दवाखान्यातून घरी येताच रेवतीने ती आई होणार असल्याची गोड बातमी सर्वांना दिली. छकुली नंतर तिचे हे दुसरे मुल म्हणूनकोणालाही घरात विशेष खुशी झाली नाही .तिचा नवरा रमण ही मौन पाळून होता. काहीच बोलत नव्हता. .
त्यामुळे मग जरा नाराजीनेच तिने आपल्या बेडरूममध्ये जावून अंग टाकले.
छकुली बाहेर सोनूताईसोबत खेळत होती.
रेवतीला असं नाराज होऊन बेडरूममध्ये गेलेले पाहताच रमणने तिच्या मागोमाग येत विचारले,
काय झाले रेवती? सर्वांसमोरुन उठून एकदम असे का आत आली..
मग काय करू रमण तिथे बसून सांग ना..तू तरी माझ्या प्रेग्नन्सीमुळे घरात सर्वांचे चेहरे कसे पडले हे पाहिले मी.. आणि तू सुद्धा गप्पच आहे बातमी कळल्यापासून. .
अगं तसं काही नाही तुझा काहीतरी गैरसमज होत आहे.
गैरसमज. ..
असे मनाशी पुटपुटतरेवती ने काही न बोलता आतल्या आत एक दिर्घ श्वास घेतला..थोडावेळ आराम करून संध्याकाळचे जेवण वगैरे आटोपून छकुलीला झोपवून नेहमीप्रमाणे स्वयंपाक घरातील कामाला लागली. पण आज तिचे चित्त थाऱ्यावर नव्हते. तिच्या जावेच्या हे लक्षात आले . ती जवळ येत रेवतीला म्हणाली ,
तुला असं वाटत नाही का रेवती तू दुसऱ्या बाळाची जरा घाई करत आहे.
म्हणजे… काय म्हणायचे आहे ताई तुम्हाला मला नाही समजले ..
अगं म्हणजे बघ न .. तुझी छकुली लहान आहे . ती थोडी मोठी झाली की मग दुसऱ्या मुलाचा विचार करावा. तूर्तास तरी टाळावे.
याचा अर्थ..गर्भपात करू असे म्हणायचे का?
अगं .. तसे म्हटले तर काय हरकत आहे.
तुला तर माहित आहे की अजूनही समाजात बऱ्याच ठिकाणी मुलगा नाही म्हणून त्या स्त्री ला दुय्यम दर्जा दिल्या जातो . हे सर्व मीपण अनुभवलेले आहे.
माझी परिस्थिती तर तू स्वतः पाहिलीही आहे ना . .एकापाठोपाठ तीन्ही मुलीच झाल्या त्यामुळे घरच्या .. दारच्या लोकांनी मारलेले ते सतत टोमणे आठवले की आजही माझ्या जिवाचा थरकाप उडतो . तुझे हाल माझ्यासारखे होऊ नाही. असे मला वाटते एवढेच दुसरे काही नाही..
तुम्ही बोलता ते बरोबर आहे ताई पण मला सांगा ना..
मुलगा होणे किंवा मुलगी होणे . आपल्या हाती थोडे असते … आपल्या पोटी जन्माला येणाऱ्या त्या निष्पाप जीवाचा तरी काय दोष असतो ताई सांगा न..
का? आपण एवढे निष्ठूर होवून त्याची हत्या करावी. अजून जो या दुनियेत जन्माला आलाही नाही. मुलगा असो किंवा मुलगी दोघेही स्त्रीला मातृत्वाचा दर्जा देतात. ज्याच्या शिवाय स्त्रीचे जीवन अधुरे असते.
नाही मला हे काही पटत नाही हे सर्व. आणि तुम्ही सांगा मला पुढेही मुलगाच होईल याची काय खात्री.. रेवतीने जावेला विचारले.
मुलगा -मुलगी एक समान मानणाऱ्या आधुनिक विचाऱाच्या, मायाळू अरूणा ताईंला पोटी तीन मुली म्हणून त्या खचल्या नव्हत्या.तर पाठोपाठ मुलीच झाल्यामुळे नवऱ्याचा त्यांच्यावर असलेला राग त्यांना हताश करत होता. नवऱ्याने तरी आपल्याला साथ द्यावी अशी त्यांची चारचौघींसारखी अपेक्षा असणे स्वाभाविक होती. त्यामुळे म्हणून त्या रेवतीला सावध करीत होत्या. खरचं आपली गतसुध्दा अरूणा ताई सारखी होईल का ? रेवती आता विचारात पडली. पण काही ही झाले तरी ह्या बाळाला जन्म देणार हे मनाशी निश्चित करून एक दिवस वेळ पाहून ती रमणला म्हणाली,
रमण मला तुझ्याशी थोडे बोलायचे आहे तू मला सांग मला दुसरीही मुलगी होईल या भितीने मी गर्भपात करावा असे खरेच तुला वाटत नाही न..
तिच्या अश्या विचारण्याने रमण एकदम आश्चर्यचकित होऊन म्हणाला, रेवती माझ्या बाबतीत तू असा विचार तरी कसा करू शकते..
नाही रेवती मुळीच नाही.. इवलेसे बाळ ते… त्यात कसला ग भेदभाव..
शेवटी मीही त्या बाळाचा होणारा बापच ना..
हो ..ना ..रे ..आणि बघ न आपल्या इवल्याशा छकुलीसारखे आपले ते बाळ गोड गोंडस दुडूदुडू धावेल..मला आई म्हणेन..हट्ट करेल..त्याचा तरी काय दोष रे त्याला काय माहित आहे या दुनियेतील लोक कसे निष्ठूर आणि स्वार्थी आहेत.
मुलामुलीत भेदभाव करणारे आहेत.
आपण आपल्या बाळाला या सुंदर दुनियेत नक्की जन्माला घालू.
हो ..अगदी तू म्हणशील तसेच होईल
म्हणजे खरच तू नाराज नाहीस मला तर वाटले तू माझी प्रेग्नेंसी ची बातमी कळल्यापासून माझ्यावर नाराजच आहेस
रेवती भावूक होऊन डोळे पुसत म्हणाली
रेवती तू माझ्या बाबतीत असा विचार तरी कसा केला . . मुलगा किंवा मुलगी काही होवो आपण आनंदाने स्विकारु.. त्यांना आपण खूप शिकवू … त्यांची सर्व स्वप्ने पूर्ण करू..
झाले का आता समाधान बाईसाहेब का? अजून काही ..त्याने विचारले,
..नाही अजून काही नाही रमण मला तुझ्या तोंडून हेच ऐकायचे होते. ..खरे सांगू आता मी निश्चिंत झाले. तुझ्या बोलण्याने ..माझ्या मनावरील दडपण आज पूर्णपणे दूर झाले असे म्हणत तिने अश्रू पुसत आनंदाने रमणला गच्च मिठी मारली..
सौ दर्शना ओम भुरे हिंगोली
छान कथा
सुंदर … सोबतच सामाजिक …संदेश
खुप छान
छान लिखाण, कथा
मस्त 👌👌
वा khupch chhan
खूप छान दर्शना
Wahh…wahh!