परिचय-स्त्री कथा
परिचय-स्त्री कथा

परिचय-स्त्री कथा

परिचय-स्त्री कथा

सुमतीला आज एका शाळेच्या कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून निमंत्रण होतं.
सकाळपासुन तिची घरातल्या कामाची गडबड चालु होती. कामे आवरून तिला शाळेत वेळेच्या आत पोहोचायचे होते. कुठेही ‘ बोलावणं ‘  आल्यावर उशिरा ‘ पोहचणे ‘  तिला आवडायचे नाही.  लहानपणापासून ती तशी वक्तशीर होती.  कामे करता करता शाळेत आज कुठल्या विषयावर बोलायचे ? कोणता मुद्दा घेऊन मुलांची संवाद साधायचा ?  याचा विचार ती करत होती.
घर आणि कॉलेज, दोन्ही आघाड्या ती उत्तम सांभाळी.

सुमती कॉलेजमध्ये मानसशास्त्र या विषयाची प्रोफेसर होती.  ती उत्तम वक्ता होती.  हा गुण  तिने तिच्या वडिलांकडून घेतला होता.  वाचन आणि चौकस बुद्धी मुळे तिचे भाषण नेहमी प्रभावी ठरत असे .
वामनराव देशमुख सुमतीचे वडील एका शैक्षणिक संस्थेचे संस्थापक होते.  पुरोगामी विचारसरणी , प्रखर बुद्धिमत्ता,  अन्यायाविरुद्ध संघर्ष करण्याची जिद्द , समाजासाठी काही करण्याची धडपड असा भक्कम वारसा तिला मिळाला होता.
सुमतीचे सासरे प्रतिष्ठित उद्योगपती होते व तिच्या नवऱ्याने नितीन आंबेकरने मेहनतीने व्यवसाय अजुन पुढे नेला होता.  तसे सुमतीला नोकरी करण्याची आर्थिक गरज अजिबात नव्हती पण तिच्या सासर्‍याला आणि तिलाही कामाशिवाय रिकामं राहणं पसंत नव्हतं .

शाळेच्या कार्यक्रमाला वेळेत सुरुवात झाली . कार्यक्रमाची रूपरेषा सांगितली.  दीप प्रज्वलन , स्वागत गीत , सरस्वती स्तवन सगळं नेहमीप्रमाणे पार पडले .
प्रमुख अतिथी सुमतीच्या परिचयाची वेळ आली . परिचयात वामनराव देशमुख,  आंबेकर नुसार तिचा अमुक-अमुक ची मुलगी – सून – पत्नी , सगळा  परिचय व्यवस्थित झाला. तिच्या वैयक्तिक  कामगिरीचाही आढावा तिच्या परिचयात  घेतला .
तिचीच महती ऐकता ऐकता  तिला काहीतरी खटकत होतं. तिला राहून राहून वाटत होतं आपला परिचय अर्धवट झाला.
काहीतरी राहिलं ………..पण काय  ?
तिला कळत नव्हतं .
आयोजकांनी परिचय संपवून तिला भाषणासाठी पाचारण केलं,  पण काही क्षण ती खुर्चीतच बसून राहिली.
वाटलं परिचयातले काहीतरी राहीले.

सुमतीने  नेहमीप्रमाणे मुलांशी संवाद उत्तम साधला. मुलांना बोलतं केलं.  मुलं जाम खुश होती.
कार्यक्रम संपला.
सुमती गाडीकडे निघाली . गाडीत बसता बसता तिच्या कानावर एका  मुलाचा आवाज पडला ….
” अरे ! ती बघ आपल्या मक्याची आई “.
तिचे डोळे चमकले .
आता तिचा परिचय पुर्ण झाला होता.

    ……..  मोहिनी पाटनुरकर राजे.

प्रिय वाचक,तुम्हीही तुमचे साहित्य शब्दपर्णवर प्रकाशित करु शकता.
Email
whatsapp no,
9867408400
शब्दपर्णचे इतर साहित्य वाचण्यासाठी फेसबुक पेज अवश्य like,follow करा.
विविध सिनेमांचे समीक्षण वाचण्यासाठी खालील लिंक बघा.

https://marathi.shabdaparna.in/सिनेमा

13 Comments

    1. Shubhangi Bondre kawale

      खूप सुंदर……. मोहिनी
      आपली मुलंचं आपला सर्वोत्तम परिचय असतो …..आणि ती ओळख मिळाली कि…… खरं जीवनातलं गमक होय !! नाही का?…..मस्तच लेख👌👌👌👌
      Keep it up dear 👍👍👍👍 ं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!