३-आभास हा छळतो मला…कथामालिका
३-आभास हा छळतो मला…कथामालिका

३-आभास हा छळतो मला…कथामालिका




सुखदात झालेला बदल फक्त वसुधाला जाणवत होता.त्या अस्वस्थ व्हायच्या सुखदातील बदल जाणवला कि.
सुखदा आॕफिसमध्ये गेली कि तिला दिलेली कामे पटपट आवरायची आणि  उरलेल्या वेळात मानसचे स्वप्न रंगवत बसायची.कामाव्यतिरिक्त वाचलेला वेळ मानसचा असायचा.आजकाल आॕफिसमधील सहकाऱ्यांशी बोलणे टाळायची.
 आॕफिसच्या कामात ती चोख असल्यामुळे कोणी काही म्हणायचे नाही.
घरी आली कि तिच्या खोलीत जाऊन बसायची.आताशा आईबाबांशी गप्पा करणे तिने बंदच केले होते. दार बंद करुन तासन् तास आतमध्ये सुखदा काय करते हा प्रश्न वसुधाला पडायचा.त्यांनी विचारले तर सुखदा आॕफिसच्या कामाची सबब सांगून वेळ मारुन न्यायची.
पण आता हे रोजचेच व्हायला लागले.




मनोहररावांच्या नजरेनेही हा फरक टिपला.आता त्यांनाही वसुधासारखीच सुखाची काळजी वाटायला लागली.
सुखदा आॕफिसमधून घरी आली. रोजच्यसारखी खोलीत जाऊन बसली.मानसचा फोटो  हातात पकडून स्वप्नात दंग झाली.मनोहररावांनी आवाज दिला.
 सुखा,सुखा….पण सुखदाची तंद्री भंगली नाही.शेवटी दारावरच्या कडीच्या आवाजाने ती भानावर आली.
 अग कधीपासून आवाज देतोय सुखा.
 अहो बाबा आॕफिसचे काम करता करता डोळा लागला होता.
 बरं ये बस जरा इथे.मला आणि तुझ्या आईला तुझ्याशी जरा बोलायचे आहे.
बोला ना बाबा.
 बाळ सुखा, संपदाताईचा चुलत दिर आहे. त्याची इच्छा आहे तुझ्याशी लग्न करायची.
 सुखदा संतापली.जोरात ओरडली.मला यापुढे लग्नाचे विचारायचे नाही.
आणि  घाईने खोलीत जाऊन बसली.
 सुखदाचे असे वागणे मनोहरराव आणि वसुधासाठी अनपेक्षित होते. मनोहररावांना धक्काच बसला.
 वसुधाला वाटणारी काळजी योग्यच होती.असे त्यांना आता वाटले.
  दुसऱ्या दिवशी सकाळीच संपदाला त्यांनी फोन केला आणि संध्याकाळी घरी बोलवले.
आजही सुखदा मानसचे चित्र प्रदर्शन बघायला गेली.




 

त्याचे चित्रे  बघून तिची तीच हूरहूर,अस्वस्थता,त्याला बघण्यासाठी भिरभिरती नजर. पण आजही तो आला नव्हता. मग त्याच्या चित्रातच ती शोध घ्यायला लागली त्याचा आणि  तिचाही.
मानसने एक कौटुंबिक चित्र काढले होते.एक जोडपे आणि त्यांची दोन मुले..ते चित्र  बघून सुखदाची कळी एकदम खुलली.ह्या आमच्या भविष्यातील स्वप्नाबद्दल आता एवढ्यातच तर बोललो आम्ही. आम्ही दोघे,एक मुलगा आणि  एक मुलगी.मुलांची नावेही ठरवली मानसने.मुलाचे नाव सुखद आणि  मुलीचे नाव मानसी.
छोटे कुटुंब ,सुखी कुटुंब  असणार आमचे.मानसने तर मुलांच्या भविष्याचे सगळे प्लॕन्स केले आहेत.मी म्हंटलेही मानसला
अजून कशात काहीच नाही अन् तुम्ही कुठली कुठली स्वप्न बाघता.तर म्हणतात कसे,राणीसरकार आम्ही जे ठरवतो ते करुन दाखवतो.
सुखद,मानसी,तू अन् मी चौघांचे एक सुंदर घर असणार
तेही निसर्गाच्या सानिध्यात.मानस निसर्गात जास्त रमतात.
कृत्रिमतेमध्ये ते रमत नाहीत.
अहो,मॕडम प्रदर्शन संपले आता.सगळे निघून गेले.
आवाजाने सुखदा भानावर आली.
बाबांनी बोलवले म्हणजे काहीतरी आवश्यक काम असेल असा विचार करुन संपदा लवकरच घरी पोहचली.सुखदा येण्यापूर्वीच आईबाबांचे संपदाशी बोलून झाले होते.सुखदा घरी पोहचली तेव्हा तिघेही सुखदाची वाटच बघत होते. सुखदा येण्यापूर्वीच आईबाबांचे संपदाशी बोलून झाले होते.
संपदाला बघून सुखदा खूष झाली.
ताई म्हणत तिच्या मिठीत शिरली.
क्रमशः
वाचत रहा पुढील भाग…..
आभास हा    छळतो……पुढील भागाची लिंक
प्रिती गजभिये

5 Comments

Comments are closed.

error: Content is protected !!