Rajanigandha phool tumhare mere- song review in marathi
Rajanigandha phool tumhare mere- song review in marathi

Rajanigandha phool tumhare mere- song review in marathi

प्रेम आणि फूल ..
गजब च समीकरण …
नाही का?..
प्रेमा चा प्रत्येक प्रसंग फूलांवर पेलवल्या जातो ,,,
मागणी घालण असो, रुसवा असो , का मनधरणी असो … फूलांची एक एक पाकळी उगवत ,उमलत,बहरत आपल कर्तव्य बजावत असते ..आणि प्रीत अंगण बहरत असते. फोफावत असत.

फूलांच्या गंधकोषांतुन दरवळणार हे प्रेम विलक्षण असते.अगदी देवा वरच्या श्रद्धे परी ..

“मानस पूजा” साठी हवी तेवढी निरनिराळी फूलें जमवावी ,लखलख आरास मांडावी .. हवी तेवढी साजसज्जा करावी,आणि सर्वार्थाने समर्पित होऊन भाव मग्न पूजा करावी …तस…..हे प्रेम ..सर्वस्व व्यापून टाकणार, तनामना समवेत आयुष्य सुगंधी सुगंधी करणार ….
त्या प्रेमा ला सोबत असते ती
ह्या फूलांच्या मखमली पाकळ्यांची..
चित्त हेलकावणाऱ्या मादक गंधाची….
मग तो पुष्प राज गुलाब असो .,रातराणी असो ..
,का बहरणारी जाई असो …

शब्द रुपात गुंफल्या जाऊन गीत रुपात रसिकांच्या ह्दयात विसावली आहे रुंजी घालत आहे ..
सीने सृष्टि वर तर हुकमी अधिराज्य गाजवणारी (हिंदी ..मराठी)आहेत ही फूले ..
.त्यातीलच एक फूल “निशीगंध”

जो हिंदीत”” रजनीगंधा”” संबोधल्या जातो..
सुरेख गुच्छ स्वरुपातील हे फार टणक फूल असत ..हळुवार एकएक कळी उमलवुन आपल अस्तित्व टिकवु पहाणार..
1974 साली हिंदी चित्रपट “रजनीगंधा” आला होता .उत्कृष्ट अशी प्रेम कथा होतीही. रेखीव आणि सालस सौंदर्यसम्राज्ञी “विद्या सिन्हा” ..आणि लाजरा बुजरा “अमोल पालेकर ” हि जोडी प्रेक्षणीय ठरली होती ..फिल्म फेयर अवार्ड ने अधोरेखीत ह्या फिल्म ला संगीत कार “सलिल चौधरी” ह्यांनी सुमधुर संगीत साज चढवला होता ..अति उत्तम अशी गीते गीतकार “योगेश” ह्यांनी लिहिली होती..अर्थातच या अर्थपूर्ण शब्दांना,
मनचितवन करणार्या संगीताला ..गाण कोकीळा “लता दिदि “ह्यांनी स्वर देऊन एक विशिष्ट उंची बहाल केली होती..आजता गायत ती गाणी रसिक श्रोत्यांना खिळवून ठेवते..
त्यातीलच एक हे प्रणय गीत होत….

…..रजनी गंधा फूल तुम्हारे ,
महके युँही जीवन मे
हाँ…युँ हि महके प्रीत पिया की
.मेरे अनुरागी मन मे….
नायिके च्या मनातील हळुवार प्रेम भावना प्रदर्शित करणार हे सुंदर आणि सुरेल गीत…
रुसलेल्या नायिकेला आवडणाऱ्या निशीगंधांच्या फूलांनी मनधरणी करणारा नायक आठवतो नी ती प्रणया च्या भाव विश्वात रमते, हरवुन जाते …मनात विचार करत हे गाण गुणगुणते.

तु दिलेल्या ह्या फूलांचा गुच्छ ह्याची दरवळ..ह्यानी माझ आयुष्य असच सुगंधी राहो …सख्या तुझ्या प्रीती ची मोहर माझ्या मनी अनुरागी होवो..हि श्वासांची आवर्तने ह्या ह्दयी चे त्या ह्दयी पोहचत राहो.

…अधिकार ये जबसे साजन का,
हर धडकन पर माना मैने
मै जबसे उनके साथ बंधी
यह भेद तभी जाना मैने
कितना सुख है बंधन मे…..

सख्या तुझ्या प्रेमा ची साक्ष पटली, आणि माझ्या संपूर्ण आयुष्य वेढावुन गेल रे तुझ्या अधिकारानी..तुझ्या शी एकरुप झाल्या वर कळल कि मी फक्त तुझी आहे ..हा जो प्रेमा चा वेढा आहे, हे बंधन न्हवे ,हा तर सोनेरी कवच आहे ,ज्यात मी सुरक्षित आहै …

हर पल मेरी इन आँखों में
बस रहते हैं सपने उनके
मन कहता है मै रंगो की
इक प्यार भरी बदरी बनके
बरसुँ उनके आँगन मे……
क्षण अन क्षण माझ्या वास्तवात तुझाच वासआहे.
जळी स्थळी काष्टी पाषाणी मज तुच दिसतो ,भासतो. उघड्या डोळ्यातील दिवास्वप्न ,आणि मिटलेल्या पापणी तील गोजीरवाणे आभास झाला आहेस तु .. मला वाटत मी ही प्रणय भावनेने भरलेला भरगच्च ढग व्हाव आणि तुझ्या अंगणी बरसाव . अर्थात माझा मनी च प्रेम तुझ्या मनी पेराव … नभ कवेत घेऊन दोघांनी ..रजनी गंधा सम दरवळाव .

you tube channel

वर हे गीत सरिता बायस्कर यांच्या सुमधुर आवाजात ऐकू शकता

https://youtu.be/OiGsOAmFfGs

9 Comments

  1. Mohini

    सरिता ताई, अप्रतिम समीक्षण केले सोबत सुमधुर स्वर, दुग्ध शर्करा योग.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!