ये गलियाँ ये चौबारा, यहाँ आना ना दोबारा
Smita Aurangabadkar
संतोष आनंद जी यांच्या “हृदय स्पर्शी आणि अर्थपूर्ण शब्दांना” लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी सुंदर आणि कायम स्वरूपी स्मरणात राहील असे संगीत या गाण्याला बहाल केले. सोबत
लताजींची खूपच भावनात्मक गायनाची साथ मिळाली आहे
पडद्यावर गाणे साकारणारी गुणी अभिनेत्री पद्मिनी
कोल्हापूरे नी या गीता वर अल्लड अंदाजात आपल्या मैत्रिणी सोबत नृत्य केले आहे
शो मॅन राजकपूरजी दिग्दर्शित
एक खूप सुंदर वेगळ्या अंदाजातील विधवा विवाहास प्राधान्य देणारी एक आगळी वेगळी प्रमे कहाणी…. “प्रेमरोग” प्रेक्षकांना विचार करण्यास भाग पाडणारी प्रेमकथा प्रदर्शित केली आहे खुपच सुंदर चित्रपट आहे.
त्यातील पात्रांचा साधेपणा वस्तुस्थिती दर्शवणारे एक विधवे चे जीवन यातना सहन करणारे तर आहेच पण आपल्याच लोकांकडून किती टोकाची अवहेलना सहन करावी लागते… अशा आशयाचे कथानक… जनतेच्या स्मरणात राहील असे संगीत लताजींची गायकी किती सुंदर संयोजन आहे हे.
हे गीत कितीही वेळा ऐकले तरीही ऐकतच रहावेसे वाटते.
या गीतातील एकेक ओळ एकेक शब्द जीवनातील सत्यता वर्तवते. खरोखरच या गीताची हृदयस्पर्शी गीतरचना/ शब्दरचना मनाला स्पर्शून जाते.
चित्रपट : प्रेम रोग (1982)
संगीत : लक्ष्मीकांत-प्यारेलाल
गीतकार : संतोष आनंद
गायिका : लता मंगेशकर
ये गलियाँ ये चौबारा, यहाँ आना न दोबारा l
अब हम तो भए परदेसी, के तेरा यहाँ कोई नहीं l
ले जा रँग-बिरंगी यादें, हँसने रोने की बुनियादें l
अब हम तो…!
मेरे हाथों में भरी-भरी चूड़ियाँ, मुझे भा गई हरी हरी चूड़ियाँ l
देख मिलती हैं तेरी-मेरी चूड़ियाँ, तेरे जैसी सहेली मेरी चूड़ियाँ l
तूने पीसी वो मेहँदी रँग लाई, मेरी गोरी हथेली रचाई l
तेरी आँख क्यों लाडो भर आई, तेरे घर भी बजेगी शहनाई l
सावन में बादल से कहना, परदेस में मेरी बहना l
अब हम तो भए.…!
आ माँ मिल ले गले, चले हम ससुराल चले l
तेरे आँगन में अपना, बस बचपन छोड़ चले l
कल भी सूरज निकलेगा, कल भी पंछी गाएंगे l
सब तुझको दिखाई देंगे, पर हम न नज़र आएंगे l
आँचल में संजो लेना हमको, सपनों में बुला लेना हमको l
अब हम तो भए…!
देख तू ना हमें भुलाना, माना दूर हमें है जाना l
मेरी अल्हड़ सी अठखेलियां, सदा पलकों बीच बसाना l
जब बजने लगे बाजे गाजे, जब लगने लगे खाली-खाली l
उस दम तू इतना समझना, मेरी डोली उठी है फूलों वाली l
थोड़े दिन के ये नाते थे, कभी हँसते थे गाते थे l
अब हम तो भए…!
