Ghanan Ghanan-घनन घनन -लगान
ब्रिटिशांचे आपल्या देशात राज्य होते तेव्हाच्या एका खेड्यातील चंपानेरमधली ही कथा.
चंपानेर नावाचे खेडे.पावसाचा दुष्काळ आणि इग्रजांना द्यावा लागणारा’लगान’ यामुळे त्रस्त झालेले गावकरी.
पावसाकडे सगळेजण डोळे लावून बसतात.
अशातच आभाळात काळे काळे ढग जमा व्यायला लागतात.आभाळात ढगांची झालेली गर्दी बघून चंपानेरमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण होते.
आभाळात दिसणारे ढग पाऊस पाडणारच असा विश्वास वाटणारे गावकरी पावसाचा उत्सव साजरा करतात.त्याच्या स्वागताची तयारी करतात. तहानलेल्या चंपानेरची तृष्णा भागेल,पावसामुळे पीक येणार,सरकारला लगान देवू शकणार….अशा आशा त्यांच्या मनात निर्माण होतात,
आता मेघाने पाऊस लवकर पाठवावा अशी त्याला आळवणी करतात,
अविनाश गोवारीकरने दिग्दर्शित केलेल्या भव्य,दर्जेदार,प्रेक्षकांना शेवटपर्यंत गुंतवून ठेवणाऱ्या मि.परफेक्शनिस्ट आमिर खान आणि टीमच्या लगान सिनेमातील हे गीत.
जावेद अख्तने लिहेलेल्या शब्दांना A,R, रहेमानचे संगीत.
घनन घनन….सुरुवातच उत्साहाने भारलेली आहे.
घनन-घनन घिर घिर आये बदरा
घन घनघोर कारे छाये बदरा
धमक-धमक गूँजे बदरा के डंके
चमक-चमक देखो बिजुरिया चमके
मन धड़काये बदरवा, मन धड़काये बदरवा
मन-मन धड़काये बदरवा
काले मेघा, काले मेघा, पानी तो बरसाओ
बिजुरी की तलवार नहीं, बूँदों के बान चलाओ
मेघा छाये, बरखा लाये
घिर-घिर आये, घिर के आये
कहे ये मन मचल-मचल, न यूँ चल सम्भल-सम्भल
गये दिन बदल, तू घर से निकल
बरसने वाल है अब अमृत जल
दुविधा के दिन बीत गये, भईया मल्हार सुनाओ
घनन-घनन घिर-घिर…
रस अगर बरसेगा, कौन फिर तरसेगा
कोयलिया गायेगी बैठेगी मुण्डेरों पर
जो पंछी गायेंगे, नये दिन आयेंगे
उजाले मुस्कुरा देंगे अंधेरों पर
प्रेम की बरखा में भीगे-भीगे तनमन
धरती पे देखेंगे पानी का दरपन
जईओ तुम जहाँ-जहाँ, देखियो वहाँ-वहाँ
यही इक समाँ कि धरती यहाँ
है पहने सात रंगों की चूनरिया
घनन-घनन घिर-घिर…
पेड़ों पर झूले डालो और ऊँची पेंद बढ़ाओ
काले मेघा, काले मेघा…
आई है रुत मतवाली, बिछाने हरियाली
ये अपने संग में लाई है सावन को
ये बिजुरी की पायल, ये बादल का आँचल
सजाने लाई है धरती की दुल्हन को
डाली-डाली पहनेगी फूलों के कंगन
सुख अब बरसेगा आँगन-आँगन
खिलेगी अब कली-कली, हँसेगी अब गली-गली
हवा जो चली, तो रुत लगी भली
जला दे जो तन-मन वो धूप ढली
काले मेघा, काले मेघा…
काळे मेघ आभाळात जमा झाले.त्या काळ्याकुट्ट ढगांमुळे सगळीकडे अंधार पसरला.एखाद्या विजयी लढवय्यासारखे ढग गर्जना करत आहेत.आणि विज चमकून त्यांना साथ देत आहे.हे काळे मेघ बरसणार की नाही….ह्दयाची धडधड वाढली आहे.
गर्जना करणाऱ्या मेघा आता तुझी गर्जना थांबव आणि तुझे जलकुंभ रिते कर.विजा चमकवणे बंद करुन पाऊसधारा बरसव.
