१८-हरवून गेल्या जाणिवा
१८-हरवून गेल्या जाणिवा

१८-हरवून गेल्या जाणिवा

.१८-हरवून गेल्या जाणिवा

सौ. दर्शना भुरे..

मधुकरराव ने शेतीच्या लागवडीसाठी बी बियाणे खरेदी करून ठेवले होते. उद्या पेरणीसाठी मजुर पण येणार होते. पण सकाळी सकाळी च दादासाहेब म्हणजे वैकुंठा चे आजे सासरे गेल्याचे त्यांच्या कानावर पडले.. म्हणून ते हातातील कामे सोडून.. वैकुंठा च्या सासरी उमरगाव ला दादासाहेबांच्या अंतिमक्रियेत सहभागी होण्यासाठी निघाले..

पुढे…

वरुन पाऊस खाली चिखल. चिखलाच्या वाटेवरून चालताना बैल बिथरत होती. त्यामुळे अंतर पार पडायला उशीर झाला असता.
त्या काळी गावाकडे मोजक्या एक किंवा दोनच बसगाड्या सोडत…एक बस आली कि दुसरी खूप वेळाने यायची.

सकाळची पहिली बस तर गेली होती आणि नंतरच्या बसची चौकशी केली असता तिची येण्याची वेळ दुपारची आहे असे कळले.. तिला यायला अजून उशीर म्हणजे इथूनच निघायला उशीर आणि अंत्ययात्रेसाठी पोहोचायला पण उशीर च …अंत्ययत्रा सापडणे आवश्यक होते.

लेकीकडील नवीन नवीन सोयरे संबंध जुळले होते. तिच्या सासरी पहिल्या वेळेस आपण जात आहोत आणि तेही वेळ अशी.
उशीरा ने सर्व आटोपल्यानंतर पोहचलो तर.. अशाने व्याही नाराज होतील आपल्यावर सुरुवातीलाच वैकुच्या सासरची नाराजी योग्य नाही . या विचाराने मधुकररावने
मिळेल त्या खाजगी वाहनाने जायचे ठरवले.त्यांनी त्यांच्या भावाला केशव ला मिळेल ते वाहन घेऊन येण्यासाठी सांगितले..
केशव वाहना च्या शोधात गेल्यावर विमल म्हणाली,

अहो..आपण दुसरे वाहन शो़धेपर्यंत आपल्या बैलगाडीतून च गेलो तर…

अग अशा पावसाळ्यात चिखलातून आपल्याला पायी चालणेच मुश्किल आहे..तिथे बैलगाडी काय धावणार.. बैल पुढे जाऊ शकले नाही तर मध्येच थांबावे लागेल.

मधुकररावचेही बोलणे खरे होते. अशा ढगाळ वातावरणामुळे
बैलगाडीतून गावापर्यंत प्रवास खरोखर शक्य नव्हता…

अशा बिकट परिस्थितीमध्ये वाहन मिळणेही अवघड जात होते.. पावसाची संततधार चालूच होती.. खूप वेळ शोधाशोध करून ही वाहनाची सोय काही झाली नाही..पावसात कुठलेही वाहन यायला तयार नव्हते.रस्ता कच्चा असल्यामुळे वाहन बिघडण्याची भिती होती,
म्हणून ती सर्वजण दुपारच्याच बसची वाट बघत थांबली..

विमल लेकीला पाहण्यासाठी तिला भेटण्यासाठी अधीर झाली होती.. .कधी जाते नी वैकुला डोळाभर बघते असे तिला झाले होते.
तिच्या नजरेसमोर तिला सारखी वैकुच दिसत होती.

ती नवऱ्याला म्हणाली,

अहो..गाडीची वाट बघत असे किती वेळ ताटकळत उभे रहायचे.. तिकडे पोर आपल्या वाटेकडे डोळे लावून बसली असेल..
मधुकररावला तिचे म्हणणे पटत होते पण त्यांचाही नाईलाज होता .

विमलचा जीव वैकुसाठी आतल्या आत तीळ तीळ तुटत होता.शेवटी दुपारच्या बसने ते सर्व निघाले.पावसामुळे बसही हळूहळू पुढे जात होती.अर्ध्या तासाचा प्रवास पण विमलला मोठे अंतर वाटत होते.

इकडे वैकुंठा पण काल रात्री पासून तापाने फणफणली होती.
काहीही न खाता पिता.. तिने नुसता तिच्या आई आबाचा ध्यास धरला होता.
सर्व आले पण अजून माझे आई आबा कसे नाही आले. असे विचारत होती.
त्यांची ती आतुरतेने वाट पाहत होती.

तिच्या चुलत सासूने तिची समजूत काढीत तिला बळेच अन्नाचे दोन घास खावू घालून झोपवले होते.

एक एक करून जवळपास सर्व नातेवाईक जमले होते .
वैकुंठा च्या माहेरची मंडळी तेवढी यायची बाकी होती. कांताप्रसाद च्या अंत्यविधीची तयारी ही सुरु झाली होती .. नवीन व्याही अजूनपर्यंत पोहोचले नाहीत म्हणून गावातील लोकांची आपसात कुजबुज सुरू झाली..

तासभराच्या अंतरावर असलेल्या उमरगावला
पोहोचेपर्यंत आज त्यांना अर्धा दिवस लागला होता.
तोपर्यंत कांताप्रसाद चे अंत्यसंस्कार उरकले होते.
विमल-मधुकरराव पोहचले.उशिरा आल्यामुळे त्यांनाही अवघडल्यासारखे वाटत होते.

त्यामुळे आपण वेळेत नाही पोहोचू शकलो याची खंत वाटून मधुकररावने व्याह्यांसम़ोर हात जोडत माफी मागितली.
आई-आबा आल्याचे वैकुला माहीत नव्हते.ती झोपून होती.

क्रमशः

Previous Part

https://marathi.shabdaparna.in/१७-हरवून-

प्रिय वाचक,तुम्हीही तुमचे साहित्य शब्दपर्णवर प्रकाशित करु शकता.
साईटवर Registration करा किंवा  संपर्क साधा खालील Email वर
शब्दपर्णचे इतर साहित्य वाचण्यासाठी फेसबुक पेज अवश्य like,follow करा.

शब्दपर्णवरील इतर साहित्य वाचण्यासाठी खालील लिंक बघा

https://marathi.shabdaparna.in/व-हाडी-

 

3 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!