प्रज्ञाच्या डोळ्यांकडे बघत त्याला लक्षात येते की ही रडलेली आहे म्हणून.
प्रमोद – काय झाले?
प्रज्ञा -काही नाही.मयंक होईल का हो बरा ?? असं म्हणत पुन्हा रडू लागते.
प्रमोद-प्रज्ञाचे डोळे हळूवारपणे पूसत..तिला धीर देत हो ….होईल..काळजी करू नको…
प्रज्ञा तूझ्या एक लक्षात आले का गं मयंकच्या बोलण्यात सारखा शेजारील बंद बिल्डिंगचा उल्लेख होत होता.मी आँफीसमध्येही त्याचे एक एक बोलणे आठवत होतो..
प्रज्ञा -हो.तिथं कुणी तरी आहे म्हणतोय.आणि ते त्याला बोलावतय म्हणतो.
प्रमोद -तेच..तर….तेच समजंत नाही.इतक्या वर्षांपासून बंद असलेल्या बिल्डिंगमध्ये कशाला कोण असेल? आणि असेल तर ते आपल्याला का नाही दिसले आजपर्यंत ?
प्रमोद व प्रज्ञा खूप वेळ त्या बंद बिल्डिंगवरून चर्चा करतात.
प्रमोद -प्रज्ञा मी माझ्या एका मित्राशी बोललोय ह्या संदर्भात.त्याचे म्हणणे पडले की तुम्ही स्वतः का नाही जाऊन बघत त्या बिल्डिंग मध्ये.शेजारीच आहे आणि जरी ती बिल्डिंग कुलूपबंद असली तरी कुलूप तोडून आत जाणं फारस कठीण नाहीये.तर मी हाच विचार करतोय की उद्या मी आणि विनोद त्या बिल्डिंगमध्ये जाऊन बघतो काय आहे तिथं म्हणून.
प्रज्ञा-नको नको काही गरज नाहीये.त्या बंद बिल्डिंग मध्ये जायची.आपण बघू दुसरे काय करता येईल ते.
तेवढ्यात विनिता प्रमोद व प्रज्ञाला जेवणासाठी बोलावयला येते.दोघही आपलं बोलणं मध्येच थांबवत खोलीतून बाहेर निघतात .हाँलमध्ये आल्यावर ..
विनिता – प्रज्ञाताई मी मुलांना जेवण भरवलय आणि ती गेलीत त्यांच्या खोलीत झोपायला चला तुम्ही पण खाऊन घ्या थोडं.
प्रज्ञा जेवणासाठी बसणार तोच तिला मयंकची आठवण येते तसेच ताट पुढे सरकवत.
मला नाही जेवायचं..माझ्या मयंकने सकाळपासून अन्नाचा एक कण तर सोड पण पाणी ही पिलेले नाही गं.मला नाही जायचे जेवण.
प्रमोद -प्रज्ञा अगं,अस नको करू.जेवून घे थोडं.मयंक जसा उठेल तसे त्यालाही जेवू घालू.
प्रज्ञा -हो.मग मी त्याच्यासोबतच करेल जेवण.तुम्ही सर्वांनी करून घ्या जेवण.
अस म्हणत प्रज्ञा उठते.आणि मयंकच्या खोलीकडे जाते.मध्येच पुन्हा थांबत म्हणते.
प्रज्ञा -अहो..मी आज मयंकच्या खोलीत झोपतेय.मध्यरात्री तो उठला आणि आणि त्याला काही लागले तर ? एवढं बोलून प्रज्ञा मयंकच्या खोलीत जाते.आणि आतून दरवाजा बंद करून घेते.
विनिता,विनोद,प्रमोद प्रज्ञा त्यांच्या नजरेआड होत नाही तोपर्यंत बघतात कारण प्रज्ञा जेवण न करता उठून जाते.
जेवणं आटोपून विनिता विनोद त्यांच्या खोलीत जातात….तर प्रमोद त्याच्या खोलीकडे जात असतांना मयंकच्या खोलीकडे जातो तर..दरवाजा आतून बंद केलेला त्याला जाणवतो.
.खोलीतले लाईट्स् ही बंद केलेले दिसते.प्रमोद विचार करतो की प्रज्ञाने निदान झिरोचा तरी लाइट लावायला हवा होता..म्हणजे मयंक उठलाच तर अंधारात घाबरणार नाही ह्या विचारात तो त्याच्या खोलीत झोपायला जातो.
इकडे मयंकच्या खोलीत तो बेडवर गाढ झोपलेला असतो..तर प्रज्ञा तिथेच शेजारी एक चटई टाकून त्यावर पडून राहते..प्रज्ञाने जेवण केलेले नसते त्यामुळे उपाशीपोटी तिला झोप येत नाही…..
