प्रचिती- प्रवासकथा
प्रचिती- प्रवासकथा

प्रचिती- प्रवासकथा

नमस्कार.
मी सौ. सरिता विलास बायस्कर आपल्याला एक माझा आयुष्यात घडलेली सत्य घटना सांगते .म्हणतात ना की चांगुलपणा आणि माणुसकी यावर जगरहाटी सुरू आहे ती खरी गोष्ट आहे. अजूनही जगात चांगली माणसे बऱ्याच प्रमाणात आहे म्हणूनच माणुसकी जिवंत आहे.
9,, वर्षापूर्वीची गोष्ट सांगते तुम्हाला ,सत्य घटना आहे ही.माझा सोबत घडलेली. मी ,माझे यजमान आम्ही नाशिकला कामानिमित्त गेलो होतो.
खूप आवश्यक काम होतं आणि फक्त दोन दिवसाचाच अवधी होता.
आम्ही दिवसभर आमची कामं आटोपली, पण निघे निघे पर्यत रात्र झाली. नऊ वाजले असतील पण माझ्या यजमानांना दुसरे दिवशी सकाळी दहा वाजता एक आवश्यक मिटिंग होती, त्यामुळे आम्हाला रात्रीच गावी परतणे गरजेचे होते.आम्ही नऊ वाजता कार मध्ये बसलो आणि गावा बाहेर पडलो. एक दोन तासाचा प्रवास झाला असेल.अकरा वाजायला आले होते आणि आम्हाला भूक लागली म्हणून एक हॉटेल पाहून आम्ही ड्रायव्हरला गाडी थांबवायला लावली.
हॉटेलच्या आत गेलो. गेल्याबरोबर उजवीकडच्या टेबलवर दोन नवीन जोडपी बसले होते.त्यांच्यामध्ये एक गोड गोंडस लहान मुलगी होती जणू काही बाहुलीच. तिची माझी नजरानजर झाली. ती बाहुली गोड हसली मी पण हसले आणि तिला हात दाखवून पुढे जाऊन मी टेबलवर बसले. जेवण केले. जेवता जेवता बरेचदा त्या मुलीकडे लक्ष जायचं माझं आणि मी हसायचे.

एकमेकास आम्ही थोडे चिडवलं पण ,आणि जेवण आटपून बाहेर येता येता, त्यांचा टेबल जवळ मी थांबले ,बाहुलीला स्पर्श करत तिच्या आईशी बोलले ,
“”फार गोड आहे हो तुमची मुलगी, किती बोलके डोळे ,अतिशय कमी वेळात लळा लावला , खूप खेळावेसे वाटत आहे तिच्याशी पण वेळ नाही. खूप खूप आशीर्वाद आहे तुमच्या मुलीला माझे.
तिची आई गोड हसली. म्हणाली

अतिशय खोडकर पण आहे बरं .मी म्हटलं ,असणारच चंचल दिसते .काळजी घ्या हं तिची.
आणि आम्ही निघालो .
गार वारं सुटलं होतं ,आणि जेवण झालं असल्यामुळे थोडा जीव पेंगला होता, थोडेच अंतर गेल्यावर धडाम असा आवाज झाला. मी म्हटले ,
काय झाले?
ड्रायव्हर म्हणाला चाकावर ची धातूची गणगडी उडून गेली बहुतेक.त्याचा आवाज असावा .

हळू चालव बाबा गाडी.आपल्याला हळूहळू जायचं आहे.काही घाई नाही आहे .
परत प्रवास सुरू झाला गाडीत झोप येऊ नये म्हणून जुनी मुकेश ची गाणी लावली होती.माझा जीव जरा पेंगला होता. दिवसभर दगदग झाली होती म्हणून मागच्या सीट वर मी एकटी असल्याने डोक्याखाली कुशन घेऊन लवंडले.बहूतेक मी झोपी गेले.थोड्यावेळाने एक जोरदार धक्का लागला.आणि माझा डोळा उघडला , पाहते तर काय ,मी दोन्ही सीटच्या मध्ये पडलेले आणि समोरची सीट ,जिथे माझे यजमान बसले होते, त्या खिडकी ची काच पूर्ण फुटलेली.मला काही सुचतच नव्हतं.मी मोठ्याने ओरडले.
अहो
माझा आवाज हवेतच विरला जणू. कुणीच ओ देईना.मी घाबरले ,अपघात झाला बहुतेक, हिमतीने उठण्याचा प्रयत्न केला त उभे राहता येईना.दोन्ही पाय शरीराचं वजन पेलवत नव्हते.मी हिमतीने मोठ्याने आवाज दिला. माझा आवाज ऐकून माझे यजमान धावत माझ्या दिशेने आले.आणि मला हाताने आधार दिला. म्हणाले
घाबरू नको.अपघात झाला आहे पण लागलं नाही कुणाला.तुला नाही ना लागले कुठे?दुखतय का ?
मी स्वतःला चाचपडू लागले कुठे लागले तर नाही आहे मला.मी त्यांना विचारले,
ड्रायव्हर कुठे आहे?
ते म्हणाले

