वटपौर्णिमा
वटपौर्णिमा

वटपौर्णिमा

वटपौर्णिमा

हो !, आज लवकर आवरा , मला वडाला जायचे पुजेला’. ‘नको जाऊ तु पुजेला , नको करू उपवास ‘.
‘ का नको जाऊ ? का नको करू उपवास?’
‘अजुन किती जन्म तुला ह्योच नवरा पाहिजे ? कंटाळा नाही का आला माझ्या सोबत ? चेंज नको का तुला ?पुढच्या जन्मी ‘.
‘मला विचारशील तर मला तर हवाय चेंज ‘.
‘खरंच की , काय हरकत आहे चेंज करायला ‘.

मोहिनीची चेंजला मान्यता पाहून शैलेशला मनातुन हायसं वाटलं असणार.
पण आपण कोण ठरवणार . ठरवणार तो ब्रह्मदेव.
‘ पण एक मात्र नक्की,  जोडी तर हीच राहणार आणि चेंज पण मिळणार’.
‘ हे दोन्ही कसे शक्य आहे ? काहीतरीच तुझं ‘.
‘ ऐका ना ! मी सांगते तुम्हाला चेंज कसा तो. पुढल्या जन्मी मी शैलेश आणि तुम्ही मोहिनी व्हायचं ‘.
‘काय ssss ‘?
‘मग काय तर जोडी पण कायम आणि चेंज पण ‘.
‘भारीच हो तुझं सुपीक डोकं ‘.
पण शैलेशला हे मान्य असेल नसेल.  त्याच्या चेहऱ्यावर तिला काही जाणवलं नाही .
तिने मात्र निर्धार पक्का केला होता .
कोणताच पुरुष सहजासहजी स्त्रीचा जन्म घ्यायला तयार होणार नाही . पुढल्या जन्मी आधीच्या जन्माचं काही आठवत नसते तरीही.
‘ ठरलं तर मग पुढच्या जन्मी तुम्ही मोहिनी… मी शैलेश. जगुन तर बघा एकदा मोहिनी,  एक स्त्री,  एक भावना, एक संवेदना, देवाची एक कलाकृती ‘.
समजून घ्या तिच्या भावना. जाणून घ्या तिच्या समस्या. उपभोगून बघा तिचं आईत्व ममत्व.
मुलगी असताना आई-वडिलांबद्दलची माया. पत्नी असतानाचे प्रेम.
एकदा बघा तर.
त्यानिमित्ताने मलाही तुमचं जीवन जगता येईल.
पुरुषांची जबाबदारी , कर्तव्य , संसाराची ओढाताण, कुटुंबाला सुखी करण्यासाठीची धडपड . मला ही जाणता येईल’.
‘ त्यासाठी एक मात्र व्हावे लागेल,  तुमच्या आधी मला “जावं” लागेल.  तरच मला आधी जन्म घेता येईल.  तरच मला शैलेश होता येईल’.
पण……. पण……
शैलेश तेव्हातरी कुठे ‘ हो ‘  म्हणाला होता आणि ब्रह्मदेवाला माझं शैलेश आणि शैलेशच  मोहिनी होणं मान्य नव्हतं.
कदाचित मागच्या जन्मी मोहिनीनी अशीच अर्धवट साथ सोडली असेल म्हणुन त्यांनी अशी परतफेड केली असावी.

मोहिनी राजे पाटनुरकर

प्रिय वाचक,तुम्हीही तुमचे साहित्य शब्दपर्णवर प्रकाशित करु शकता.
Email
whatsapp no,
9867408400
शब्दपर्णवर  इतर साहित्य वाचा पुढील लिंकवर
विविध सिनेमांचे समीक्षण वाचण्यासाठी खालील लिंक बघा.

https://marathi.shabdaparna.in/सिनेमा

https://marathi.shabdaparna.in/प्रेमकथा

शब्दपर्णचे इतर साहित्य वाचण्यासाठी फेसबुक पेज अवश्य like,follow करा.

 

23 Comments

      1. Dr Satish S Chapadgaonkar

        Speechless….. Very excellent concept. Everyone should stop and think about it. You have touched the Heart with very soft petals of words. Irrespective of pain in relationship… It’s very Nice writeup.

  1. Meenal Balgarkashi

    नियतीच्या मनातले जाणले कोणी, आपण केवळ त्या विधात्याच्या हातातील खेळणं 😢😢😢

  2. Madhavi Joshi

    नियती पुढे आपलं काहीही चालत नाही . आपण फक्त स्वतः ला धीर देऊ शकतो .

  3. Manjusha Vishwas Deshmukh

    शब्द च् नाहीत
    तु अस काही लिहिलेस की शैलेश मला आवर्जून पाठवायचा .
    पण तु खुप छान लिहितेस .

  4. डॉ सुधा खडकेकर

    मोहिनी खूप ह्दयस्पर्शी लिहितेस तू.. लिहित जा शैलेशला तुझ्या लिहिण्याच्या आवडीचा प्रचंड अभिमान होता तू काही लिहिलं कि आवर्जुन पाठवायचा.. अशीच लिहित जा..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!