१७-हरवून गेल्या जाणिवा
सौ. दर्शना भुरे.
लाडक्या वैकुंठा च्या कांताप्रसाद च्या अंतिम इच्छेनुसार लावून दिलेल्या लग्नाला घरातील मंडळींनी समजून घेवून मान्यता दिली…
पुढे..
वैकुच्या सासर चे देवकार्य आटोपले..
वैकुला तर सासरी अजिबात करमत नव्हते.. प्रमिला तिची मैत्रीण तिची नणंद ती पण लग्न होऊन गेली होती.
प्रमिला शिवाय बाकी लोकांना ती सासरी फारसे ओळखत नव्हती..
विनायकाची काकू तिच्या सोबत होती. तिची काळजी घेत होती. तिला हवे नक़ो पाहत होती. पण तरीही नवीन लोकांत, नवीन घरात तिला एकटे एकटे वाटत होते.
तिला तिचे आई आबा काका काकू घरातील इतर सर्वजण आठवत होते.
तिला तिच्या आईला भेटायचे होते. तिच्या भावंडांसोबत खेळायला परत तिच्या घरी यायचे होते
वैकुंठा शिवाय तिच्या भावंडांना घर कसे सुने सुने वाटत होते. ती सारखी वैकुची आठवण काढीत होती.
घरी सगळ्यांना तिची आठवण येत होती.
लग्नाला दोन दिवस झाले ..
विमलने तर वैकुंठाला आणण्यासाठी … जवळ जवळ नवऱ्याकडे हट्टच धरला होता.
तिच्या शिवाय घरही शांत झाले होते.घरालाही तिच्याशिवाय करमत नव्हते.
पण अप्पासाहेबांचा निरोप आल्याशिवाय तिच्या सासरी जाणे मधुकरराव ला योग्य वाटत नव्हते..
घरचे सगळे विमलला समजवू लागले……
विमल वैकु आता परकी झाली…
अहो नऊ वर्षाची पोर ती परकी कशी होणार….म्हणत विमल
रडायला लागली..एवढे दिवस दाबलेले दुःख ,अश्रू बाहेर पडत होते.
विमल ताई आवरा स्वत:ला
कांता आवंढा गिळत म्हणाली..
घरची बाकी लोक हतबल होऊन तिच्या कडे बघत राहले.
वैकुला परतणीला घेऊन जाण्यासाठी अजून पर्यंत अप्पासाहेबांनी निरोप कसा धाडला नाही..
कांताप्रसादची तब्येत…तिकडे सर्व सुरळीत असेल ना? शेतीच्या लागवडीसाठी बी बियाणे खरेदी करून झाले होते.. पावसा पाण्याचे दिवस होते..
आप्पासहेबांचा वैकुसाठी चा निरोप मिळण्यापूर्वी ..
उद्याच्या शनिवारी, रविवारी दोन दिवसांत..
शेतातील पेरणी उरकून घेण्याचा मधुकररावने विचार केला.
त्यानुसार पेरणीसाठी मजूरांना उद्यासाठी बोलावले पण धाडले.
सकाळ पासूनच सुरू असलेल्या पावसाने आतापर्यंत चांगलाच जोर धरला होता..
असाच पाऊस उद्या चालू राहिला तर उद्याची कामे लांबणीवर पडेल.. याची त्यांना चिंता लागून राहिली होती. चिंते चिंतेत च मधुकरराव ने अख्खी रात्र काढली… सकाळी जरा डोळ्याला लागला तर वैकुंठा च्या सासर हून त्यांचा गडी कांताप्रसाद गेल्याचा निरोप घेऊन आला होता म्हणून विमलने त्यांना जागे केले.
सकाळीच एकदम अचानक असा निरोप मिळाल्याने ते गडबडून गेले..त्यांना काहीच सुचत नव्हते.. आज मजूरही बोलावले होते.. पण आजचे हातात घेतलेली कामे तसेच सोडून वैकुंठा च्या सासरी ताबडतोब निघावे लागणार होते.
तू इकडची काळजी करू नको मी घेईल सर्व सांभाळून नर्मदा ताईंनी असा धीर दिल्यावर त्यांना बरे वाटले..
विमल तर सोबत होतीच.. पण त्यांनी त्यांच्या सोबतीसाठी केशव आणि कांताला तयारी करण्यास सांगितली.. आंघोळी वगैरे आटोपून चहापाणी घेऊन ती सर्व निघाली..
रामूची फार वाट न पाहता दारात बांधलेल्या बैलजोडी ला गाडीला जुंपून केशवने स्वत: बैलगाडी हाकायला घेतली..ते चौघे वैकुंठा च्या गावी निघाले..
आभाळ होते.पावसाने पण विश्रांती घेतली होती.
वैकुंठाला परतणीसाठी घेऊन यायचा निरोप मिळण्याऐवजी.. दादासाहेब गेल्याचा निरोप मिळाला..
विमला वैकुंठा ची चिंता सतवत होती… कशी असेल माझी लेक.. तिचे लग्न जमल्यापासून एक एक संकटच मागे लागले ..तिला तर कोणी दोषी ठरवेत नसेल ना? वैकुंठाच्या काळजी ने सकाळचा चहा ही तिने न पिता.. तसाच झाकून ठेवला होता.
कांताची सोबत तिला थोडी हिम्मत देत होती.. घरातून बाहेर निघताना जरा वेळ विश्रांती घेतलेल्या पावसाने एव्हाना बरसायला सुरूवात केली होती.. फाट्यावर पोहचेपर्यंत डोक्यावर छत्री धरुन ही बैलगाडी त अंग ओलेचिंब झाले होते. बैलगाडी चा प्रवास संपवून पुढील प्रवासासाठी लागणाऱ्या गाडीला थोडा वेळ होता.
विमल ला आता धीर धरवत नव्हता..
कधी एकदा वैकुच्या सासरी पोहचून तिला आपल्या कुशीत घेतो असे झाले होते..
क्रमशः
Previous Part Link
https://marathi.shabdaparna.in/१६-हर
Next Part Link
https://marathi.shabdaparna.in/१८-हरवून-
शब्दपर्णवरील इतर साहित्य वाचण्यासाठी खालील लिंक बघा
लहानग्या वैकुंठाच्या आयुष्यात पुढे काय घडते…जाणण्याची उत्कंठा वाढली. दर्शना कथामालिकेचे सादरीकरण उत्तम.
बापरे…अंगावर काटा आला…
वैकु चा संसार सुरू झाला.
छान कथा