११-तृष्णा

११-तृष्णा
बाजूचे काका त्याच्याकडेच येतांना दिसले त्याला.
अमोल
बाबांशी बोललो आताच.त्यांनी खरेदी लवकरात लवकर आटपायला सांगितली.
अमोल काहीच बोलला नाही.
पुढल्या आठवड्यात करु का?
नाही काका.
तुझे बाबाच बोलले तसे.
मी घर न विकायचे ठरवले.
का?
मला राहायचे आहे इथे.
खरेदी झाल्यावरही तू हवे तेवढे दिवस रहा.
मला कायमचेच रहायचे आहे.
काहीतरी एक ठरवा.तुझे बाबा खरेदीची घाई करत आहेत.तू घर विकायचेच नाही म्हणत आहेस.
काका मी बोलतो  बाबांशी.
काका काहीही न बोलता निघून गेले.
अमोलने आईला फोन केला.बाबा आॕफिसमध्ये होते.
अमोली काॕलेजमध्ये.
आईने बोलून झाल्यावर काळजी घे असे बजावत फोन ठेवला.
 अमोलने लावलेली रोपे बघितली. नवीन जागेत रुजली होती आता.तो घरात आला.पूर्ण घराकडे नजर टाकली.
 तृष्णाच्या खाणाखूणा शोधल्या .पण काही खास दिसले नाही.
खोलीत जाऊन कॕसेट लावली.
आईला भेटून आले.दोनच दिवस आईसोबत थांबले.पण पुन्हा एकदा बालपण अनुभवले.तब्येत बरी वाटली आईची.तिला इथे येण्याचा हट्ट केला मी.पण सध्या राजाराणीच्या संसारात नको.नातवंड झाल्यावर  येईल म्हणाली.
मी आईकडे गेल्यावर सखा एखादा फोन करेल असे वाटत होते.पण नाही.त्याला माझी आठवणच आली नसेल.
तृष्णा काहीतरी गुणगुणत होती.
काल संध्याकाळी कवितासोबत नदीवर जायचा विचार केला.पण बाळाला बरे नाही म्हणून आली नाही ती.
मगा मी एकटीच गेली.एकटीला उदास वाटले तिथे.
प्रसन्न वाटायला कुणाचीतरी सोबत हवीच.
मंद वारा वाहत होता.त्याच्यासोबत ती वाहत होती.वारा तिच्या जवळ जाऊन तिच्या कानात काही सांगत असेल का?
थोडावेळ निर्मलेच्या काठी बसली.तिच्या पात्रात पाय सोडले.थंडावा अनुभवला.आणि  परत आले.परत येतांना सखा रस्त्यातच भेटला.सोबतच घरी आलो.मी एकटी गेले याचे त्याला जरा आश्चर्यच वाटले. एकटी कशाला गेली? सांभाळून जात जा. असे म्हणत होता.
त्याच्या बोलण्यात माझी त्याच्यावर जबाबदारी आहे हे जाणवते पण प्रेम? प्रेमाचा ओलावा? जे मला हवे आहे ते नाही जाणवत कधी.
काल  निर्मलेसोबत होती तेव्हा सुचलेली .
वारा बोले नदीला
किती ग झूरतेस सागरासाठी
चल माझ्या सवे
भेटण्या सागरा विरहणी
हर्षभरीत  नदी सागराकडे निघाली
मिलनाची आस होतीच मनी
वाऱ्याच्या गतीने वाट चालू लागली
वाटेत भेटली आभाळाएवढी झाडे
तर काही पायाशी तृणही भेटले
कुठे  ग निघाली सरिते
दोघांनीही विचारले
मी निघाली भेटण्या माझ्या सागराला
येईल परत लवकरच भेटण्या तुम्हा
झाडे आणि  आभाळ हसले विषादाने
नाही येऊ शकणार वापस
तू सोडून सागरास
वेळ गेली नाही अजून
 सांभाळ स्वतःस
आला राग नदीला
काही सांगू नका मला
गती वाढव रे वाऱ्या
वाट बघत असेल सागर
जरा गेली पुढे  आली घंटा ऐकू मंदिराची
झाडावरच्या पक्ष्यांची किलबिलही ऐकली
नदीकिनारी काही मुले
वाळूची घरे बांधत
होती  शैशव जपत
मी परतेन तेव्हा
घर झाले असेल त्यांचे बांधून
 गेली अजून पुढे दिसले डोंगरदऱ्या
बघून त्यांना नदी बोलली
परतीचीही हीच वाट ना वाऱ्या
वारा बोले नदीला
एकदा करतो मी
सावध तुला सरिते
सागराशी मिलन होता.
नाही तुला परतीचा रस्ता
नदी थबकली जरा विसावली
मनी म्हणाली
काय म्हणावे वाऱ्याला
वेठीस धरतो सागराला
निघाली अजून पुढे
गात मिलनाचे गाणे
दिसला सागर नजरेने
बाहू पसरवले त्याने
नदी विरघळली बाहूत त्याच्या
कधी ना आली वापस
मिटवले स्वतःस
मिलनाच्या आशेने
कवितेच्या शेवटच्या चार ओळी म्हणतांना तिच्या डोळ्यात पाणी जमा झाले. ते पुसून ती बोलू लागली.
खरेच नदी सागराच्या मिलनासाठीच वाहत असेल का?
आणि सागर? कित्येक मधूर नद्या त्यात विलीन होत असेल पण हा याचा मधूरपणा सोडत नाही .उलट नदीच खारट बनून त्याच्यात विलीन होते. म्हणजे स्वतःचा गुण सोडून सागराचा अवगुण घ्यावा लागतो तिला.
असे का? नदी स्त्रीचे आणि सागर पुरुषाचे प्रतिनिधित्व करत असेल कदाचित्.
अमोलला आतापर्यंत अल्लड वाटणारी तृष्णा  प्रगल्भ वाटू लागली.
तृष्णासाठी नवीन दिवस उजाडला.
काल सकाळपासून तब्येत बरी नव्हती.सखाला आॕफिसची घाई होती.संध्याकाळी घरी आल्यावर मी तब्येत बरी नसल्याचे त्याला सांगितले.  सखा डाॕक्टरकडे घेऊन गेला.
डाॕक्टरने गोड बातमी दिली.आमही दोघे आईबाबा होणार.
(तृष्णाचा आनंद ओसंडून वाहत होता)
सखा आणि माझे आमचे दोघांचे बाळ कल्पनाही किती मोहक वाटत आहे.सखा पण आनंदात दिसत आहे.माझी काळजी घेत आहे. काल घरी आल्यावर स्वयंपाक सखाने बनवला.आणि आज आॕफिसमध्ये जाण्याआधी माझ्यासाठी जेवण बनवून गेला.
बाळ येण्याआधीच सखा अजून जबाबदार बनला.
तृष्णा थकलेली दिसत होती.
संध्याकाळ झाली. मुक्ताचा व्हिडीओ काॕल आला.
त्याला बघून मुक्ता आनंदली.पण अमोल तिला खूप थकलेला दिसला.
अमोलने तिला तृष्णाचे घर,त्याने लावलेली रोपे दाखवली.
क्रमशः
Previous Part

प्रिय वाचक,तुम्हीही तुमचे साहित्य शब्दपर्णवर प्रकाशित करु शकता.

साईटवर Registration करा किंवा  संपर्क साधा खालील Email वर
शब्दपर्णचे इतर साहित्य वाचण्यासाठी फेसबुक पेज अवश्य like,follow करा.

One comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!