त्यात सकाळचा मयंक व त्याची ती बोलणी..हे सर्व विचार तिच्या डोक्यात भंडावतात…ती सारखी इकडून तिकडे कूस बदलवत ती झोपण्याचा प्रयत्न करते..मध्येच मयंककडे बघते की त्याची काही हालचाल तर होत नाहीये ना..?
तिचे मनात सर्व विचारांचा एकच कल्लोळ निर्माण होतो.तिची अस्वस्थता वाढते.म्हणून ती उठून थोडं पाणी पिते.पुन्हा झोपण्याचा प्रयत्न करते.
तेवढ्यात तिला कुणी तरी शिटी वाजवल्यासारखी जाणवते.प्रज्ञा विचार करते.कदाचीत हा भास असावा..कारण डोक्यात सतरा विचार चालू होते.म्हणून ती शांत पडून राहते.वर फिरणाऱ्या पंख्याच्या पात्यांकडे एकटक बघत असते.इतक्यात पुन्हा तोच शिटीचा आवाज येतो.तोही एका सुरात..
.शिटीचा सूर हा सुरेल असतो तो शिटी चा सूर तिला खूप स्पष्ट ऐकू येतो.ती विचार करते की एवढ्या रात्री कोण बरं शीटी वाजवत असेल?म्हणून मोबाईलचा टाँर्च सुरू करत तो भिंतीवरील घडाळ्याकडे वळवते आणि वेळ बघते.घडाळ्यात बरोबर बारा वाजलेले असतात.म्हणजे मध्यरात्रच की तिची दुसऱ्यांदा नजर मयंकवर जाते.मयंक झोपलेला असतो.टाँर्च बंद करत ती पुन्हा झोपते
प्रज्ञाचा डोळा लागतो आणि अचानक तिला खिडकी कोणीतरी जोरजोरात ठोठावतो आहे .तो ठोठावण्याचा आवाज कानावर पडताच प्रज्ञा घाबरते.तिच्या तोंडातून शब्दही फूटत नाही.खोलीत अंधार असल्याने खिडकी ठोठावण्याचा फक्त आवाजच ये.कोण असेल इतक्या रात्री? कोणी चोर वगैरे तर नसेल ना..या भितीने तिचा थरकाप होतो.
प्रज्ञाला खूप घाम येतो.साडीच्या पदराने ती थरथरणाऱ्या हाताने घाम पूसते.कोण आहे बाहेर.हे तिला विचारायचे असते…पण तशी तिची हिंमंतच होत नाही.खिडकीचे ठोठावणे हे जरा जोरातच वाढते.तशी तिच्या ह्रदयाची धडधड वाढते कि जो कोणी बाहेर असेल तो खिडकी तोडून आत तर येणार नाही ना!.?काय करा हे तिला सूचेनासे झाले.
प्रज्ञा तशीच भेदरलेल्या अवस्थेत बसून राहली.थोड्याचवेळात
खिडकीचे ठोठावणे कमी कमी होत बंदच झाले तसे प्रज्ञाला हायसे वाटले.पुन्हा पाण्याचा एक घोट घेत ती चटई वर पडते..
प्रज्ञाची अस्वस्थता वाढलेली असते.खूप घाबरलेली असून देखील ती झोपण्याचा पुन्हा प्रयत्न करते तशी थंड हवेचे झुळूक खोलीत शिरते.प्रज्ञाला तो हवेतला गारवा हवाहवासा वाटायला लागतो.त्यामुळे तिला आलेला घाम हा केव्हाच नाहीसा होतो.
इतक्यात एक खूप संथ आणि हळू आवाज तिच्या कानावर पडतो….
मयंक..ऐ मयंक….ये ना…..बाहेर….चल …..ये वर….काल आला होता…त्याच ठिकाणी ये.
आता मात्र प्रज्ञा ताडकनं उठून उभी राहली. घाबरण्याऐवजी मी अशी ताडकन कशी काय उठली.हे तिला स्वतःलाच समजलं नाही.तिने मयंक कडे बघितले तर तो …झोपलेला
पुन्हा….शूक…शूक..आणि टाळ्यांचा आवाज आला.
मयंक..ऐ मयंक ये ना..बाहेर.
क्रमशः
पोर्णिमा शिंपी
https://marathi.shabdaparna.in/७
आमची कथा आवडल्यास नक्की like आणि share करा.
वाचकहो तुम्हीही तुमचे लिखाण शब्दपर्णवर प्रकाशित करु शकता.
थरार
भयंकर कथा.
भिती उत्सुकता कायम.
थरारक
Wah