स्मशानभुमी-सत्यकथा
अरविंद सराफ
सेवानिवृत्त पोलीस अधिकारी
स्मशानभुमी चे नाव काढताच फक्त आपणांस अंत्यसंस्कार ज्या ठिकाणी केले जातात त्या स्थळाला स्मशानभुमी म्हणतात एवढेच माहीती असेल….नाही का?….स्मशान हा शब्द निरखून बघा यात शान हा शब्द ताठ मानेने वसलेला आहे.स्वतःची शान आपण ज्या स्थळी अर्पितो ते स्थळ म्हणजे स्मशान.मनुष्य कितीही वाईट असला तरी या ठिकाणी सर्व संस्कारासह त्याचे निर्जीव शरीरास मान दिला जातो हे फक्त आणि फक्त स्मशानभूमीतच होते.या भूमीचा धार्मिक विधी करीता शिवरात्रीला शिवभक्त उपयोग करतात…… पण या जागेचा उपयोग मी एका गंभीर समस्येचे निराकरण करण्याकरीता केला हे वाचल्यावर तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल….तर ऐकताय न तो अनुभव……
माझी नियुक्ती गणेशपेठ पोलीस स्टेशन ला होती….. माझे एक मित्र सुहास मला भेटायला पोलीस स्टेशन ला आलेत… त्यांना सामाजिक कार्याची फारच आवड…त्यांचे सोबत एक तरूण युवक सुध्दा होता..माझ्या मित्राने त्या तरूणाची ओळख करून दिली..सर हे पांडेजी, माझे ओळखीचे आहेत..हे काही दिवसांपूर्वी मला भेटलेत.. मला त्यांनी त्यांची व्यथा सांगीतली. तसा माझ्या मनात तुमचाच विचार आला..मी लगेच पांडेजी ला म्हटले..माझे एक सर पोलीस विभागातील ओळखीचे आहेत त्यांचा आपण सल्ला घेवू ,म्हणून त्यांना मी सोबत घेवून आलो सर…ही सर्व हकीकत माझे मित्र यांनी एका स्वरात श्वास न घेता मला कथन केली…पण नेमकं काम काय? याचा मला काही बोध लागेना…म्हणुन मी माझा मोर्चा पांडेजी कडे वळविला…त्यांना विचारले
तूमचं काम काय आहे ?… माझ्या कडून होणार असेल तर नक्की करेल…त्या इसमाचे चेहऱ्या वरचे भाव मला सांगुन गेलेत की त्यांचा माझ्या वर विश्वास आहे…मी त्यांना धिर देत म्हटले की आजार जर समूळ नष्ट करावयाचा असेल तर डाॅक्टरांना बिमारी न लाजता सांगावी लागते तरच योग्य निदान करता येतं……तसेच समस्या जर सोडवावयाची असेल तर पोलिसांना सत्य सांगावेच लागेल…..तत्क्षणीच पांडेजी म्हणाले…नही सर ऐसी कोई बात नही….कहाँ से सुरू करू समज नही आ रहा…घरकी बात बाहर बताते वक्त बहोत तकलीफ होती है सर…तसे मला कळून चुकले की हा इसम काळजी करणारा वाटतो..मी त्याला म्हटले बिबी की कुछ ?….तसे त्याने लगेच नही– नही सर…जमीन को लेकर थोडा बडे भाई से विवाद छिड गया है.जमीन पापा ने खरीदी थी, लेकीन बडे भैय्या उसपर पूरा कब्जा करना चाहते है….मेरा भी अधिकार है लेकीन वो झगडे पर उतारू होते है.मै नही चाहता भाईयो का झगडा लोगों के लिए तमाशा बन जाये….मी त्यांना कोर्टात जाण्याचा सल्ला दिला…पांडेजी म्हणाले नही सर शांती से सुलझता हो तो देखो….मेरे पापा कहते थे घर का झगडा पुलीस या कोरट तक गया तो तणाव बढता है समस्या सुलझती नही और उलझती है।….त्याने माझी बरीच गयावया केल्याने मी त्यांना ठिक है आपके भाई से मिलके देखते है असा विश्वास दिला…जणु त्याचा भाऊ माझे ऐकणारच होता….पण प्रयत्न करायला काय हरकत… दिलासा दिल्याने ते परत गेले…माझ्या मित्राने ती रात्र कशी काढली हे त्यालाच ठाऊक…जणू दिवस उजडायची तो वाटच बघत होता…
दुसरे दिवशी पहाटेच माझा मित्र माझ्या घरी आला…चला सर आपण बाहेरच चहा घेवू..तो ठरवूनच आला होता की मला सकाळीच त्या पांडेजी च्या घरी न्यायचेच… मी प्रातःविधी आटोपून त्याचे सोबत त्यांचेच गाडीवर जायला निघालो ..पूर्ण रस्त्यात माझ्या मित्रांने सर त्यांचे काम झाले पाहीजे हो.गरीब आहे बिच्चारे ,हे किमान दहा वेळेस म्हटले असेल…आम्ही रामेश्वरी ला त्यांचे घरी पोहचलो…माझ्या मित्राने माझी ओळख करून देताच पांडेजीचे मोठे बंधू म्हणालेत मै पहचानता हूँ सर को…तसा अर्धा गढ सर केल्याचा भाव माझ्या मित्राचे मुखावर मला दिसला…त्या उलट तक्रार घेवून येणारे पांडे चिंतेत दिसलेत..त्यांनी एक प्रश्नात्मक कटाक्ष माझे मित्रा कडे टाकला….चहापाणी नंतर मी लगेच विषयाला हात घातला….दोन्ही भांवडाना भावनात्मक समजावून सांगण्याचा भरपूर निष्फळ प्रयत्न केला….हा प्रश्न येथे सुटणार नाही ..दुसरे कूठे तरी यांना पुन्हा बोलवावे लागेल असा निर्धार माझे मनाने केला..तसाच मी तेथून उठलो..तर दोन्ही भावांनी
सर आप नाराज हुए क्या…बैठो न सर म्हणताच मी त्यांना म्हटले की
कल फिर बैठते है …आणि काही न बोलता मी निघून गेलो व घरी परत आलो….
