सांज ये गोकूळी – मराठीकथा
सांज ये गोकूळी सावळी सावळी….प्रिया तिचे आवडते गाणे गुणगुणतच बेडरुममध्ये आली.
प्रिया यार धमाल आली आज. असे म्हणतच वरुणने तिला बाहूपाशात ओढले.
प्रिया आणि वरुणच्या लग्नाचा काल दहावा वाढदिवस…
रात्र भर मित्रमैत्रिणींनी धमाल उडवली. सगळा प्लान वरुणचा…
प्रियाचे सुरु होते ,वरुण अरे यंदा राहू दे यार पुढल्या वर्षी celebrate करु या.आताच शिफ्ट झालो…घर लावलेही नाही अजून…शिफ्टींगच्या कामात थकलोय दोघेही….
वरुण..राणीसरकार…लग्नाचा दहावा वाढदिवस
स आहे म्हंटल .जोरात साजरा व्हायलाच हवा. आणि मित्रांशिवाय नाही मजा येणार…आपल्या सगळ्या सुखदुःखाचे सोबती आहेत ते. तू थकली हे मान्य…पण तू काही करुच नको ना…सगळे बाहेरुन मागवू या…तू दहा वर्षापुर्वी होती तसेच नवरीसारखे बसायचे.
प्रिया दहा वर्ष कसे भुर्रकन् गेले ग एकमेकांच्या सहवासात.
तू आयुष्यात आली नी घर ,जबाबदारी काय असते याची मला जाणीव करुन दिलीस.लहानवयातच आईवडील गमावलेला मी ज्या नातेवाईकाने आसरा दिला तिथे तिथे राहून शिकत गेलो.स्वतःचे असे काहीही नव्हते. तू आली स्वतःचे घर,कुटुंब सगळेच मिळाले. शौनकच्या येण्याने तर न मावणारा आनंद दिला तू मला.
चल …झाला तू सुरु….ऐकणार थोडीच आहेस माझे….
अग हा गच्ची असलेला फ्लॕट आपण असे दिवस साजरे करायलाच तर घेतला….
हो रे बाबा….तुझी इच्छाच आहे तर बोलव सगळ्यांना.
तुम भी क्या याद करोगे जनाब
शौनकला आजच्या दिवस आईकडे राहायला पाठवते…
हो ग…त्याला आवडतेच आजीआजोबांकडे राहायला….लबाड वाटच बघत असतो तिकडे जाण्याची….
शेवटी वरुणच्या मनाप्रमाणे पार्टी झालीच….
प्रिया...वरुण पहाट झाली रे आॕफिस नाही का?
वरुण... आहे ग… अग मी विसरलोच तुला सांगायला.दोन दिवसासाठी बाहेर जायचे आहे.आज आॕफिसच्या कामानिमित्त. जरा बॕग भर ना Please,नाहीतर असू दे.मीच भरतो.
असे म्हणत वरुणने बॕग भरुन वरुण तयार झाला…
प्रिया....मी सुट्टी घेते रे.दमली खूप. जरा सामानही लावते.
वरुण तयार होऊन आॕफिसमध्ये गेला. तिकडून तिकडेच तो टूरवर जाणार होता.
प्रिया उठली. आज सुट्टी आहेच तर सामान आवरावे जरा …पण कुठून बरे सुरुवात करु…आज सगळ्यांचे कपाटं लावते असे म्हणत तिने एकेक कपाट आवरायला घेतले.माझ्या कपाटापासून करते…तिचे,शौनकचे कपाट आवरुन झाले आता वरुणचे कपाट तिने आवरायला घेतले.आधी सुटकेसमधले सामान कपाटात लावते….असा विचार करुन तिने त्याची सुटकेस उघडून कपडे लावायला सुरुवात केली मध्ये मध्ये तिचे आवडते गाणे गुणगुणत होती.
सांज ये गोकूळी,सावळी सावळी….
मध्ये एकदा वरुणचा फोनही आला..
.हाय डार्लिंग… उठली का….आराम कर….वगैरे
संध्याकाळ व्हायला आली.प्रियाचे कपडे लावून झाले.सहज एक नजरभर कपाट बघितले.एका खान्यात तळाशी तिला एक गुलाबी रंगाचे फिकट झालेले एक पाकिट दिसले….बघू का…वरुणचेच आहे. बघायलाच हवे…..माझ्याचबद्दल काही असेल….प्रियाने उघडले…आत गुलाबी रंगाचा खूप वर्षांपूर्वी ओलसर झाल्यामुळे असेल चुरगळलेला तुकडा होता…..त्यात धुसर झालेले शब्द …
प्रिय वरुण,घरी माहित झाले रे आपले…काय करायचे?ठरल्याप्रमाणे आज जाऊ या का घरातून निघून. आपण दोघेही एकमेकांशिवाय राहू शकत नाही.
तुझी…फक्त तुझीच
..राधा..
वाचता वाचता प्रियाच्या हातून तो कागदाचा तुकडा पडला….
वरुण कधी बोलला नाही राधाबद्दल.
मी नेहमी विचारायची त्याला माझ्याआधी कोणी विकेट घेतली का तुझी तर नाहीच म्हणायचा.
अग, मला आवडणारी पहिली आणि शेवटची तूच …असेच सांगत राहायचा.त्याला माहित आहे मला खोटे बोलण्याची किती चीड आहे तरीही खोटे बोलत राहिला.
प्रिया हातात तो गुलाबी कागदाचा तुकडा पकडून तशीच बसून राहिली.
कालची संध्याकाळ आणि आजची संध्याकाळ. न मिटता येणारे अंतर पडले प्रिया आणि वरुणच्या नात्यात…..
प्रिती
प्रिय वाचक,तुम्हीही तुमचे साहित्य शब्दपर्णवर प्रकाशित करु शकता.
Email
whatsapp no,
9867408400
शब्दपर्णचे इतर साहित्य वाचण्यासाठी फेसबुक पेज अवश्य like,follow करा.
विविध साहित्य वाचण्यासाठी खालील लिंक बघा.
नवरे लोकं त्यांच्या काळजाचा ठाव लागू देत नाहीत
अप्रतिम 👌
Khup chan 🌹🙏🏻👌🏻🇮🇳
Chan
अप्रतिम