तो पण बरा आहे. त्याला पण नाही लागले पण गाडीचा खूप अपघात झाला. एकीकडे गाडी पूर्ण ठेचल्या गेली

.मी जरा उठण्याचा प्रयत्न केला.पण शक्य झाले नाही .उभी राहिले की माझे दोन्ही पाय निर्जीव वाटत होते आणि मी पडायचे. यांच्या लक्षात आले ही फार घाबरली आहे.मला उलटी झाली.माझा सारखा तोल जात होता.तेवढ्यात आमच्या जवळ अपघाताच्या ठिकाणी एक कार येऊन थांबली.आणि त्यातून उतरून जे आमच्या दिशेने आले ते त्या हॉटेलमध्ये भेट झालेलं जोडपं होते. त्यांनी आमची चौकशी केली .आम्हाला धीर दिला. मला त्या मुलीने आधार दिला. त्यांच्या गाडीत आम्हाला बसवले .म्हणाले

काका काकू घाबरू नका ,

दुसरे जोडपं त्यांची मुलगी कडेवर झोपून गेली होती ,तिला घेऊन लांब उभा राहून आम्हाला पाहत होत, रात्रीचे तीन वाजता ची वेळ होती.त्यांनी त्या वेळेचा विचार न करता आमच्या साठी म्हणून थांबून आम्हाला एवढ्या रात्रीची मदत केली फार मोठी गोष्ट वाटते मला ही. त्यांनी त्या तुटक्या आमच्या छोट्या गाडीत दोघी पोरींना बसवलं आणि त्यांच्या गाडीतुन आम्हाला खामगावला सोडवायला आले. आज ही गोष्ट जेव्हा मला आठवते तेव्हा इतकं धन्य वाटतं.
किती चांगली माणस आहेत जगात. त्यांनी त्या वेळेची काळजी नाही केली आणि एवढ्या लहान मुलीला घेऊन आम्हाला मदत करायला म्हणून रात्रीचे थांबले.त्यांना देवानेच पाठवलं होतं आम्हाला सोडल्यावर ते परत गेले. आम्ही कृतकृत्य झालो. खूप आभार मानले त्यांचे.
मला तर जणू शुद्धच नव्हती पण मला ते सारं सारं आठवतं. मला खूप खूप त्यांचे आभार मानावे वाटतात. अशा चांगल्या माणसांमुळेच नियतीचा कारभार चालू आहे. चांगुलपणा अजूनही जिवंत आहे.चांगली माणसे कुठली वेळ माणसे कोणती काही काही पाहत नाही कोणाला मदत करण्यासाठी त्या दिवशी पासून माणुसकीवर माझा विश्वास दृढ झाला आहे आणि चांगुलपणा हा अजूनही जिवंत आहे याची खात्री पटली आहे .तेव्हा मी पण या दिशेने खूप प्रयत्न करत असते जेव्हा केव्हा मला संधी मिळाली कि मी ज्याला जशी हवी असेल तशी मदत करते. कारण हा गुण देवाने दिलेला आहे.

आपल्याला प्रतिध्वनी प्रमाणे आपण दिलेले आपल्याजवळ वापस येत म्हणून चांगले द्यावे. चांगलीच परत फेड मिळते. जे द्यावे तेच घ्यावे

मी हा अनुभव YOU TUBE वर SHARE केला आहे त्यासाठी कृपया खालील लिंक बघा.

https://youtu.be/Mix2ga8Y0Ks

धन्यवाद

@$

8 Comments

Comments are closed.

error: Content is protected !!