घरी वसुधाताई, सुखदाची आई ,वडील-मनोहरराव तिची वाट बघत होते.
वसुधाताई दारातच उभ्या होत्या.
सुखदा किती हा उशीर? एक फोन तरी करायचा होता. आॕफिसमध्ये फोन केला तर तू आज लवकर निघाल्याचे सांगितले. कुठे होती एवढा वेळ?
आई,अग ते चित्रकार मानस आहेत ना त्यांचे चित्रांचे प्रदर्शन होते ते बघायला गेले होते.
एकटीच.
आईला आश्चर्य वाटले.सुखदा कधी कुठे एकटी जायची नाही.कुणाची ना कुणाची सोबत तिला हवी असायची.
बरं.जा.हाततोंड धुवून ये.
आम्ही जेवायचे थांबलोत तुझ्यासाठी.
सुखदा हाततोंड धुवायला आत गेली.
वसुधाताईः एवढ्यात सुखा जरा बदलल्यासारखी वाटते.
काय कारण असावे बरे?
मनोहररावः नाही ग. मला तर आपली सुखा तशीच वाटते.तू सतत तिच्या काळजीत असते म्हणून तुला तसे वाटत असेल.
मनोहरराव बोलत आहेत तोवर सुखदा आली.
सुखदाःआई वाढ ग जेवण. जाम भूक लागली.
वसुधाताईःहो.
आईचा काळजीचा सूर सुखदाने हेरला. तिला उगाचच अपराध्यासारखे वाटले.
लहानपणापासून कुशाग्र बुद्धी असलेली सुखदा बारावी चांगल्या मार्क्सनी पास झाली आणि एका सरकारी कार्यालयात नौकरीला लागली.एवढ्या लहान वयात नौकरी मिळाली म्हणून घरचे,नातेवाईक सगळ्यांना सुखदाचे कौतुक वाटायचे.
मनोहर आणि वसुधाचा समाधानी संसार, मनोहरराव बँकेत नौकरी करायचे. आणि वसुधाताई एका शाळेत शिक्षिका आहेत.दोन मुली. मोठी संपदा आणि छोटी सुखदा. संपदानंतर सुखदा पाच वर्षांनी झाली. सगळ्यांची खूप लाडकी होती. चार वर्षापूर्वीच संपदाचे लग्न झाले. संपदाशी खूप जवळीक असलेली सुखदा तिच्या लग्नापासून एकटी पडत गेली. घरी आता वसुधा , मनोहरराव आणि सुखदा तिघेच. घरी सगळे तिला सुखा म्हणत.
सकाळी सुखदा आॕफिसमध्ये गेल्यावर वसुधाने संपदाला फोन केला.
हॕलो,संपदा,कशी आहेस बेटा?
अग,मागे तू सुखदासाठी तुझ्या चुलतदिराचे स्थळ सुचविले होते नं. नंतर काही बोलणेच नाही झाले.
आई मी सुखाला विचारले होते पण ती सध्याच नाही बोलली लग्नाचे.
संपदा तू तिला विचारुन बघ.तिच्या कोणी मनात असेल तर आपण काही नकार देणार नाही.
विचारले ग आई मी.ती तसे काही नाही म्हणाली.
आई तू कशाला घाई करतेस?
एवढे बोलून संपदाने फोन ठेवला.
मनोहरराव वसुधाचे बोलणे ऐकतच होते.
झाले समाधान संपदाशी बोलून.अग,किती काळजी करतेस काही कारण नसतांना.वसुधा तुझा स्वभाव ना आधीपासून असाच आहे.
छोटया छोट्या गोष्टींचा बाऊ करण्याचा. गेली एक दिवस चित्रांचे प्रदर्शन बघायला.त्यात एवढे विशेष काय? सुखा मोठी झाली वसुधा.तिच्या मनाने एखादी गोष्ट तिने केली.करु दे ना.
वसुधा काहीच बोलली नाही.माझेच चुकत असणार. नाहीतर यांच्या ,संपदाच्या लक्षात आलेच असते असे पुटपुटत वसुधाने तो विषय मनातून झटकून टाकला.
सुखदात झालेला बदल फक्त वसुधाला जाणवत होता.त्या अस्वस्थ व्हायच्या सुखदातील बदल जाणवला कि.
क्रमशः
पुढील भागाची लिंक
आभास हा छळतो मला-भाग१ ची लिंक
(प्रिय वाचक,लेखक तुम्हीही शब्दपर्णवर लिहू शकता.)
प्रिती गजभिये
Sixth sense of a mother.
सुंदर कथा
Match g
खूपच छान 👌
खासच ….. उत्कंठावर्धक लिखाण… पुढे काय?
छान
उत्तम कथा 👌👌