त्या तिघी-मराठी लेख
एका छोट्या शहरात एकाच कॉलनीत राहणा-या ,सुखवस्तु कुटुंबातील त्या तिघी एकदम जिवाभावाच्या मैत्रिणी .त्यांची मैत्री आजूबाजूच्या परिसरात एकदम famous . त्यांची मैत्री वाखाणण्यासारखीच .
मैत्री मधे त्यांनी कधी एकदुसरीला अंतर दिले नाही. त्यांचे स्वभाव सुध्दा एकसारखेच .त्यामुळे त्यांचे मनं जुळायला वेळ लागला नाही . कारण म्हणतात ना कि स्वभाव जुळले कि मनं आपोआप जुळतात .
त्या तिघी सदैव खुश राहणा-या आणि आपल्या आजुबाजुचे वातवरण खुश ठेवणा-या ,दु:ख ,चिंता असलेले असे त्यांचे चेहरे कधी कुणी बघितलेच नाही. सतत हसता चेहरा असायचा. ह्या त्यांच्या सतत खुश राहण्यामुळेच कि काय त्या तिघिंची शरीरयष्टी पण धुष्टपुष्ट होती अगदी म्हणतात ना खात्यापित्या घरच्या लोकांसारखी.
देवाने आपल्याला मनुष्य जन्म दिला आहे तेव्हा हे आयुष्य आनंदाने घालवायचे आणि आपल्या परिवाराला ,आपल्या आपल्या आजुबाजुच्या मंडळींना आनंदी ठेवणे हाच त्यांच्या जीवनाचा उद्देश असावा असे म्हटले तरी चालेल.
या तिघींची मैत्री काही बालपणा पासूनची नव्हती .ह्यांची मैत्री लग्नानतंरची . एकाच कॉलनीत रहायला आल्यानंतर सुरवातीची तोंडओळख कधी पक्या मैत्री मधे झाली हे तिघींनाही कळले नाही. त्यांच्या मैत्री मुळे त्यांच्या परिवारामधेही घनिष्ट मित्रता होती. त्यांच्यी मैत्री त्यांच्या परिवारांमधेही famous होती.
जुन्या काळात कसे शेजारी आलेला पाहुणा आपल्याही ओळखीचाच वाटायचा तसं या तिघींच्या बाबतीत होतं .कुणा एकीकडे तिचे आई-वडिल , भाऊ – बहिण , जावा , नणंदा – दिर आले कि बाकीच्या दोघींनाही त्यांचेच नातेवाईक आल्याचा आनंद व्हायचा. आणि आनंद का नाही होणार हो कारण त्यांचे नातेवाईक सुध्दा ह्या तिघींवर भरभरून प्रेम करायचे. त्यांच्या मैत्रीचे साक्षीदार त्यांचे नातेवाईक सुध्दा होते.एक प्रकारची पारिवारीक भावना या तिघींमधे होती.
अशा या दिलखुलास असणा-या या तिघींच्या जीवनात कधी दु:ख ,चिंता ,काळजी नव्हती असे नाही तर ह्यांच्याहि जिवनात बरेच चढ उतार आले पण त्यांचा देवावरिल दृढ विश्वास आणि जिवनाकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन यामुळे सहजपणे त्या आलेल्या सकटांना पार करून गेल्या .ह्यांच्या आजारपणावरही ह्यांची मैत्री हेच औषध लागू पडायचं . एकमेकांशी मनमोकळ्या गप्पा मारल्यावर ,मन मोकळं केल्यावर तिघींना एकदम ताजेतवाने झाल्यासारखे वाटायचे.या तिघींचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे ह्या तिघी कुठल्याही वयोगटातील लोकांमधे पटकन मिसळून जायच्या. लहान मुलांसोबत लहान होऊन खेळायच्या ,समवयस्क
मैत्रीणीं सोबत गप्पा मारणे तसेच वृध्द मंडळीना सोबत घेवून सत्संग सुध्दा करायच्या त्यामुळे सम्पूर्ण कॉलनीत तिघी सर्वांच्या आवडत्या होत्या .
या तिघींची अजून एक खासियत म्हणजे ह्यांच्या गप्पांमधे कधिही गाॅसिपिंग किंवा चुगल्या प्रकार नव्हता. त्यांच्या गप्पांमधे नेहमी माणसं, परिवार जोडण्याची भाषा असायची. कधीकधी गंमत म्हणुन एखाद्याची फिरकी घ्यायच्या . त्या तिघींच्याही बोलण्यात कधीही कुणाच्याच बाबतीत अपशब्द ऐकण्यात आले नाही त्यामुळे प्रत्येकिच्या परिवारात त्यांना तेव्हढाच आदर दिल्या गेला.
मैत्री दिनाच्या दिवशी what’s app वर मैत्रीचे अनेक चांगले मॅसेजेस वाचायला मिळतात जसे ” मन मोकळं करायला एक चांगली मैत्री हवी” वगैरे .मैत्री म्हटले कि सगळ्यांना आठवते श्रीकृष्ण – सुदामाची मैत्री .तशीच या तिघींची मैत्री होती नव्हे आहे .आज जरी त्या तिघींपैकी एक नौकरी निमित्त दुस-या शहरात वास्तव्यास गेली असली तरी त्यांची मैत्रीतला जिव्हाळा तसूभरही कमी झाला नाही .
त्यांच्या मैत्रीत प्रेम, आपुलकी ,एकमेकींबद्दलची काळजी, चिंता ,जिव्हाळा सगळं काही आहे .कशाकश्शाची म्हणुन उणिव नाही. “संकटात कायम साथ देतो तोच खरा मित्र ” हि उक्ती खरी करणारी त्यांची मैत्री. या तिघींना गमतीने त्यांच्या बाकी मैत्रीणी ” तीन प-या” म्हणुन बोलवायच्या .पण खरच त्या तिघीजणी ” Angel” च होत्या .सर्वांवरती प्रेम
करणा-या , ज्यांच्या सहवासात नेहमी आनंद वाटायचा ,एक सकारात्मक उर्जा मिळायची अशी हि तिघींची मैत्री आजही अबाधीत आहे. अशी मैत्री आपल्या आयुष्यात असेल तर कायम टिकवून ठेवा .कारण म्हणतात ना,
“एक चांगले पुस्तक आपला चागंला मित्र असतो पण
एक चागंला मित्र पूूर्ण पुस्तकालय असतं “.
शब्दपर्णवरील इतर साहित्य वाचण्यासाठी खालील लिंक बघा
Chan
छानच..
खूप छान.मैत्रिणी जिवाभावाच्या असतात .