सखी या आपल्या रस्त्यावर, या आपल्या गल्लीत, या घरी पुन्हा येऊ नकोस आता आम्ही तुमच्यासाठी बाहेरचे झालो आहे, परके बनलो आहेत. बघ ना सखी मी येथून गेल्यावर सासुरवाशीण होईल तुझ्यासाठी इथे कोणीही आपले नाही. खरंच ग सखी तुझ्यासाठी इथे आपलेसे वाटणारे कोणीही नाही…
सखी आपण आतापर्यंत जे काही दिवस सोबत घालवले ते स्मरणात राहील अशा अविस्मरणीय आठवणी, सर्व रंग- बिरंगी खुशीचे टिपलेले क्षण सर्व सुखा-दुःखाच्या, हसण्या-रडण्याच्या रंग-बिरंगी आठवणी जे ही सोबत घालवलेले क्षण आहेत ते सर्व घेवून जा…
अग बघ ना प्रिय सखी माझ्या हातातील हिरव्या बांगड्या आणि तुझ्या हातातील हिरव्या बांगड्या सारख्याच आहेत. आणि हातात घातलेला हातभर हिरवा चुडा मला खुपच आवडला आहे किती शोभुन दिसतोय न आपल्या नाजुक हातावर… तु जशी माझी सखी आहेस ना, या माझ्या हिरव्या बांगड्या देखील माझ्या प्रिय आहेत..
वाह! तुम्ही चुरडलेली मेहंदी बघ ना, या माझ्या गोऱ्या-गोऱ्या नाजुक हातावर रचलेली सुरेख मेहेंदी किती गडद रंग चढला…हे माझे मेहेंदी ने सजलेले हात किती शोभुन दिसते आहे न.
अरेच्छा!
लाडो तुझ्या डोळ्यात अश्रू का आले?
सखी माझ्या दारात जसे वाजंत्री वाजवत आहेत ना तसेच तुझ्याही घरी वाजंत्री वाजेल … एक दिवस तुझे सुध्दा लग्नं होईल …
आणि हो पावसाळ्यात ढंगाना सांगशील बहीण आता परदेशी झाली. सासरी गेली आहे. लगेचच पावसांच्या सरी सोबत खेळतांना च्या आठवणी ताज्या होतील.
पद्मिनी कोल्हापूरे आईला बिलगून म्हणते, मायी मला पोटशी घे… मला तुझ्या कुशीत शिरून राहू दे ना. मी आता माझ्या सासरी जात आहे.
पण मायी मी माझे अल्लडपण तुझ्या अंगणातच सोडून चालले आहे… बघ न उद्या देखील सुर्य उगवेल, उद्या देखील पक्षी ची गोड किलबिल ऐकु येईल, सर्व जण तुला आज जसे दिसत आहे ना तसेच उद्या देखील दिसतील
पण!
मायी फक्त तुझी लाडो… मी नाही दिसणार तुला. मायी तुझ्या हृदयाशी कवटाळून घे ग मला आणि हो तुझ्या स्वप्नात मला बोलवायला विसरू नकोस.. जरी मी तुझ्यापासून दुर गेली ना, तु आम्हाला दिसत नसली, तरी माझ्या सर्व अल्लड, अवखळ आठवणी तुझ्या मनात, तुझ्या नजरेत जिवंत ठेवशील.
जेव्हा तुला हे सर्व जग रिकामे वाटेल, सुनेसुने वाटेल तेव्हा तु हे समजुन घेशील की फुलांनी सजलेली डोली तुझ्या घराच्या दारातून आता उठणार आहे.
प्रत्येक लेकीला सासरी जावेच लागते ना मायी ही तर जगाचीच रित! म्हणून मायी हे सर्व नाते थोड्या दिवसांसाठी तर असतात कधी हसवणारे कधी रडवणारे सर्व क्षण भुतकाळ होणारे तर असतात…
Happy Birthday Lata didi
प्रिय वाचक,तुम्हीही तुमचे साहित्य शब्दपर्णवर प्रकाशित करु शकता.
शब्दपर्णवरील इतर साहित्य वाचण्यासाठी खालील लिंक बघा
छान लिहिले
खुप छान
अप्रतिम रसग्रहण