फौजीला निरोप-लघूकथा
फौजीला निरोप-लघूकथा

फौजीला निरोप-लघूकथा

फौजीला निरोप-लघूकथा

सहा महिन्यानंतर अर्जुन देशाच्या सीमेवरून सुट्टी घेऊन घरी आला
होता.
अर्जुन लंगोटीयार रामाला…………रामाच्या दुकानावर भेटण्यासाठी जातो.
अर्जुन रामाच्या दुकानवर पोहोचतो आणि दुकानवर…..अर्जुन ची नजर श्रेयावर पडते…आणि बघतच रहातो…

श्रेया: आईस्क्रीम वर एम.आर.पी. तर दहा रुपये आहे, मग तुम्ही माझ्याकडून बारा रू. कसे काय घेणार?…
रामा: अरे ताई.. आईस्क्रीम ला फ्रीजमध्ये ठेवावे लागते. इलेक्ट्रिक बिल पण येते ना! म्हणून बारा रु.
घेतो. तुम्हीपण थोडा विचार करा ना….
श्रेया: ही काय गोष्ट झाली..
..इलेक्ट्रिक बिलचा मला काय करायचंय. एम.आर.पी.दहा रुपये मी तुम्हाला दहा रुपयेच देणार.
श्रेया अर्जुन कडे बघुन म्हणते…..
मी एकही रु. जास्त देणार नाही….मी बरोबर बोलते आहे न!.
अर्जुन:..भानावर येवुन.. हो हो मँडम तुम्ही एकदम बरोबर आहे….. काय रे मॅडम कडून जास्त पैसे घेतोस… तू तर …..मॅडमला फुकटच द्यायला पाहीजे.
श्रेया: नाही….नाही… हे दुकान माझ्या मामाचं नाही… फुकट घ्यायला. हे घ्या.. तुमचे पैसे आणि.. श्रेया चालायला लागते….
अर्जुनही तिच्या सोबत चालायला लागतो.
अर्जुन: हाय.
श्रेया : हॅलो.
अर्जुनः नाव काय तुझे?.
श्रेया : माझं नाव श्रेया. तुझं नाव काय?
अर्जुन: माझं नाव अर्जुन.
(श्रेया मनातच… माझी या मुलाची ओळखही नाही….पण का कुणास ठाऊक मला त्याच्याशी बोलताना संकोच नाही वाटत).
श्रेया: काय काम करतोस?.
अर्जुन: मी आर्मी मध्ये आहे.
श्रेया : अरे वा! तू सैनिक आहेस. किती छान!आय रिस्पेक्ट सोल्जर.. ‘सैनिक देशाचे रक्षणकर्ते असतात’.
दोघेही सोबत-सोबत चालु लागतात.
थोड्यावेळाने….
अर्जुन: घराकडे हात दाखवुन…. हे माझे घर.
श्रेया: हो का..अरे वाss..इथे शेजारीच घराकडे हात दाखवुन…मी इथे रहाते
…..
अर्जुनः पण इथे तर कोळपे काकु रहातात ना?
श्रेया: हो मी त्यांची भाची…आत्या
आजारी आहे म्हणुन मी मदतीला आले.
अर्जुन: ओ.. हss चल आपण तर
शेजारी शेजारी आहोत भेटुत…म्हणून अर्जुन स्वतःच्या घरी गेला आणि श्रेया शेजारी कोलपे काकुच्या घरी गेली.
अर्जुन ची आई …कोलपे काकु मैत्रिणी… त्यात श्रेयाला आवडणारी
आरमी फिल्ड……अर्जुन ला श्रेया
पाहाताक्षणी आवडलेली.
आता
अर्जुन आणि श्रेया एकमेकांसोबत
गप्पा मारत…गप्पा मारत एकमेकांच्या
आवडीनिवडींची जपवणुक होवु लागली…..
…….श्रेया आणि अर्जुन चे ओळखीचे रूपांतर प्रेमात कधी झाले दोघांनाही कळलेच नाही.
अर्जुन आणि श्रेया दोघेही रोज भेटायला लागले.
एक दिवस…
अर्जुन:ऐक ना…श्रेया… उद्या लॉंग ड्राईव्ह ला येशील ?
एक surprise आहे तुझ्यासाठी…
श्रेया: हो…येईल ना.
अर्जुन: मी वाट पाहिन.
श्रेया : नक्की.
दुसऱ्या दिवशी सकाळी अर्जुन गाडी घेऊन श्रेयाच्या घरासमोर येतो.
श्रेया ला फोन करतो.
श्रेया:हॅलो..
अर्जुन: श्रेया मी तुझी बाहेर वाट बघतोय.
श्रेया : आलेच.
अर्जुन आणि श्रेया गाडीत बसून दोघेही लॉंग ड्राईव्ह साठी निघतात.
काही वेळानंतर दोघेही एक रम्य स्थळी पोहोचतात.
अर्जुन श्रेयाचा हात हातात घेऊन दोघेही चालायला लागतात.
चालता चालता …..
श्रेया: तुला लहानपणापासूनच आर्मी मध्ये जायचे होते का?
अर्जुन:हो.. माहिती आहे…. मी लहान असतांना तर…. भारतीय प्रतिज्ञा… जेव्हा ऐकायचो… तेव्हा लोक तर.. फक्त उभे राहतात. पण माझ्या अंगावर काटे (रोंगटे) उभे राहत होते. हळूहळू तो जोश ,जुनून वाढतच गेला. आणि मी आर्मी जॉईन केली. देशाची सेवा करण्याची संधी मला मिळाली.
चालत चालत दोघं एका बाकावर पाय सोडून बसतात.
श्रेयाचे पहिले प्रेम असते. हळूच श्रेया अर्जुन कडे बघते… दोघांची नजरा-नजर होते….लागलीच श्रेयाच्या पापण्या लाजेने खाली लवतात.
अर्जुन श्रेयाचा हात हातात घेऊन प्रेमाने श्रेयाच्या डोळ्यात बघून हळूच विचारतो; श्रेया माझ्यासोबत लग्न करशील?.
श्रेया: लाजून…. श्रेयाच्या डोळ्यांच्या पापण्या लाजेने हलकेच खाली झुकतात ….आणि स्मित हास्य करीत… ‘हो करेन’ आणि अर्जुन चा हात सोडुन…. लाजून पाठ फिरवते. तितक्यात….
अर्जुन ला फोन येतो ..अर्जून फोनवर येस सर ..येस सर. एवढेच बोलत असतो. शेवटी ओके सर बोलतो.. आणि फोन बंद करतो.
श्रेया : काय झाले ?
अर्जुन: माफ कर श्रेया …

