मुलांना तयार करून सपना स्वयंपाकाच्या तयारीला लागली….. दुसऱ्या शेगडीवर चहाचे आधण टाकून
ओसरीत पेपर वाचत बसलेल्या सासऱ्यांना ती आतूनच म्हणाली,
“मामाजी….घरातील सर्व कामे आटोपून आज शेताकडे एक चक्कर टाकून येईन म्हणते…..”
“का ग…? शाळा नाही का आज….?”
पेपर वाचता वाचता सासर्यांनी विचारले.
“नाही…. रजा घेतली आज मामाजी…..”
“ठीक आहे….. ये मग शेतीकडे जाऊन…..”
तसेही माझ्या पायाला मार लागल्याने मी बऱ्याच दिवसांपासून शेती कडे गेलोच नाही..”
“म्हणून च म्हणते आज तिकडे जाऊन यावं”
बोलत बोलत तिने मुलांचे टिफीन भरून त्यांना शाळेत पाठविले .. आणि मामाजीला चहा-नाष्टा आणून दिला.
“दिनू नाही उठला का ग अजून…..?”
“केव्हाच उठलेत देवळात जाऊन येतो म्हणाले…..येतीलच एव्हढ्यात….”
“त्याला ही ने सोबतीला….”
तुला थ़ोडी मदत ही होईल…’
“काही फायदा नाही… तुम्हाला तर माहिती आहे त्यांचा स्वभाव.!!
तसेही सुट्टी घेतली आज त्यांनी आॕफीसमधून घरी राहू द्या…. तुम्हाला सोबत राहील…. मी जाऊन येते लवकरच…..”
किती गुणी आणि सोशिक आहे माझी सून
मामा जी म्हणजे दिनू चे वडील विचार करु लागले.
नौकरी करून घरकाम पोरं ..बाळ सांभाळताना किती धावपळ होते.
तरीही जीवाची पर्वा न करता
“सर्व जबाबदारी अगदी व्यवस्थितपणे सांभाळते…
खरंच..!!! किती नशीबवान आहे मी….अशी गुणी सून नशीबाने च मिळते….सतत घरच्यांसाठी झिजणं आणि त्यांची काळजी करणं एवढेच तिला माहिती…
माझ्या दिनूला ऐनवेळी हिने जर सांभाळले नसते तर आज काय अवस्था झाली असती कोणास ठाऊक..?? सपना माझ्या घरात सून म्हणून आली तो दिवस अगदी आपल्याला अनपेक्षित होता…”
दिनू चे लग्न होणार म्हणून दिनू ची आई किती उत्साहाने सगळीकडे वावरत होती. लग्नाचा दिवस उजाडला. दिनू नवरदेव बनून घोड्यावर बसून मंडपात आला. फटाक्याची आतिशबाजी होऊन. बँडबाजे नवरदेवाच्या स्वागतासाठी सज्ज झाले. अचानक फटाक्याचा मोठा आवाज झाल्याने . नवरदेवाचा घोडा एका एकीचं बिथरला. नवरदेव फिट येऊन घोड्यावरून खाली पडला.. डोळे पांढरे करून, तोंडातून फेस बाहेर येऊ लागला. आजूबाजूचे वर्हाडी लोक हे सगळ विचित्र दृश्य पाहून घाबरून गेले. नवरीचे आई वडीलांना बातमी दिली.ते तर नवरदेवाचा अवतार पाहून एकदमच गोंधळली.
नवऱ्या मुलीने तर ऐनवेळी मागचा-पुढचा विचार न करता ताबडतोब लग्नाला नकार दिला. त्यादिवशी दिनूच्या वडिलांनी नवरी कडच्या लोकांची किती विनवणी केली .
“आम्ही आमच्या मुलाला फिटा येतात.याची पूर्वकल्पना तुम्हाला दिली होती… तुमच्या पासून काही सत्य लपवलेले नाही… तुम्हाला विश्वासात घेऊन च हे लग्न ठरवलं होत. तेव्हा तुम्ही लग्नाला स्वखुशीने होकार पण दिला आता …अशी वेळेवर माघार घेवू नका… एवढा सगळा खर्च लावला वेळेवर एवढी फजिती .काय कराव ..कोण लग्नाला तयार होईल….??”
“हो…आम्ही होकार दिला होता… पण नवरी मुलगी लग्नाला आता वेळेवर नकार देत आहे. तयार नाही तिचे म्हणणे आहे की अशा बिमार माणसासोबत तिला तिचे पूर्ण आयुष्य काढणं शक्य नाही.माफ करा .. शेवटी तिच्याही आयुष्याचा प्रश्र्न , तिची मर्जी .. आम्ही तिला जबरदस्ती करणार नाही.
नाईलाज आहे आमचा..
आणि असं म्हणून ते तिथून निघून गेले. दिनू चे बाबा अगदी च हतबल झाले . आणि आई तर जागेवर च खिळली तिच्या तोंडातून शब्द ही बाहेर पडत नव्हता .
आता आपल्या दिनू चे .. लग्न होणार की नाही त्याचे पुढील भवितव्य काय ..? कोणा कोणाला आता कसं तोंड द्याव?”
हळूहळू एकेका नातेवाईक मंडळी वेळ पाहून मंडपातून काढता पाय घेऊ लागली .
दिनूला आपण अगदी तळहातावरच्या फोडाप्रमाणे लहानपणापासून जपले आता त्याचे भविष्य काय…??? त्याला या पुढे कोण सांभाळणार..?? या चिंतेतच दिनू चे वडील
घेरी येवून पडणार.. तोच प्रसंगावधान राखत
त्यांच्या लहान बहिणीने समोर येऊन त्यांना तातडीने सावरले आणि म्हणाली.