पोलीस स्टेशन ला जातांना मला वाटेत टिकेकर स्मशानघाट पडतं…मी रोज त्या घाटात जळणारे मृतदेहांना चालत्या गाडीवरून नमस्कार करून पुढे जायचो….त्या दिवशीही मी तेच केले….काही वेळाने पोलीस स्टेशन ला पोहचल्यावर लगेच मी माझ्या मित्राला फोन केला…
.उद्या सकाळी सात वाजता पांडे बंधूना घेवून मोक्षधाम टिकेकर घाटावर पोहचा…तेथे बसून चर्चा करू ….यावर माझ्या मित्राने आश्चर्य व्यक्त केले ? पण…समस्या तर सोडवायची होती तो तयार झाला…कळवितो सर लगेच पांडे बंधूना असे म्हणून त्याने फोन बंद केला….
दुसरे दिवशी मी सकाळी लवकर उठलो.बाहेर जाण्या करीता गाडी काढतांना बायकोचा मधूर स्वर कानावर पडला..आज इतक्या लवकर, सकाळीच ?..युनीफाॅर्म पण नाही घातला ?….काही खाजगी काम आहे काय? तिने आणखी प्रश्न विचारायचे आत मी तिला म्हटलं.. येतो स्मशानातून….कोण गेलं?…. कुणीही गेलेलं नाही…एक काम आहे ते आटोपून येतो लगेच,.
..स्मशानभूमीत काम?
तिला सुध्दा आश्चर्य वाटलं…कदाचित आपला नवरा वेडा झाला की काय? असा प्रश्न तिलाही पडला असेल…पण आणखी वेळ वाया न घालविता मी गाड़ी घेवून टिकेकर मोक्षधाम घाटावर पोहचलो….गाडी पार्क केली….आत गेलो…माझा मित्र व पांडे बंधू अजून आलेले नव्हते….म्हणून आत स्मशानभूमीत गेलो…मला पाहून घाटावरील एक मुलगा माझ्या जवळ आला…मला म्हणाला
सर बाॅडी आणली काय सकाळी सकाळी?..
.मी म्हटले नाही रे..एक काम आहे ,म्हणुन सहज फिरता फिरता आलो..फिरायला.?…. अण तेही घाटावर ?… असा प्रतीप्रश्न करून तो माझ्याकडे आश्चर्याने बघू लागला….मी आपला घाटात फिरताना ओट्यावरील जळणारे मृतदेह व ते पूर्ण जळायला हवेत म्हणून घाटावरील काम करणारे त्या मुलांची कामाप्रती निष्ठा व एकाग्रता बघून मनोमन त्यांचे प्रती आदर व्यक्त करीत होतो….
अचानक पाठीमागुन माझ्या मित्रांचा आवाज आला…सर शुभ प्रभात आम्ही आलो..मी पण त्यांना वंदन केले..पांडे बंधूनी घाटाकडे चोहोबाजुंनी पाहत मला नमस्कार सरजी म्हणून अभिवादन केले….पांडे बंधू मला म्हणाले सर यहां कुछ काम है क्या आपको?मी मान हलवून नाही म्हटले…फिर ?…पांडे जी, ये वो जगह है, जँहा मुझे सकुन मिलता है.जिदंगी की सारी सच्चाई नजर आती है!…आप नही समझोगे!…अगर समजते तो आपस मे लढते ही नही….असे माझे वाक्य ऐकुन ते दोघेही बुचकळ्यात पडले.
