समाजसेवेचे बीज -marathistory
समाजसेवेचे बीज -marathistory

समाजसेवेचे बीज -marathistory

समाजसेवेचे बीज -marathistory

मध्यरात्रीच्या वेळी पोटात दुखत असल्यामुळे जुई एकदम झोपेतून जागी होवून अंथरूणावर उठून बसली. बाहेर सर्वत्र काळोख पसरला होता….. नुकताच तर नववा महिना लागला आणि डाॅक्टरने दिलेल्या तारखेनुसार बाळंतपणास अजून काही दिवस अवकाश होता .

“मग वेळेआधीच असं का बरं पोटात दुखायला लागलं…?”

जुई विचारात पडली. उठून तांब्यातील थोडंस पाणी पिले त्यामुळे तिला थोडं बरं वाटलं आणि ती परत अंथरूणावर अंग टाकून झोपण्याचा प्रयत्न करू लागली. पण दुखणं कमी होण्याऐवजी हळूहळू वाढतच चालले होते. असह्य वेदनेने विव्हळत तिने विचार केला.

” उठवाव का कोणाला..?पण आता एवढ्या रात्री उशिरा….डॉक्टरकडे कसं जायचं…..? बघू…. सकाळपर्यंत थोडी वाट….हळूहळू आराम पडला तर ठीक….. आई बाजूलाच तर झोपली आहे. देऊ आवाज नंतर….”

बाबा नौकरीच्या निमित्ताने बाहेर गावी राहत होते.गावतल्या घरी फक्त लहान भाऊ ,आई आणि ती असे तिघेजण राहत होते. छोटं गाव असल्यामुळे गावात पाहिजे तशा सुखसोयी नव्हत्या. अगदी छोट्या छोट्या कामासाठी गावकर्यांना नेहमी तालुक्याच्या ठिकाणी जावं लागत होत. तालुक्याचे ठिकाण गावापासून पस्तीस ते चाळीस किलोमीटर अंतरावर असल्याने तेथे जाण्यासाठी जवळपास पाऊण तास तरी लागतच असे. आणि राहत्या गावात तर एवढ्या रात्री-अपरात्री वाहन मिळणे फारच कठीण होते. म्हणून सर्व सारासार गोष्टींचा विचार करून जुईला बाळंतपणासाठी तालुक्याच्या गावी ठेवायचे निश्चित करण्यात आले होते. ठरल्या नुसार तिथे राहण्यासाठी दवाखान्या जवळच एक खोलीसुध्दा भाड्याने घेऊन ठेवली होती. जुईची तगमग अजूनच वाढत होती . आता तर आईला तर उठवल्याशिवाय पर्यायच नाही म्हणून तिने शेजारी झोपलेल्या आईला जागे करून आपल्या पोटात दुखत असल्याचे सांगितलं आई म्हणाली ,

“अगं आता तर तुला नववा महिना लागला…… डॉक्टरने बाळंतपणासाठी दिलेल्या तारखेनुसार बरेच दिवस अवकाश आहे अजून..आत्ताच कसं काय दुखतं आहे….? “

” मला या क्षणाला काय करावे काही सुचेनासे झाले बघ….”

आई एकदम गोंधळून गेली . तेवढ्यात तिला बाजूच्या काकूंची आठवण झाली जास्त वेळ न घालवता आईने लगेच नितीनला उठवून टॅक्सी बोलवायला सांगितल. आणि बाहेर जाऊन दार ठोठावत शेजारच्या काकू ला आवाज दिला.

” काकू….”

“काय झालं ग ?एवढ्या रात्री….”

दार उघडून काकूने विचारले

“हो काकू जुईला त्रास सुरू झाला आहे… मला तर काही समजत नाही आहे येता का घरी लवकर…?मदत होईल मला”

” हो आलेच…तु हो पुढे…”

असे म्हणत काकूने दरवाज्याला कडी लावली. आणि लगबगीने आई पाठोपाठ घरात आल्या. इकडे नितीन टॅक्सी आणायला घराबाहेर पडला.

पण..अवघ्या पंधरा सोळा वर्षाचा नितीन तर त्यावेळी अगदीच भांबावून गेला होता. एवढ्या रात्री त्याला काही सुचत नव्हते.

रात्रीची निरव शांतता.. सुनसान रस्ते ..चौफेर गडद अंधार .. अशा परिस्थितीत वाहन कुठे मिळेल . वाहन शोधण्यासाठी तो खूप वेळ पर्यंत फिरला .अखेर निराश होऊन घराकडे परतत असताना त्याच्या एकदम लक्षात आले की

“सावंत काका कडे गाडी आहे.

ते नक्कीच आपल्याला मदत करतील…”

म्हणून तो त्यांच्या कडे जाण्यास निघाला. त्याने सावंत काकाला सर्व परिस्थिती सांगितली.

“गाडीची मदत मिळेल का “?

म्हणून विचारले .

” हो… नक्की का नाही….आलोच हं एक मिनिट थांब…..”

असे म्हणून घरात जाऊन तयार होऊन काका गाडीची चावी घेऊन आले. गाडी काढत ते म्हणाले

“अरे !नितीन घाबरू नको….काही काळजीचे कारण नाही चल मी आहे ना सोबत.. .आपण ताईला लवकरच दवाखान्यात नेऊ” “

घरासमोर गाडी आणून त्यांच्या गाडीतून एवढ्या रात्री ताईला दवाखान्यात घेऊन गेले आई आणि काकू नितीन सोबत होत्या . ताईची हालत तर खूप खराब झाली होती. तिला वेळीच औषधोपचार मिळाल्याने ती सावरली डॉक्टर म्हणाले…

“बरं झालं तुम्ही तिला अगदी वेळेत आणले म्हणुन धोका टळला…

सावंत काकांनी घाबरलेल्या नितीनच्या पाठीवरून हात फिरवला ..नितीन दोन्ही हात जोडत वेळेवर मदत केल्यामुळे काकाला म्हणाला..

” मला तुमचे कोणत्या शब्दात आभार मानावे. खरं तर काहीच कळत नाही आहे….बरं ..झालं तुम्ही वेळेवर मदतीसाठी आला नाही तर आज काही खरे नव्हते…”

काका म्हणाले,

“अरे !नितीन.. मी माझे कर्तव्य केले .मला माहित आहे आपल्या गावांमध्ये कुठली च सुविधा नाही म्हणून त्यामुळे तर आधी पासून ठरवले. की आपल्याकडून लोकांना होईल तितकी मदत करायची एक खरं सांगू का नितीन….त्यांच्या गरजेनुसार योग्य ती मदत करणे मलाही अगदी मनापासून आवडते….. म्हणूनच तर %E

One comment

Comments are closed.

error: Content is protected !!