कधी येईल तो क्षण-स्त्री कथा
सुमित्रा झाले नाही का?तुला दोन तास झाले सांगून तरीही तुझे तेच सुजय ओरडला …
आले.. आले..अहो कोणती साडी नेसायची हेच कळत नव्हते शेवटी नेसले बाई बघा बरे कशी दिसते तर? प्रथमच माझ्या आवडीची साडी नेसले मी
दादानी मागच्या भाऊबिजेला घेतली होती. बघा किती सुंदर रंग आहे छान दिसत आहे.
अग बाई तुझ्या माहेरचे पुराण नको सांगू मला चल लवकर.
हे काय..जरा सोबर साडी नेसायची.. या वयात अशा साड्या शोभतात का तुला नेहमीप्रमाणे सुजय ओरडला.
मी मद्रास वरून आणलेली साडी नेस छान रंग आहे तिचा तसे पण आता तुला कोणतीच साडी चांगली नाही दिसत.खाण्यावर ताबा नाही..वजन वाढवून ठेवले…जिद्दी स्वभाव आहे तुझा.कुणाचे ऐकायचं नाही.मनासारखे जगायचे.
जिद्दी स्वभाव ,
सुमित्रा कुत्सितपणे हसली. वेळेवर वाद नको म्हणून निमूटपणे गाडीत बसली.आज पण सुजयच्या आवडीप्रमाणे घडले सर्व काही.
आयुष्यातील सर्व निर्णय तोच तर घेतो.कुठे जायचे?कुठे नाही जायचे.. मी फक्त कठपुतली..फक्त आणि फक्त मान , इच्छा असो किंवा नसो…
बाहेर टिपूर चांदणे किती सुंदर दिसत होते..हे बाहेरचे जग बघायला सुध्दा सुंदर स्वच्छ आंनदी दृष्टी हवी..
सुजयजवळ तर नव्हतीच कधी आणि माझी नजर पण त्याने हक्काने हिरावून घेतली.
आयुष्यातील सर्व गोष्टी मोजून मापून खळखळून हसायला कुठे पैसे लागतात..
सोबर…सोबर करून जगणे बेरंग होऊन गेले.छान फुलाफुलांची साडी घातली तर बिघडते कुठे?खळखळून हसायला सुध्दा यांच्या घरात मुभा नव्हती.थोडा आवाज बाहेर बैठकीत गेला कि झाले.सासरे लगेच आवाज देणार.
.अहो जरा ते हसणे बंद करा.आपल्या वाड्यात असे जोरात हसणे बरे नाही दिसत.
सासूबाईंना या सर्व गोष्टींची सवय झाली होती..त्या हळूच सांगायच्या..
सुमित्रा या घरात हे नियम फक्त बाईला पुरूषांनी मात्र आपल्या मर्जीने जगायचे. खूपदा जाब विचारायची ईच्छा झाली पण आवाज आतच दबून गेला..संसार निभवायचा होता.. दुसरे काय..
आणि तुला खरे सांगू का..या गोष्टींची सवय होत जाते. सुरूवातीला राग येतो..चिडचिड होते मग कोणताच पर्याय दिसत नाही.. हे सर्व स्वीकार करण्या पलिकडे काही दिसत नाही.. तिथेच सार काही संपत.. दर वेळेस मनाला आवर घालण्याची आपसूक सवय लागते..
माझे जाऊ दे ग..पण आता काळ थोडा बदलत चाललेला आहे.. माझा सुजय त्याच्या बाबासारखा नाही वागणार.. शहरात शिकलेला आहे तो.. समजून घेईल ग तुला..
ब्रेकचा आवाज आला.सुमित्रा दचकली. सुजय पेट्रोल भरायला गेला होता…तेवढ्यात फोन वाजला..
बोल ग पिल्लू..अग मी बाबासोबत बाहेर निघाली आहे…
बाबा पेट्रोल भरायला गेले आहेत..
अग आई ..जवळच तुझ्या आवडीची पावभाजी मिळते.. उतरून खाऊन ये…
नाही ग बाई आधीच वजन वाढले म्हणून बाबा चिडतात माझ्यावर.माझ्या आवडीचे पदार्थ खात नाही मी आता. ताबा ठेवते ग जिभेवर.चल आले बाबा.
सासूबाईंना वाटणारा विश्वास फोल ठरला होता. सुजय जरी शहरात शिकला होता तरीही तो पुरूषच.
बायकोचे भावविश्व तिच्या डोळ्यांत असणारे मुग्ध भाव तिच्या भावना त्याला ऊमजतच नाहीत.नेहमीच त्याचा ओझरता सहवास. मला फक्त तुझे प्रेम हवे.दुःखाने व्याकूळ झाल्यवर हळूवार तुझी फुंकर हवी..कधीतरी माझ्या डोळ्यांची भाषा समजून घे.खळखळून हस ..
एखाद्या निरागस मुलासारखा..
मलाही माझे स्वातंत्र्य उपभोगु दे.थकली रे मी आता.
तुझ्या घालून दिलेल्या नियमांचा कंटाळा आला मला.
मुक्त व्हायचे मला या जोखडातून.
रंगबेरंगी साड्या नेसायच्या खळखळनाऱ्या झऱ्यासारखे बेभान वाहत सुटायचे. मुक्त हसायचे.
स्वच्छंदी मनमोकळे जगायचे राहूनच गेले..
फुलासारखे अलगद उमलून आतष्य सुगंधीत करता आलेच नाही. मनासारखे जगणे कधी जमलेच नाही… जगताच आले नाही मला. एक सुरूवात कुठूनतरी करायची
पण केव्हा कधी येईल तो क्षण……
Chan
छान लघुकथा.
खूपसे नवरे आपल्या बायकांना गृहीत धरतात.
खूप मस्त
खूप सुंदर
छान लिहिलं
👌👌👌
Wahh
छानच
सुंदर कथा