मेघ दाटले कि पाऊस येतोच.आम्हाला आता हर्षउल्हासात नाचू दे गाऊ दे.माझे मन सांगत आहे आता पाऊस येणार आम्ही काळजीमुक्त होणार.निराशेची सावली आता संपली.दिवस बदलले. आता आपण उत्सव साजरा करु.
प्रकाश अंधारावर मात करुन हसेल सगळ्यांनी बाहेर या.मेघ आता अमृतजल पाठवणार.
तुझ्या जलधारांनी आम्हाला स्पर्श केला तर सर्वत्र आनंदच पसरेल.आमचे तनमन आनंदात न्हावून निघेल.कोकीळेचे कुहू कुहू स्वर कानाला तृप्त करतील.सगळे पक्षी आनंदात गातील.प्रकाश अंधारावर मात करुन हसेल
प्रेमवर्षावात तन,मन न्हहातील.पाणी जमा होऊन आरसा तयार होईल आपले आनंदी प्रतिबिंब दिसेल. सात रंगाचे इंद्रधनुष्य तू पाऊसधारा पाठवतोस तेव्हाच दिसते.
हिरव्या झाडांच्या फांद्यांना झोपाळा बांधून उंच झुला झुलण्याची हीच वेळ आहे.काळ्या मेघा पाठव तुझ्या जलधारा.आम्ही वाट बघतोय.
आला.ज्याची आससून वाट बघत होतो तो दिवस आला.मेघा तू पाठवलेला पाऊस आता सगळीकडे हिरवाईने सजवेल.धरेला नवरीचे रुप देण्यासाठी विजेची पायल , पावसाचा पदर,झाडाझाडांवर फुलांच्या बांगड्या पाठवेल.
आता सगळीकडे सुख नांदेल.सुखा समाधानाचे हसू सगळ्या चेहऱ्यावर विलसेल.
कळ्या उमलतील
वाराही वाहतांना आनंद पसरवेल.
अंगाची लाही लाही करणारे उन्हं आता मावळतीला लागले.
मेघांनी नभात गर्दी केली.पाऊस आता येणारच.यावेळी ढग दगा देणार नाही या विश्वासाने गावकरी आनंदात रममाण होतात पण हा आनंद क्षणापुरताच उरतो.आशेला लावणारे ढग पुन्हा एकदा दगा देवून पसार होतात.पुन्हा सगळ्यांच्या चेहऱ्यावर काळजी पसरते. पुन्हा चिंतेची काळोखी सर्वत्र दाटते .मेघोत्सव साजरा करायला एकत्र आलेले सगळेजण निराश होऊन एकेकटे परततात.
घनन-घनन घिर घिर आये बदरा
उदित नारायण,अलका याज्ञिक,सुखाविंदर सिंग,शंकर महादेवन,शान,किशोरी गोवारीकर यांनी गायलेले गीत.याच्यावर सगळ्यांनी केलेले नृत्यही तोडीस तोड आहे.ग्रेसी सिंगचे नृत्य ग्रेसफुल आहे.कोरियोग्राफार राजू खानची कोरियोग्राफी लोकनृत्याला साजेशी आहे.
पावसाचे महत्व पटवणारे हे गीत,त्याचे शब्द,संगीत,सूर सगळेच मनात रुजून बसणारे,आपल्यालाही प्रार्थना करायला लावणारे
काले मेघा, काले मेघा, पानी तो बरसाओ
प्रिय वाचक,श्रावणधारांनी धरा चिंब झाली की आनंदोत्सव सुरु होतो.अशा रम्य पावासाळी वातावरणात तुम्हालाही काही पाऊसगाणी आठवत असतील….पाठवा तर मग पावासाळी गीताचे रसग्रहण
शब्दपर्णचे इतर साहित्य वाचण्यासाठी फेसबुक पेज अवश्य like,follow करा.
शब्दपर्णवरील इतर साहित्य वाचण्यासाठी खालील लिंक बघा











खुप छान
Wah wah
खुप सुंदर लिहिले
शब्द धारांनी ओथंबलेले रसग्रहण
अप्रतिम