प्रसन्न पहाट ….. रजनीच्या साखरमिठीतून अलगद स्वतःला सोडवत ..निसर्गाच जाग होणं…प्रणयी प्राजक्ताचं निर्लेप पणे अंगणात सुवासिक सडा घालून रित होणं..पक्ष्यांचा किलबिलाट …उगवतीच कोवळ ऊन, पहाट वाहती च शहारलेलं वारं …राऊळी घंटारव,वासुदेवा ची स्वारी सर्व सर्व कस उमेद जागवणारं हर्षोल्लासित करणारं .. पहाट म्हंटले कि….
“””अरुणिम आभा आच्छादित
अलौकिक आसमंत आकारला
अधिपति आदित्य अवतरला
अवनी अणु रेणु आल्हादला”“”
अशीच घुंघरवाळी पहाट चित्रवत साकारणारी बरीच गाणी केली आहेत संगीतकारांनी …जी मनाला भावली आणि मनात विसावली ही ….त्यातील मनात घर करणार एक अत्यंत मधुर गाणं ……
भीनी भीनी भोर भोर आयी
पात पात पर चमके सोना
स्वर्ण कलश छलकाती आई””
1987 साली ” दिलपडोसी है ” नावाचा अल्बम आला होता .सारी सुमधुर गीते होती त्यात…शब्दसम्राट “गुलजार” ह्यांनी मनभावन अश्या ओळी बांधल्या होत्या , संगीत आर.डी बर्मन (पंचमदा)ह्यांच होत …विशेष वाखाणण्या जोग अस कि ही गाणी पंचमदांनी त्यांचा “बाज”सोडून निराळ्या धरतीची केली होती ..,
“भीनी भीनी भोर आई”ह्या गाण्यात तबला….सितार ..गिटार बासरी किंचितभास व्हावा अस संतुर .. वापरुन सुंदर सुगंधी पहाट रंगवली होती…. वैविध्य गुण ल्यायलेला आवाज…(ज्याला आपसुकच भावने चा स्पर्श आहे ..).अर्थातच “आशा ताई” चा वापरला .ज्यांनी आपल्या मखमली आवाजाच्या लकबींनी अलंकारित करुन ह्या गाण्याला”अमूल्य ठेवा” ही उपमा बहाल केली…या त्रिकुटाच हे लाजवाब देणं श्रोत्यांच्या प्रचंड पसंतीस उतरल…..
गाणं गावा कडील प्रसन्न पहाट रंगवणार …प्रथम गोधन प्रस्थान त्यांच्या आवाज ,पक्ष्यांची किलबिल ,तानपूरा, स्वरमंडल , संतुरचा भास ,सगळ सगळं सुरात वाजत आशाताईंचा भरभक्कम “षडज “लाऊन घेतलेला आलाप
“दिनमणी ला दिलेली हाकच”” असावी ती….तोडी रागाचं स्वरुप
दाखवून “भीनी “सा प “स्वरसंगती लेऊन सर्व वाद्यांसमवेत गाण सुरु होत …दशदिशा झंकारुन येतात असा रिदम वाजतो.
वाटत जणू आसमंती केशर उधळत ” लोहगोल “अवतरला.
परागमिश्रीत समीर गंध लेऊन पहाट उगवली.प्रचीप्रांत रविकिरणांनी सुशोभित झाला .सोनेरी आभा सर्वत्र व्यापली..उषाराणी सोळाश्रांगार करुन नभमंडपी अवलोकन करत सोन्याचा कलश लेउन जणू सुवर्ण आभा भूलोकी शिंपडत आहे..सुहासिक सकाल सोहळा संपन्न होत आहे…
“””माथे सुनहरी टिका लगाए
पातपात पर गोटा लगाए
सात रंग की चाईआई”“””
नभांगणी उगवलेला सूर्य असा जाणवतो कि जणू अंबरभाळी पवित्र् टिळाच लावला आहे … वृक्षवल्लरी ची पाणे किरणप्रकाशे अशी तेजाळत आहे जणू काही सोनेरी मुलामा देऊन अलंकारिक केली आहे.
नियती सप्त रंगांनी आच्छादली मनोहारी झाली..पहाट सुगंधी वाऱ्यासमवेत आनंद लहर घेऊन थिरकत आली…
ओस धुले मुख पोछे सारे”
आँगन लेप गई उजियारे
जागो जगर की बेला आई आई”
जसजस आदित्य सर्वस्व कवेत घेत आहे तसतसे वातावरण बदलत आहे .पानाफूलांवर विसावलेली दव मौक्तिके विरघळत आहे .निर्मळ आणि स्वच्छ होतो आहे आसमंत … .. राम प्रहरी दिनक्रम आखत अंगणी सडासमार्जन करुन प्रभे च स्वागत करण्या ललना शुचिर्भूत होत आहे …
चैतन्याच दान लेण्या, नारायणा च्या स्वारीस सकळजन पाचारण करीत आहे…सकलांनी दिवसप्रवासी व्हाव..जागे होऊन उमेदीच्या प्रवासाला निघाव . दरवळीचा साज लेऊन उषा सुंदरी अवतरली आहे…
ह्या गाण्यात आशा ताईंनी सुरेख सरगम गातांना ” प” टाळलाय ..फारच सुरेल नी लोभस वाटत ते ऐकायला …
माझ्या मनी अधिराज्य करणार,हे गाण आपणा सर्वांना ही भुरळ घालेल ही अपेक्षा …..
सौ.सरिता विलास बायस्कर











निरतिशय सुंदर रसग्रहण
अतिशय सुंदर रसग्रहण
खूपच ..सुंदर ..
खुपच सुंदर
खूप मस्त ….
अप्रतिम 👌
खूप मस्त
Sundar