‘देशाच्या सीमेवरील स्थिती गंभीर आहे’.
मला लागलीच जायला हवे.
श्रेया : एवढ्या लवकर जायला हवे… आत्ताशी तर….इतक्या सुंदर स्वप्नामध्ये रंगायला सुरुवात झाली होती …. की लगेच स्वप्नांची श्रॄंखला तुटली…. डोळ्यात पाणी तरळते तिच्या …. आणि श्रेया ला स्मरण होते की, मी एक सैनिकाची होणारी पत्नी आहे.
आणि…लगेच .. तुला निघायला हवे… जा.. तयारी कर..
अर्जुन: श्रेया लवकरच येईल मी.

आतंकवादी भारतीय सीमेत
शिरण्याचा प्रयत्न करीत असतात. आतंकवाद्यांना भारतीय सीमेच्या बाहेरच अडवण्याचा प्रयत्न भारतीय सैनिक करीत असतात. त्या चकमकीत अर्जुनला एक गोळी लागते आणि अर्जुनला वीरगती प्राप्त होते.
लग्न होण्याच्या आधीच श्रेयाला अर्जुनला निरोप देण्याची वेळ येते. ‘अर्जुनची एक सुंदर जीवनासाथी होण्याचे स्वप्न……पुर्ण होण्याआधीच निरोप द्यावा लागतो’.
‘एक देशप्रेमीची अर्धांगिनी …. म्हणून शब्द कानावर पडण्याआधीच अर्जुन ला निरोप द्यावा लागतो’. ‘अर्जुन सोबतच्या गुंतलेल्या मनाची गुंफण होण्याआधीच श्रृंखला तुटून निरोप देण्याची वेळ येते’
‘जय हिंद ‘.
स्मिता औरंगाबादकर.

 

प्रिय वाचक,तुम्हीही तुमचे साहित्य शब्दपर्णवर प्रकाशित करु शकता.
साईटवर Registration करा किंवा  संपर्क साधा खालील Email वर
शब्दपर्णचे इतर साहित्य वाचण्यासाठी फेसबुक पेज अवश्य like,follow करा.

शब्दपर्णवरील इतर साहित्य वाचण्यासाठी खालील लिंक बघा

https://marathi.shabdaparna.in/व-हाडी-

 

4 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!