मनु भंडारींनी लिहिलेल्या कथेवर आधारित १९७४ साली आलेला सिनेमा रजनीगंधा.
नायिका दीपा आणि (विद्या सिन्हा) नायक निशीथचा ब्रेकअप झालेला. नंतर तिच्या आयुष्यात रजनीगंधाची फुले घेऊन संजय (अमोल पालेकर) येतो. संजयच्या प्रेमात पडल्यानंतर ती निशीथला विसरण्याचा प्रयत्न करते.
पण मन? ते तयार होते का विसरायला?
योगायोगाने निशीथ पुन्हा दीपाच्या आयुष्यात येतो.
त्याच्याशी भेटीगाठी वाढल्यानंतर तिचे मन दोलायमान होते.
संजय कि निशीथ?
निशीथकडे झूकायला लागलेले मन नियंत्रणात कसे आणणार?
गीतरचना योगेशजींची आणि स्वरसाज चढवला आहे सलिल चौधरींनी.
मुकेशने गायलेले हे गीत साधे,सरळ,मधूर आणि मनाची चंचलता सांगणारे आहे.
मन चंचल आहे. ते कुणाला दिसत नसले तरी आपल्या संपूर्ण आयुष्यावर फक्त त्याचीच हुकूमत चालते. कधी अचल तर कधी वाऱ्यासारखे वाहणाऱ्या मनामुळे हे योग्य कि ते योग्य याचा निर्णय होत नाही. शेवटी तो निर्णयही मन घेईल तेव्हा आणि मन ठरवेल तसाच असतो.
खूपदा असे होते मन नियंत्रणात आले असे म्हणता म्हणता मन आपल्याला दगा देते.त्याची सीमारेषा तो कधी तोडेल सांगता येत नाही.
अपूर्ण इच्छा,अनोळखी आशा ….चंचल मन सतत तिकडे धाव घेते.
ह्या गाण्यात नायिका दीपा संभ्रमित आहे.
जीवनाच्या प्रवासात दोन सहचर तिला भेटले. एक सोडून गेला. दुसरा आयुष्यात आला.पण मन पहिल्याकडे धावत आहे.असे का होते?
जीवनात काही हसरे ,आनंदाचे क्षण दोघांनीही दिले. मनाने त्या त्या वेळी टिपलेले ते क्षण मनात आजही रुंजी घालत आहेत.
मन आयुष्यात आलेले नवे क्षण सोडून पुन्हा जुन्याकडे वळत आहे.
त्याच्यावर घातलेली मर्यादा ओलांडून ते पुढे जायला बघत आहे.
हा संभ्रम कसा दूर करणार? मनाला समजवायचे कसे? कुणाला विसरु?कुणासोबत जीवनाचा पुढील प्रवास करु?
दीपाचे मन दोन्हीकडे ओढ घेत आहे.गाण्यात तिच्या आयुष्यात येणारे दोन्ही नायक दाखविले आहे,निशीथ तिच्यासोबत आहे. पण तरी नियंत्रणात नसलेल्या मनात संजय एकदोनदा डोकावून जातोच.
कई बार यूँ भी देखा है
ये जो मन की सीमा रेखा है
मन तोड़ने लगता है
अनजानी प्यास के पीछे
अनजानी आस के पीछे
मन दौड़ने लगता है
राहों में, राहों में, जीवन की राहों में
जो खिले हैं फूल, फूल मुस्कुरा के
कौन सा फूल चुरा के
रखूँ लूँ मन में सज़ा के
कई बार यूँ भी…
जानूँ ना, जानूँ ना, उलझन ये जानूँ ना
सुलझाऊँ कैसे कुछ समझ ना पाऊँ
किसको मीत बनाऊँ
किसकी प्रीत भुलाऊँ
कई बार यूँ भी…
प्रिती….