१५-सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या-बेजबाबदार पियूष
Written by-ज्योती रामटेके
राधा येऊन आठ दिवस झाले. शेवटी ती खेडे सोडून शहरात आलीच. कमी भाडे हवे म्हणून गावाच्या बाहेर घर बघितले पियूषने. हल्ली पियूषचे राधाकडे जाणे.. येणे वाढले होते.
जाण्यासाठी काहीतरी कारणे राहायची. नवीन गाव,ओळख नाही. त्यांना तरी कोण आहे आपल्याशिवाय असे चंदनाला वाटायचे.
खर्च वाढला होता. मुले मोठी होत होती. चंदना अधेमध्ये काॅलेज करायची.
सासु.. सासरे दर महिन्याला मोजकी रक्कम देत होते.आईची मदत होतीच.चंदनाच्या कपड्यांची जबाबदारी आईने घेतली होती. बहीण भाऊ आपल्या संसारात गुंग होते. चंदना भावाची लाडकी बहीण होती. भाऊ वेळ काढून तिची सतत चौकशी करायचा.
आता दुकानाचा विषय काढला कि पियूष तो विषय टाळायला लागला. दुकान टाकायला दिलेले पैसे कुठे आहेत? तिने विचारले तर चिडला.
बाबांनी विश्वासाने दिले होते पैसे.पियूष या पैशाचा योग्य वापर करून, प्रगती करेल व समोर जाईल अशी आशा होती त्यांना.
दिवस चालले होते. चंदनाची रोजची दगदग सुरू होती.
दिवस उजाडला कि मुलांची तयारी, त्यांचा डबा करुन देणे
शाळेचा अभ्यास सर्व काही तिला बघावे लागत होते. आधी तरी पियूष मदत करायचा पण हल्ली त्याचे घरात लक्ष नसते. त्याच्यातला बदल आई सोडून सर्वांना दिसत होता.
तो आता खूप बदलला होता. घरात आले कि कुणाशी बोलायचा नाही. चंदनापासून दूरदूर राहायचा. तिला तर कळतच नव्हते. तिला तर हेच कळत नव्हते कि नेमके झाले काय? माझ्या कडून नकळत काही चुक झाली असेल का? काय चुकले असेल माझे? आज घरी आले कि माफी मागून मोकळी होते. हा अबोला आता सहन नाही होत आहे. या आधी साधे भांडण नाही झाले, आणि आता हे काय नवीनच. सध्या दुकानाचा विषय राहू देते. बघू नंतर.
आयुष्यात मी भरपूर मेहनत करेल,पण हा दुरावा नको आता. नेहमीप्रमाणे आज दुपारी चंदनाची आई आली. दोघी बाजारात गेल्या. नेहमीप्रमाणे तिने चंदनावर भरपूर खर्च केला. स्वतः काही घेत नव्हती.तिला मात्र छानछान कपडे घेऊन द्यायची.
चंदना नेहमी म्हणायची.. किती करते ग आई, माझ्यासाठी.
आई हसायची, चंदना सर्व ठिक होईल बेटा.. धीर ठेव.
मी आहे ना तुझ्या पाठीशी. पियूषचा स्वभाव का बदलत आहे हे नाही कळत आहे. मनासारखी शेती नाही पिकत आहे. खर्च वाढला समोर कसे होईल याची काळजी करत असतील ते. तू काळजी नको करु आम्ही सदैव तुझ्या बरोबर आहोत. मुले बघ किती गोड आहेत.जावई पण गुणाचा आहे ग. कधी.. कधी मेहनत करुन सुध्दा यश मिळत नाही.
आता नव्या जोमाने कामाला लागा.
हो..ग.. आई तु काळजी नको करु.
चल येते मी, आई घरी गेली. चंदना पियूषची वाट बघू लागली. तेवढ्यात नमु आली. वहिनी.. काय सुरु आहे ?
