जावेद उर्वशीला फोन करु कि नको याच संभ्रमात होता. फोन केला तर काय बोलू? तिचे सांत्वन कसे करु?
अखेर न राहवून जावेदने उर्वशीला फोन केला.
हॕलो,कोण?
उर्वशीने विचारले.
किती वर्षांनी जावेदने तिचा आवाज ऐकला.आवाजाने ह्दयाची धडधड वाढली.
पण मन सुखावले.
मी मी जावेद.
त्याने मी म्हणताक्षणी उर्वशीने त्याचा आवाज ओळखला.
जावेदशी ओळख,जावेदवरचे प्रेम आणि तिने केलेली जावेदची फसवणूक. हे सगळे चित्रवत् तिच्या डोळ्यासमोर उभे राहिले.
उर्वशीचा स्वतःच्या कानावर विश्वासच बसला नाही.भास झाला असेल ? तिने परत विचारले
कोण?
समोरुन तेच उत्तर आले
‘जावेद’.
जावेद-ज्याच्याशिवाय ती कधीही सुखी राहू शकली नाही.पण त्याचा फोन आल्यावर काय बोलावे सुचत नव्हते.
दोघांनाही एकमेकांशी खूप बोलायचे होते.पण उर्वशी
नाही बोलू शकली काही.तिने फोन ठेवला.
जावेद कसा असेल? एव्हाना मला विसरून पुढे गेला असेल.माझा नंबर कोणी दिला असेल?
आई
मोहीतच्या आवाजाने ती भानावर आली.
उर्वशी गोंधळली होती.
जावेद? कुठे असेल?
जावेदने एवढे वर्ष काबूत ठेवलेले मन आज बंड करत होते. ऊर्वशीशिवाय सध्या मनात काहीच नव्हते.
वंदनाताईंची तब्येत आता ठीक झाली होती.
आज बऱ्याच दिवसांनी त्या बँकेत आल्या.
जावेदला आज पहिल्यांदा बँकेत त्यांना बघून आनंद झाला.
सुंदर कथा