..दादा
“मी आहे ना ..
तुझ्या सोबत
तुला मी असं कधीच हरू देणार नाही.ऊठ
“काही काळजी करू नको
.आपल्या दिनूचे याच मंडपात लग्न होईल मंडपातून सूनबाई घेऊनच आता घरी जा….”
माझी पाठ ची बहिण हिम्मत मला देत म्हणाली.
“कोण करील माझ्या दिनू शी लग्न….??? एवढं सगळं घडल्यावर…?”
“आहे माझ्या पाहणीत एक मुलगी.. ती दिनूला अगदी आनंदाने जीवन साथी म्हणून स्वीकारील…”
असे म्हणून तिने तिच्या मागे उभ्या असलेल्या आपल्या मुलीला सपनाला हाताला धरून त्यांच्या समोर उभे केले..
“ही बघ ती मुलगी
माझी सपना … ”
“सपना अगं तू ?
हो मामा मीच..
“मी करील दिनूशी अगदी स्वखुशीने लग्न… तुम्ही काळजी करू नका… मी त्याला आयुष्यभराची साथ देईन आपुलकी ने सांभाळेल….”
“अग…पण तुला माहित आहे ना दिनू ची परिस्थिती…??
तू तर एवढी शिकलेली, नोकरी करणारी, तुझी स्वप्न किती मोठी आहेत…तू सांभाळशील माझ्या दिनूला…???देशील त्याला आयुष्यभराची साथ…??”
“हो मामा…. अगदी आनंदाने..!! तुम्ही बिलकुल काळजी करू नका…
मामा तुम्हाला आठवते….?? उन्हाळ्याच्या सुट्टीत मी जेव्हा-जेव्हा तुमच्या घरी यायचे, तेव्हा- तेव्हा दिनू, मी आणि शेजारचे मुलं एकत्र खेळायचो….दिनूला कोणी चिडवले किंवा सतावले की तेव्हा त्याची बाजू घेत मी सर्वांना भांडत होते.. …
त्याला कधी एकटे पडू देत नव्हते…. मग तुम्हीच तर म्हणत होते ना..,
“की सपना आली की माझा दिनू कधी एकटा पडत नाही…. ती त्याच्या सोबतीला सतत उभी असते…”
आणि मामी तुम्हाला आठवते..???”
ती वळून मामीला म्हणाली,
“एक दिवस तुमचं खूप डोकं दुखत होतं तेव्हा दिनू अगदी भुकेने व्याकूळ झाला होता… आई मला जेवायला दे….आई मला जेवायला दे…म्हणून अगदीच हट्टी पणाला पेटला होता….तेव्हा तुम्ही किती काळजीत होता तो उपाशी आहे म्हणून मग मीच तर तेव्हा त्याला माझ्या हाताने पोळी ..भाजी करून खायला दिली …. आणि तो शांत झाला होता…… तुम्ही तेव्हा गंमतीत म्हटल्याही होत्या की ..
“बरे झाले बाई …तू आहे म्हणून मला कसली च काळजी नाही माझ्या दिनूला तू किती छान सांभाळते…. मला तुझ्यासारखीच गुणी सून मिळाली पाहिजे करशील माझ्या दिनू शी च लग्न….”
तेव्हा मीही म्हटले होते…
हो ..का नाही करणार.. मी तेव्हाच मनोमनी दिनू ला स्विकारले होते. तुम्ही विसरला असाल पण मी तेव्हाच बोल विसरले नाही…..
…. ज्या मामाने माझ्या आईला तिच्या पडत्या काळात कधीही एकट सोडलं नाही…. तिच्या पाठीशी सतत हिंमतीने उभे राहिले तिला काय हवं नको याचा विचार सतत केला …त्यांना त्यांच्या अशा अवघड परिस्थितीमध्ये मी कसं बरं एकट पडू देईन…???मी तुमच्या दिनूचा हात आनंदाने हाती घेईल…. दिनूला मी अगदी लहानपणापासून ओळखते….. त्याचे औषध-पाणी, त्याची तब्येत सर्व मला माहित आहे. … मी असताना तुम्ही कसलीही काळजी करायची नाही आणि खचून तर मुळीच जायच नाही…… मला जीवन साथी म्हणून दिनूची साथ द्यायला अगदीच मनापासून आवडेल……”
मला आशिर्वाद द्या..
असे म्हणून मामाच्या पाया पडली….. मामाने दिनू चा हात तिच्या हाती आनंदाने दिला .आणि दोघांनाही देवासमोर जोडीने पाया पडण्यासाठी नेऊन आशीर्वाद घेतला….आणि सपना ने दिनूशी लग्न करून विश्वासाने त्याचा हात धरून आपल्या घराचे माप ओलांडून लक्ष्मीच्या पावलांनी घरी प्रवेश केला …. त्या क्षणापासून तिने या घरासाठी स्वतः चे समर्पण केले…. दिनूला अगदी आनंदाने स्वीकारले…त्याला औषध, पाणी, खाणेपिणे वेळेवर मिळू लागले… त्यामुळे त्याच्या तब्येतीत हळूहळू सुधारणा होऊ लागली…
नशीबच माझ्या दिनूचे… एवढी संस्कारी, गुणी बायको मिळाली.
खरच सपनाने त्यादिवशी तिच्या स्वप्नांचे समर्पण.. केले नसते …
तर माझ्या दिनूची आज कायॽ अवस्था झाली असती ही कल्पनाही दिनू च्या वडीलांना करवत नव्हती……
…..दर्शना भुरे जैन….
वाहवा
सुंदर
सुंदर लिखाण
छान लिहिली ग कथा,
स्री चे रुप आगळे.
खूप छान