या नमुताई.. चंदनाचे आवाज दिला. तुमच्या भावाची वाट बघत आहे. आजकाल घरी येत नाहीत वेळेवर. सारखी चिडचिड सुरू असते आजकाल.या पूर्वी असे कधी घडले नाही. काय झाले असेल ? तुमच्या सोबत काही बोलले का?. अहो वहिनी किती टेंशन घेता. काही गोष्टी काळावर सोडून द्यायला हव्यात. थोडे कामाचे टेंशन आले असेल त्याला.
बघा आला दादा. काय रे दादा घरी लवकर येत जा. मुले.. वहिनी वाट बघत असतात तुझी. हल्ली काय झाले तुला.
किती बदल झाला तुझ्यात.वेळेवर घरी येणारा तू आता कधीही घरी येतो. नेहमी वेळेचे भान राखणारा माझा दादा का असा वागत आहे हेच कळत नाही आहे.
वहिनीला किती त्रास होतो कळत नाही का दादा?
सर्व जबाबदारी तिच्यावर टाकून तू बेजबाबदार झाला आहेस.
का असा वागतोस कळत नाही आहे. काय झाले ते तरी सांग. वहिनीला सांग.असी बायको मिळायला नशीब लागते.
वहिनी किती समजदार आहेत.
तो काहीच बोलला नाही. झोपून गेला. किती निर्ढावलेला वाटत आहे दादा नमु मनात बोलली. वहिनी येते मी..
बघू उद्या. नवीन दिवस उजाडला.
सकाळ झाली. चंदनाची गडबड सुरू झाली.आजकाल ती पियूषच्या कलाकलाने घेत होती. तसेही लग्न झाल्यापासून त्याच्या मर्जीनुसार चंदना वागायची. तिला स्वतःचे असे अस्तित्व नव्हतेच. एखाद्या वेलीसारखी पियूषच्या आधाराने जगत होती ती. आता तो आधार निसटून जाते कि काय असे तिच्या मनात येत होते.आई बाबाला त्रास नको म्हणून नेहमी आंनदी राहण्याचा प्रयत्न करायची चंदना.
आपले दुःख आपणच सहन करायचे उगाचच प्रदर्शन कशाला मांडायचे. कुठेतरी स्वतः गुंतले कि बरे होईल असे तिला वाटायला लागले. राधा राहायला आल्यापासून घरी आली नव्हती. चंदनाला पण वेळ मिळत नव्हता. आता तिला पोळ्या बनवून दे असा सर्वानी आग्रह केला. हळूहळू
ते तिला जमले. मुले सांभाळून तिचे पोळ्या बनवून देणे सुरू होते. पियूषची व्यथा कधी कळेल यांची ती वाट बघू लागली.
क्रमशः
पुढील भाग वाचा खालील लिंकवर
https://marathi.shabdaparna.in/सुन्या
https://marathi.shabdaparna.in/२-सुन्या
https://marathi.shabdaparna.in/३-सुन्या-सुन्या-मैफिलीत
https://marathi.shabdaparna.in/४सुन्या
https://marathi.shabdaparna.
https://marathi.shabdaparna.in/६-सुन्या
https://marathi.shabdaparna.in/७-सुन्या
https://marathi.shabdaparna.in/८-सुन्
https://marathi.shabdaparna.in/९सुन्या
https://marathi.shabdaparna.in/१०-सुन्या
https://marathi.shabdaparna.in/११सुन्या
https://marathi.shabdaparna.in/१२-सुन्या
https://marathi.shabdaparna.in/१३-सुन्या
कशी वाटत आहे कथामालिका…अवश्य कळवा.
प्रिय वाचक,तुम्हीही लघूकथा,कथामालिका,लेख,रसग्रहण शब्दपर्णवर प्रकाशित करु शकता.








Khup chhan katha
कथा आवडत आहे.. पुढे काय आता?
कथेला वळण
छान कथा