प्रिय लेखक,लेखणीचे मोल कोणी करु शकत नाही. सर्वांनाच हे प्रतिभेचे देणे लाभत नाही.ज्यांना हे देणे लाभले त्यांनी लिहित रहा…..
शब्दपर्ण फुल ना फुलाची पाकळी म्हणून शब्दपर्णसाठी जे लेखक लिहितील त्यांना views नूसार मानधन देणार आहे.
१००० views.ला १५ रु…..याप्रमाणे.
लिखाण पाठवण्यासाठी marathi.shabdaparna.in वर Registration करा.
Registration करायला काही अडचण आल्यास
9867408400 वर तुमचा नंबर आणि नाव पाठवा.आम्ही Registration करुन देवू.
७ गुंता-एका स्त्री मनाचा
त्यानंतर सायंकाळी घरी आलो. माझ्या सर्व जावा मिळून स्वयंपाकाची तयारी करीत होत्या .माझ्याबाबत काहीतरी कुजबुजत होत्या. ते स्वाभाविकच आहे असे मानून मी त्यांच्या कामामध्ये मदत करू लागले. काही वेळात बाहेर खूप जोरात भांडण्याचा आवाज ऐकू येऊ लागला. कोणीतरी आत येऊन सांगताच मी धावतच बाहेर आले. बाहेर माझी बहिण माझ्या काकांना घेऊन आली होती. आणि अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करीत होती. ती दिसताच माझ्या अंगावर मारण्यासाठी धावून आली. तिला धाप लागली होती.
मला तिच्या अवस्थेकडे बघून वाईट वाटले. माझे काका अदबीने बोलत होते. तीला अशी अशोभनीयभाषा वापरू नको म्हणून समजावत होते .माझी बहीण काही मानायला तयार नव्हती .माझ्या सासरच्यांनी त्यांना सन्मानाने घरात बोलावले पण बहिणीच्या नकारामुळे काकांचा नाईलाज होता .तिने तशाही अवस्थेत बोलताना सांगितले की माझे वडील बीपी लो होऊन चक्कर येऊन पडले. त्यांना सलाईन सुरू आहे . हिच्या मुळे त्यांचे बरेवाईट होऊ शकते.हिने तर स्वतः चे सुख पाहीले.हिला कोणाची पर्वा नाही.हे ऐकून मी अस्वस्थ झाले मला तीच काळजी होती. माझी आई तर रडून, बोलून आपला ताण कमी करू शकते .
पण माझे बाबा, ते तर तसेही फार कमी बोलतात. त्यांच्या भावनांना ते कसे मॅनेज करतील . हा ताण ते कसे सहन करतील. आणि तेच झाले त्यांच्या जीवितास काही बरे वाईट झाले तर. मनात एकच कोलाहल सुरू झाले. मी दुःखद अंतकरणाने नवऱ्या कडे पाहून म्हणाले, मी माझ्या घरी जाऊ का? त्याने रागाने माझ्याकडे पाहिले. तुला सोडून जायचे होते तर माझ्या सोबत आलीच कशाला?
माझे बाबा …मला रडू कोसळले. त्याने मला बाजूला नेले व म्हणाला हे तिचे षड्यंत्र आहे. त्यांना काही झालेले नाही व होणारही नाही. मी आता चौकशी करतो. तू काळजी करू नको. मला धीर आला .तेवढ्यात माझ्या बहिण माझ्या अंगावर येऊन म्हणाली हे कपडे माझ्या व माझ्या आई-वडिलांच्या कमाइचे आहेत.ते आताच्या आता काढून मला परत दे .शेवटी मला ते कपडे काढून तिला परत द्यावे लागले. त्यानंतरही आतले कपडे सुद्धा तिने परत मागितले. ते जादूटोणा करण्यासाठी तिने मागितल्याचे कालांतराने माझ्या काकांकडून मला कळले .किती विक्षिप्त आहे माझी बहीण .तिच्या वागण्यामुळे घरातील सर्वांना किती त्रास सहन करावा लागतो याचा तिला कवडीचाही फरक पडत नाही. तिला सर्व काही तिच्या मनासारखे हवे असते .पण नियती समोर कोणाचे काही चालत नाही हेच खरे.