दोघांनीही आपली बाजु मांडण्या करीता तोंड उघडताच….मी पांडे बंधूना म्हटले…..आवो मेरे साथ… व त्यांना घेवून त्या स्मशान भूमीतील ओटा क्रमांक चार जवळ थांबलो…त्या ओट्यावर एक मृतदेह जळत होता…व एक मुलगा बांबूने तो मृतदेह पुर्णपणे जळावा म्हणुन प्रयत्नरत होता…मी पांडे बंधू कडे बधून म्हटले….जाणते हो पांडेजी ये किसकी लाश जल रही है ?…तसे पांडे बंधू एकसाथ म्हणाले….नही सर…मी त्यांचे कडे पाहून म्हटले..ये नागपूरके ऐक करोडपती इन्सान थे…कल ही देहांत हुआ इनका..तिन बेटे है…करोडो की जायजाद है इनकी…सब पिछे छोडके परलोक चले गये…और जानते हो पांडेजी, कल इनको अग्नी देने के पश्चात बहोत सारी बाते बोली गयी…इनके गुणगान गाये गये….लेकीन अग्नी देनेके पश्चात थोडे देर के लिए भी यंहा कोई भी रुका नही…ना ही इनकी बिबी..बच्चे..रिश्तेदार..ना ही मित्र परीवार….इनके बच्चोने ये लडके के हाथ में पैसा ठुसकर क्या कहा पता है ? ..हम कल सुबह आयेंगे… पुरा जलाकर रखना… रक्षा और अस्थी भी आपही जमा करके रखना…हम हरीद्वार लेकर जायेंगे….. और जिन्होने अपना सारा जिवन ईन परीवार ,रिश्तेदार ,मित्रमंडळी के लिए नौछावर किया, उस महान पुण्यात्मा को अग्नी देकर इन्हे अकेला छोडकर, इस लडके के हवाले करके चले गये…थोडा वक्त भी यहां नही गुजारा….और जानते हो पांडेजी इस बच्चे ने उन्हे क्या कहा…पैसा नही चाहीये सहाब….सभी रिश्तेदार ऐसा ही छोडकर चले जाते है…बाद मे हम ही इनके रिश्तेदार बनकर इन्हे पूरा जलाते है…आप चिंता ना करो…जावो अपने घर…..लेकीन इस पुण्यात्माने अपना सारा धन उन रिश्तेदारो के नाम पर छोड के चला गया….जो रिश्तेदार इसेके मरने के बाद इस शक्स के पास पलभर बैठे भी नही…अब आप ही बताओ पांडेजी इस पुण्यात्मा का असली रिश्तेदार आप किसे मानते हो ?…जो इसका रिश्तेदार ,सखा भी नही है..वो ही इनकी अंतीम क्षण मे देखभाल कर रहा है….यही जीवनकी सच्चाई है पांडेजी…असे म्हणून मी मृतदेह जाळणार्या मुलाचे पाठीवर थाप मारली व तेथून थोडे दूर जावून चोर नजरेने पांडे बंधू कडे बधत बसलो……
काही वेळाने पांडे बंधू माझे जवळ आले ,ते ओलसर डोळे घेवूनच….सर आपने हमारी आँखे खोल दी….बाबूजी के अंतिम घडी की यादे जागृत हूई…हमारे बाबूजी ने बहोत मेहनत करके वो जमीन बिकत ली थी…हम उसका बटवारा चाहते थे..जो चिज हमारी थी ही नही…हमारे बाबूजी की धरोहर है, उसी के लिए हम आपस मे झगड रहे थे….सर आपने जीवन की सच्चाई बताकर हमारी गलती हमे महसूस करवा दी…आणि दोघेही भाऊ गळ्यात गळा घालून रडू लागलेत…काही वेळ निशब्द शांतता..म्हणतात ना..स्मशान शांतता..तशीच काहीशी…मी शांत नजरेने त्या जळत्या मृतदेहा कडे भान नसल्यागत बघत बसलो होतो..माझा मित्र कृतज्ञ नजरेने माझे कडे बघत होता…..माणूसकीचे दर्शन स्मशानभूमीत सुध्दा घडू शकते.स्मशानभूमी म्हणजे नुसती अंत्यसंस्काराची जागा नसून वास्तविकतेचे दर्शन घडविणारी पुण्यवान भुमी आहे हे आता माझ्या मित्रासह पांडेबंधू व माझ्या बायकोला सुध्दा कळलेले होते…घरी परतल्यावर आंघोळीला पाणी देतांना माझ्या बायकोचे नजरेत माझे प्रती अभिमान झळकतांना मी बघितला…
पुढे पांडे बंधूनी त्या वडीलोपार्जित जमीनीवर एकत्र घर बांधून वास्तूला मला व माझ्या मित्राला बोलवावयाचे ते विसरले नाहीत…मी आणखी एक कुटूंब कमाविले याचे मानसिक समाधान मला मिळाले होते…
- अरविंदस्मित.
शब्दपर्णवरील इतर साहित्य वाचण्यासाठी खालील लिंक बघा
वाह अप्रतिम
धन्यवाद
अंतिम सत्य हेच आहे.
स्मशान चा अर्थ खूप छान.
धन्यवाद