चाफेगौर दुःख-मराठी प्रेमकथा
“मेघsss (हलकेच किंचाळत)
अरे ! काय करतोस”.
“कशी चालवतो आहेस गाडी ?. आणि मधेच का असा ब्रेक लावतो. पडेन न मी, भीती लागते रे मला”.
(मऊ स्वरात बोलत नभी मेघला घट्ट् बिलगुन बसते. )
“हळु चल!”.
“आपण स्वर्गाच्या सफरीवर निघालो आहे न”.
“मग कसली रे घाई ?”.
“तुझा ऐसपैस पाठीपर निवांत डोकं ठेवुन तरंगायच आहे मला. झुलत- झुलत आकाशापर्यंत जायचं आहे. उडायचं आहे, पाखरु होऊन तुज सवे ..उंच उंच “.
“पाहणाऱ्यांच्या पापण्याही लवु नये, न्याहाळताना आपल्याला “.
किती सुरेख जोडा आहे. एकमेकांसाठी जन्माला आलेला.
“हेवा वाटावा लोकांना, असे मिरवायचे आहे रे मला… सोबतीने तुझ्या “.
( अनायासे गाडी हेलकावे घेते )….
“का? काय झाल रे ?.
अरे ss..अरेss..बघुन.. बघुन..
समोर समोर गाडी…ss
“दिली स च न धडक …कसा रे तु ..अरे तो पडला न माणूस…!. मेघss..!”.
“अगं तु ओळखलं नाही का त्याला?”. “तुझा जानी दुश्मन ग …..!”.
नभी : (मागे वळून पाहत) अगं बाई ! (आश्चर्याने) “डिसुजा आहे का तो ?”.
मेघ : ( जरा हसुन) “आहे नाही! होता म्हणं …! एव्हाना रवाना झाला असेल त्रैलोकी “.
नभी : “कसा रे तु मेघ ?”.
पण जाऊ दे,”आपण नाही विचार करायचा. आपला केला का कुणी विचार ?”.
“तु बरोबर म्हणतो मेघ, दुष्ट आहे हे जग, वाईट आहेत लोक,
हा डिसुजा…! हा तर माथेफिरु सारखाच मागे लागला होता माझ्या. कुठेही शुंभा सारखा उभा ठाकयचा . त्याचे ते घाणेरडे हसणे, किळसवाण्या नजरेने पाहणे, जणु डोळ्यांनी गिळंकृतच करेल. छी,छी,विभत्सपणा नुसता “.
ह्याचीच दृष्ट लागली आपल्या नात्याला. सारखा नजर ठेवुन असायचा. बाबांना पण हाच घेऊन आला होता न देवळात?. आपण सोबत आहोत दाखवायला .
आईला थियेटरच टिकीट ह्यानेच नेउन दिले होते न. आपण मित्र मंडळी सिनेमाला गेलो होतो तेव्हां.
बसस्टॉप वर उभी असले कि मुद्दाम माझ्यासावली वर उभा रहायचा . गर्दीत मागोमाग बस मधे चढायचा . फारच पिच्छा पुरवला ह्या गलिच्छ माणसाने माझा.
मेघ मला इतका राग यायचा न ह्याचा. असं वाटायचं, हा तरी डोळ्याआड जावा, नाही त आपण तरी संपून जावे. एक हा असा आणि दुसरे गुरुजी.
दर तीसरे दिवशी घरी येत ,
“काय नभी कशी आहेस ? काय सुरु आहे ?”.
पंत नभी मोठी दिसते, देखणी आहे .
स्थळ आले की उजवुन टाका.
जग फार वाईट आहे बरे का .
हे जे लग्न जुळवणारे गुरुजी असतात न, लोकांच्या पोरींवर यांची भलतीच नजर आणि ह्यांनाच टेंशन लोकांची
लेकबाळ उजवायचे. रिकामटेकडे कुणीकडले.
आई पण … “गुरुजी बसा हं , नमस्कार करते . नभेss अगं ए नभे ss गुरुजींना मसाला दुध कर बर बाळ “.
मला सारख वाटायचं ही असली माणस जगात का आहे ?.
आणि हा असंही वाटायचं, तुझ्या सारखीच सारी माणसं का नाहीत या जगात. तु किती गोड आहेस.
तु जेव्हां समोरच्या बिल्डिंग मधे रहायला आला, तेव्हां प्रथम बाबांनाच तू आवडला होता.
“होतकरु दिसतो. बाळबोध वळनाचा आहे. निरागस नजर आहे “.
अस मत होत त्यांच तुझ्या बद्दल आणि मला आवडायला लागल्या वर.
” बदमाश आहे बेटा,भेदक नजर आहे चंप्याची ” सजग रहायला हवे ….नभे जरा आवरते घ्याव , “आपण मोठे झालोय म्हंटल”.
असं कसं, पालक असे का असतात रे?. का असे वागतात?.
