६ आभास हा छळतो मला.
संध्याकाळ झाली शाश्वतला संपदाने फोनवरच थोडक्यात सगळे सांगितले होते. शाश्वत आला आणि तिघेही मानसच्या घराकडे निघाले.
मानस प्रसिद्ध चित्रकार होता.त्याचा पत्ता मिळणे अवघड गेले नाही.
मानसचे घर जरा शहराबाहेरच होते. बंगला होता त्याचा.आजूबाजूने गर्द झाडी होती.बाहेरुन बंगला बघितला तरी कलावंताचा बंगला आहे हे लक्षात येत होते.बंगल्याच्या भिंतीवर विलोभनीय चित्रे रंगवली होती.
तिघेही बंगल्याच्या फाटकात पोहचली.फाटकातच चौकीदार होता. संपदाने चौकीदाराला सांगितले ,
मी सुखदाची बहिण आहे.मानस ओळखतात तिला.आम्हाला तातडीने त्यांना भेटायचे आहे.
चौकीदार म्हणाला,
ठीक आहे.मी निरोप देतो तुमचा.
तो निरोप द्यायला गेला आणि लगेच बाहेर आला. आणि म्हणाला,
साहेब तर सुखदाला ओळखत नाहीत असे म्हणाले.
संपदाने चौकीदाराला विनवणी केली आम्हाला त्यांना भेटणे आवश्यक आहे असे सांगितले.चौकीदार पुन्हा आत गेला आणि मानसची परवानगी घेऊन आला.
तिघेही बंगल्याच्या आत गेले.आत शिरतांनाच एका जोडप्याचा मोठ्ठा फोटो लावून होता.तो नक्कीच मानस आणि त्याच्या पत्नीचा असणार.
समोर मानस उभा होता.
या.बसा.
दुपारी सहसा मी कुणाला भेटत नाही.पण तुम्हाला काही महत्वाचे काम आहे असे समजले.
बोला.
तिघेही घामाघूम होऊन बसले. नौकराने पाण्याचे पेले समोरच्या टीपाॕयवर आणून ठेवले.
विषय कसा काढायचा ह्याच विचारात होते तिघेही.
शेवटी शाश्वतनेच बोलायला सुरुवात केली.
चित्रकार मानस,ही माझी पत्नी संपदा आणि हे सासरे.
नमस्कार काका.
माझी मेहूणी आहे सुखदा.आम्ही तिच्यासाठीच इथे आलो…
हो का? चित्रकलेची आवड आहे का तिला? मग तिला आणायचे कि सोबत.
आता मात्र मनोहररावांचा संयम संपू लागला.
ते बोलले,
चित्रकार मानस, हे काय नाटक चालवलयं तुम्ही.
सुखदा माझी लेक. तुम्ही तिच्या आणि ती तुमच्या प्रेमात पडली म्हणून आम्ही तुम्हाला भेटायला आलो तर तुम्ही चक्क तिची ओळख दाखवायलाही तयार नाही.
बसलेले मानस खाड्कन उभे झाले.
हे बघा काका तुम्ही वयाने मोठे आहात म्हणून मी काही बोलत नाही .या तुम्ही आता.
शाश्वतने बाबांना थांबवले.संपदा मानसला म्हणाली,
चित्रकार मानस आमचे जरा शांतपणे ऐकून घ्या.Please, अहो,खरचं सुखदा वेडी झाली आहे तुमच्या प्रेमात.
ताई तुम्ही म्हणताय ते खरे असेलही पण खूप मुली माझ्या कलेच्या प्रेमात पडतात. त्याला मी काय करु?
अहो तिचे एकतर्फी प्रेम असते तर आम्ही आलोही नसतो तुमच्याकडे पण ….पण ती सांगतेय कि तुम्हीही तिच्या….
पुरे ताई,बस्स. हा समोरचा फोटो बघा.ही माझी बायको आणि हा इथे टेबलवर ठेवलेला फोटो बघा ती माझी मुलगी आहे. मला माझ्या घरात येऊन असले बाष्कळ प्रश्न विचारण्याची तुमची हिंमत तरी कशी झाली?
आता मनोहरराव खूप चिडले.
माझ्या निष्पाप,साध्याभोळ्या मुलीला फसवताय तुम्ही. चला शाश्वत, संपदा अशा लोकांना पोलिसातच द्यायला हवे.
असे म्हणत रागातच मनोहरराव बाहेर पडले.त्यांच्या मागोमाग शाश्वत आणि संपदाही बाहेर आले
क्रमशः
आभास…पुढील भाग वाचा खालील लिंकवर
प्रिय वाचक,तुम्हीही तुमचे साहित्य शब्दपर्णवर प्रकाशित करु शकता.
साईटवर Registration करा किंवा संपर्क साधा खालील Email वर
शब्दपर्णचे इतर साहित्य वाचण्यासाठी फेसबुक पेज अवश्य like,follow करा.
शब्दपर्णवरील इतर साहित्य वाचण्यासाठी खालील लिंक बघा
वाह👌
पुढील भागाची चुटपूट लागलीय