हरवलेले संवाद-मराठी लेख
ऊठ रे बाळा,
कधीचा अलार्म वाजतोय. आजही कालच्यासारखी बस मिस् झाली तर तुला सोडायला शाळेत, मग घरी येऊन आॕफिसमध्ये उशिरा जाणे. बाॕसची बोलणी ऐकणे.
नको रे बा रोज रोज तेच.ऊठ लवकर.
जा पटापट बाथरुमध्ये ब्रश कर,
अदिती आज लवकर येतो आॕफिसमधून घरी.
तू तयार राहा. निल्याकडे पार्टी आहे आज त्याच्या
वाढदिवसाची.
तू आॕफिसमधून येतांना गिफ्ट आणतेस का?
तेच ग एक दुकान आहे ना तुझ्या आॕफिसजवळ.तिथून.
ए शेखर आज उशिरा येतोस का आॕफिसमधून?
माझ्या मैत्रिणी येणार आहेत घरी.आपल्या घरी कराओके वर गाणी म्हणायची आहे.खूप दिवसांपासून मागे लागल्या होत्या.उद्या सुट्टी आहे म्हणून आजचे ठरविले.
मधुरा तुला आमचा दहावीचा गृप माहित आहे नं .
whatsapp गृप ग. रविवारी आमचे गेटटुगेदर ठरले आहे. खूप वर्षांनी भेटणार आम्ही एकमेकांना. धमाल करु. रविवारची काही कामे असतिल तर आजच सांग.
सुधा पियुषला फोन केला का ग? आज परिक्षा आहे ना त्याची.सकाळीच उठवायला सांगितले होते त्याने.
तो उठला नाही तर होस्टेलवरच्या त्याच्या मित्राला फोन करायला सांगितले त्याने.
गुंजन, अरे कितीदा सांगितले लग्नाच्या वाढदिवसाला ज्यांना बोलवायचे त्यांची लिस्ट बनव म्हणून. एकही काम वेळेवर नाही बघ तुझे.मग ऐनवेळी धावाधाव करायची. तू असाच आहेस आधीपासून. मी घाई करते तर माझ्यावरच ओरडतोस.
पंचवीस वर्षांपासून सुधरवायचा प्रयत्न करते पण…
जाऊ दे.आता मीच बनवते लिस्ट.
लग्नाचा वाढदिवस होईस्तोवर मी न भांडायचे ठरविले आहे. मुले पण मलाच म्हणतात’
आई तू बाबाला किती बोलतेस?
शु….हळू बोल. ऐकतील ना सगळे.
कुठे भेटायचे उद्या.तिथे नाही रे. खूप गर्दी असते तिथे. धड काही बोलता येत नाही. मागे भेटलो तिथेच भेटू या.
मला उशीर होईल रे जरा यायला.
ए रागावू नकोस रे.
मी येत तर आहे ना भेटायला.
बरं.बरं. रोज भेटूया आपण.चल…बाय…
सुमेध जरा मोठा हाॕल बघ.हजार तरी माणसे राहतील आपली.घरचे पहिले कार्य आहे. सगळ्यांना बोलवावे लागेल. हाॕल,जेवणाची व्यवस्था…सगळे तुला बघायचे आहे. घरी पाहूण्यांची सोय करायला कुणाचे रिकाणमे फ्लॕट बघावे लागतील.
अग,पिंकीची शाॕपिंग आटोपली ना सगळी.ती जे म्हणते ते सगळे घेऊ दे तिला. काही कमी करु नकोस.नाही तुला आपली एकेका पैशांकडे बघायची सय आहै ना म्हणून सांगतोय.आपली लेक आनंदी बनून गेली पाहिजे घरातून.
अहो, जरा आपल्या सुपुत्राला फोन करा बरं. कुठे हुंदडतोय मित्रांसोबत विचारा त्याला.रोज जेवायला त्याच्यामुळे उशीर होतोय. दिवसरात्र मित्र मित्र.
आपल्यासोबत बोलायला वेळ नसतो त्याला.सिनेमे मित्रांसोबत,नाटक मित्रांसोबत.एखाद्या दिवशी हाॕटेलमध्ये जेवायला चल म्हंटले तर आपल्यासोबत नाही.तेही मित्रांसोबत.नातेवाईकांच्या घरी जाणे नाही येणे नाही.तुमच्या लाडामुळे वाया गेला तो. मी रागवते तर मग वाईट मीच होते.
हॕलो.हॕलो
चिन्मय अरे कधीची फोन लावतेयं. किती दारु ढोसणार अजून? मित्र भेटले रे भेटले कि बहकतोच तू.
ये ना घरी लवकर. उद्या आॕफिसमध्ये महत्वाची मीटींग आहे ना तुझी.मित्र भेटले कि सगळेच विसरतोस तू.
घड्याळात बघ जरा किती वाजले ते. नुसता वैताग आणला बघ तुझ्या मित्रांनी…..
ए आई मलाच काय नेहमी ओरडतेस ग उशिरा येण्यावरुन.तो दादा बघ अजून आला नाही. त्याला काही बोलत नाही तू तो मोठा आहे म्हणून.
अहो,नवीन नाटक आले.उद्याची तिकिटे आणा.
किती दिवसात नाटक,सिनेमा नाही कि फिरायला जाणे नाही.किती अरसिक हो तुम्ही.
बहोत दिन हो गये.चल यार अभी आज मिलही लेते श्यामको. तू पुँछ सबको……
प्रत्येक घर या संवादांना मुकले आहे. घरे वाट बघतायेत कधी माणसे एकमेकांशी असे संवाद साधतील….
कधी येणार ते दिवस……
प्रिय वाचक,तुम्हीही तुमचे साहित्य शब्दपर्णवर प्रकाशित करु शकता.
Email
शब्दपर्णचे इतर साहित्य वाचण्यासाठी फेसबुक पेज अवश्य like,follow करा.
शब्दपर्णवरील इतर साहित्य वाचण्यासाठी खालील लिंक बघा
Chan 🌹
सुंदर