तपासाचा वेग वाढवावा लागेल.
भोसले-हो नगराळे.
सर,तुम्हाला नाही वाटत खून करणारी व्यक्ती एकच असेल असे.
नाही.
वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन वेगवेगळ्या व्यक्तींचे खून करणे हे एकाच व्यक्तीचे काम असेल असे वाटत नाही.
पण सर, त्या दिशेने तपास करायला काय हरकत आहे?
नगराळे,घाई करुन केस लवकर उलगडेल असे वाटते का तुम्हाला?
Sorry सर
नगराळे टेंशन घेऊ नका.सोडवू आपण ही केस.
गुन्हेगार तर शोधावा लागेलच.
चला, निघू घरी. नगराळे आज तुमच्या लग्नाचा वाढदिवस आहे.विसरलात का?
नाही सर.मघाशीच सारंगीचा फोन आला लवकर येण्यासाठी.
दोघेही सोबतच निघाले.
तुम्हाला दोघांनाही लग्नवाढदिवसाच्या शुभेच्छा असे म्हणत भोसलेंनी नगराळेचा निरोप घेतला.
नगराळे घरी आले.सारंगी तयार होऊन वाटच बघत होती.
उदय,लग्नापासून वाट बघण्यातच अर्धा वेळ गेला माझा.
तू चुकीचा माणूस निवडला सारंगी. नगराळेनी हसून उत्तर दिले.
माणूस चुकीचा नाही.त्याची नौकरी चुकीची आहे.
सोडू का नौकरी?
मी तर कधीची हेच म्हणत आहे.
पण तू बायको सोडशील नौकरी नाही.मी ओळखते तुला.
नाही ग माझी राणी.दोन्ही मला सारखेच प्रिय आहे.
चला राणीसरकार.
निघूया.कुठे जायचे आज जेवायला?
त्यांना परतायला बराच वेळ झाला.
दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्रात बातमी झळकली
चवथा खून
चार खून होऊनही क्राईम ब्रँच अजून शोध लावू शकले नाही.
भोसले,नगराळेंची वरीष्ठ अधिकाऱ्यांसोबत मिटींग झाली.
वरीष्ठ अधिकाऱ्यांनी भोसलेसरांना फैलावर घेतले.
भोसले,नगराळे तुमचा लौकिक बघून तुम्हाला ही केस सोपविण्यात आली.पंधरा दिवसात तपास लागलाच पाहिजे.
भोसलेसरांनी होकारार्थी मान हलवली.
नगराळे,एकही धागा मिळत नाही आहे.शोध लावायचा कसा?
सर,चार खून झाले.कसून तपास केला तर काहीतरी सापडेलच. खून झालेले चौघेही बलात्काराचा आरोप असलेले होते.म्हणजे खुनी फक्त ज्यांच्यावर बलात्काराचा आरोप आहे त्यांचाच खून करत आहे.
पण ह्या एकाच धाग्यावरुन खुनी पर्यंत पोहचायचे कसे?
सर,पोहचावे तर लागेलच.खुनी शोधूच आपण.पुन्हा सुरुवातीपासून चेक करु सगळे.काहीतरी नक्की सापडेल.
आज चवथा खून ज्याचा झाला त्याचा पोस्टमार्टम रिपोर्ट आला आहे सर.
हो चारही रिपोर्टस् बघितले मी. चोघांनाही वेगवेगळ्या पद्धतीने मारले. त्यामुळे खून करणारे वेगवेगळे असतील असे वाटत आहे.
मध्ये काही दिवस जातात.
क्रमशः
पुढील भाग वाचा खालील लिंकवर https://marathi.shabdaparna. in/४अपराधी-कोण-
प्रिय वाचक,कथामामालिका आवडत असल्यास comment करुन सांगा.
कोण असेल खुनी?
प्रिय वाचक,तुम्हीही तुमचे साहित्य शब्दपर्णवर प्रकाशित करु शकता.
Email
whatsapp no,
9867408400
शब्दपर्णचे इतर साहित्य वाचण्यासाठी फेसबुक पेज अवश्य like,follow करा.
शब्दपर्णवरील इतर साहित्य वाचण्यासाठी खालील लिंक बघा
छान रहस्यकथा