तिने ते कपडे घेतले व काका सोबत निघून गेली. मी स्तब्ध पहात राहिले .ते गेल्यावर माझ्या घरी त्यांच्या बद्दल चर्चा सुरू होत्या. त्या दिवशी आम्हाला मंदिरात हार घालून सर्वांसमक्ष लग्न लावून देण्याचे ठरले होते. पण घडलेल्या घटनेने ते होऊ शकले नाही. माझ्या बहिणीने माझ्या सासरच्यांचा अपमान केला .याचा तिला काही अधिकार नव्हता .ती रात्र फार चांगली गेली नाही .माझ्या जाण्याच्या विचाराने तो ही दुखावला होता.
माझ्या सासरी माझ्या नवऱ्याला पाच भाऊ व दोन बहिणी आणि त्यांची मुले असा मोठा परिवार होता. गावी चार भाऊ ,तालुक्याला एक भाऊ राहायचे. माझ्या चारही जावा अशिक्षित, अल्पशिक्षित होत्या .पण मनाने निर्मळ व प्रेमळ होत्या .सर्वांना लहान लहान मुले होती. सर्वजणी घरचे करून शेतावर कामाला जायच्या आहे तेव्हा त्यांची मुले सासुबाई सांभाळायच्या .माझा नवरा आठ भावंडांपैकी सातवा होता.सर्व विवाहित होते फक्त एक दीर अविवाहित होता.
दुपारी जेवणानंतर आम्ही सासुबाई सोबत गप्पा करत बसत असू. तेव्हा माझ्या नवऱ्याला उद्देशून त्या म्हणाल्या, तो शेजारचा गणू गुजरातला कंपनीमध्ये कामाला लागला .तो घरी पैसे पाठवतो आणि तो विठ्या पण त्याच्या सोबतच कामाला आहे. तो ही घरी पैसे पाठवतो. गावातील पोरं सुधारत आहे .आपल्या आईच्या बोलण्यातील रोख माझ्या नवऱ्याला समजला .तो आईला म्हणाला,
तू काळजी करू नको व माझ्याकडे बघून म्हणाला, ही शिकलेली आहे तिला नोकरी लावून दाखवतो की नाही बघ. मग पैसाच पैसा. आई तू काळजी करू नको. सासुबाई काही बोलल्या नाहीत .असेच सात-आठ दिवस गेलेत. भरल्या कुटुंबात मला पण खूप चांगले वाटत होते. मला तिथेच रहावेसे वाटत होते. पण सासुबाई सारख्या म्हणत राहायच्या , येथे राहून कसे चालेल ?तुम्ही शहरात राहणारे शिकले-सवरले, तिथे काही नोकरीचे पहा. इथे काय काम कराल? वगैरे वगैरे .म्हणून आज माझ्या नवऱ्याने शहरात जायचे ठरवले .
आम्ही जायची तयारी केली .जेवणे आटोपली. निरोप द्यायला घरची सर्व मंडळी आली .नवऱ्याला वेगवेगळ्या सूचना देऊ लागले .विशेष म्हणजे माझ्या मोठ्या जावेच्या दोन छोट्या छोट्या मुली या सात आठ दिवसात माझ्या सावलीसारखा सोबत होत्या. एक दोन वर्षाची व दुसरी चार वर्षाची. अतिशय चुणचुणीत मुली. मलाही त्यांचा लळा लागला .जाताना एक म्हणाली,
काकू माझ्यासाठी मोत्याची माळ आणाल. दुसरी म्हणाली ,माझ्यासाठी नेल पेंट व पाटी-पेन्सिल आणाल .मला त्यांचे कौतुक वाटले .खाली वाकून त्यांचे पापे घेतले व नक्की आणेल असे प्रॉमिस केले .त्या खूष झाल्या. माझ्या जावा प्रेमळ नजरेने बघत होत्या. तेवढ्यात बस आली .आम्ही बसमध्ये चढलो.
क्रमशः
वाचत रहा पुढील भाग
आणि कथा तुमच्या मनापर्यंत पोहचत असल्यास नक्की like करा.
तुमचा प्रतिसाद आम्हाला प्रोत्साहन देईल
गुंता कायम.
सुमी ला सगळं माहिती असताना, त्याच्याशी लग्न करण्याचे कसे काय ठरवले ? ही बाब कळली नाही.
समोरच्या भागाची उत्सुकता.. छान लिहिले