प्रेम इतकं का वाईट असतं मेघ?. तुझ्यावर प्रेम आहे सांगितल्यावर किती मारलं होत बाबांनी मला. आईनी जेवण दिलं त म्हणाले,
“अहो विष द्या तिलाss, असे अपत्य नसल्या परी बरे “.
निष्ठुर झाले होते रे बाबा. फारफार कोड कौतुक करणारे लाड करणारे बाबा इतके कसे बदलले मेघ, सांग नं सांग मला , नाही सुटत मला हि कोडी.
मेघ ! “तु समजुन घेशील न मला. का तू ही असं अंतर देशील मला, प्रसंगी माफी देऊ शकशील न मला” ?.
(नभी मेघच्या पाठीवरचा बाहुंचा विळखा आवळत रडते)
मेघ : अरे ! नभी ते बघ हरणीचे पाडस. तुला खेळायचं न त्याच्याशी .
नभी : हो रे , कुठे ?.
ते …ओह…(त्याला कडेवर उचलुन घेते. लाडिक खेळते त्याच्याशी. मंत्र मुग्ध होऊन मेघ तिला न्याहाळतो).
मेघ : नभी , रोज गार्डनला जायचं होतं न तुला ?
चल….
आहा कित्ती छान…!
इतक्या रंगांचे गुलाब असतात…! किती सुंदर…! इतकी सगळी फुले तर पाहिलीच नव्हती मी कधी…!
मेघ : हो न , म्हणूनच तुला सोबत उद्यानात आणले. तुझ्या चहुबाजुंनी निशीगंध मांडला. मोगरकळ्या हुंगवल्या, गजरा माळला, पायी पारिजातक आंथरला.
तुझ्या गाला वरची खळी खुलवायची आहे मला.
तुझं नितळ हसुं मनात साठवायच आहे मला.
तुझ्या डोळ्यांतील भिडस्त आभाळ निववायचे आहे मला.
तुझा सर्व इच्छा पुरवायच्या आहे मला.
तुला माझ्या जीवनी “आई होऊन घास भरवतांना, कार्यात सल्ला मसलत करतांना आणि शयन कक्षेत रंभा होताना पहायचं आहे गं”.
“तुझं सकाळचं निद्रस्त सौंदर्य , दुपारचं डोळे दिपवणारे सौंदर्य, आणि रात्रीचे रति सौंदर्य अनुभवायचे आहे गं मला”.
पण…!
आयुष्याची हिरवळ वाटुन घ्यायची होती तुजसवे सखे. खाच खळग्यातुन एकमेकांच्या सहवासाने हात धरुन मार्गक्रमण करायचे होते. माझ्या फुला..
पण…!
पण दुर्दैव आपलं…”आपण आपल प्रेम कुणाला पटवुच शकलो नाही”. भक्तीप्रमाणे जपलेल्या प्रेमाचा दुस्वास केला लोकांनी. आपले म्हणवणारे परके होतात ग ,मन समजुन घेण्याची वेळ आली की. जनरीतच आहे ती .
मात्र प्रेमाला मरण नसतं.
जगु दिलं नाही तर दोन देह प्राण सोडून एकजीव होतात. हे मात्र झाल्याशिवाय कळतंच नाही कुणाला.
कसं असतं न ग नभी, जिवंत असतानां किती बंधने होती आपल्याला.
आता नाही. संपल्या सर्व मर्यादा. सगळी भीती. आता तू मी आणि आपलं इवलंसं विश्व. सांभाळेन ग मी तुला जपेनही. आता आपल्याला कुणाची भीती नाही. सुटलो आपण त्या दुष्कृत भावभावनांच्या देहपाशातुन. मिथ्या सामाजिक बंधनातुन. मी वचन दिलं होतं न तुला, आजीवन सोबत करण्याचं. जीवीत नसलो म्हणून काय झाले मरणोपरांत एकरुप झालो आपण सोबत करायला.
हो न…!
तु आनंदी आहेस न नभी?. एक नवीन जग आपली वाट पाहत आहे. “आपल घर, प्रेम कुटी, ती विहीर, तो झुझुझुझुझु ……..वाहणारा गारठलेला वारा, ती चिंचेची घनदाट हिरवळ, प्रत्येक फांदीवर झोके घेत आपण प्रेम जगु लाडके प्रेम केले ग मी…तु आपण …कुणास न कळु शकणारे .. प्रेम”.
“प्रेम हे अद्वैत असते. मनाच मनाशी जोडलेलं नाते. देहविस्तारा पलिकडे
शब्दपर्णवरील इतर साहित्य वाचण्यासाठी खालील लिंक बघा
हे भुतांच अद्भुत जग छानच आहे.
हो ग खर्च
किती तरल नितळ कथा.
नभी आणि मेघ नावेही किती सुंदर
Tq priti
Apratim