Marathi beautiful kavita-सरिता बायस्कर
Marathi beautiful kavita-सरिता बायस्कर

Marathi beautiful kavita-सरिता बायस्कर

Marathi beautiful kavita-सरिता बायस्कर
व-हाडी कथा,लघुकथा ,कविता लिखाण करणाऱ्या सरिता बायस्कर यांच्या काही कविता.त्यांनी  काही कवितांचे ,व-हाडी कथांचे You tube वर सुंदर
सादरीकरण केले आहे.

त्यांच्या लिंकखाली दिल्या आहेत.

ईश स्मरण-भक्तिगीत

मराठी कविता-सरिता बायस्कर

मंगल प्रभात……
गजानन आले माझा दारी…
दर्शन देण्या क्रष्ण मुरारी
त्रिभुवन त्रिपुरी……
मज वर त्यांची
कृपा द्रुष्टी
हिरवऴ ल्याली
सगऴी सृष्टी
ध्यानी तुझीया
परिमऴ सौख्य
जीव जीवाशी रमले…….

आले माझा दारी गजानन
अज्ञानी मन
पामर वेडे
मोहमाये चे
त्या वर पगडे
चरणीतुझीया या मना ला
मुक्ती मोक्ष लाभले…….
आले माझा दारी…..
.गजानन…आले
माझा दारी…..
गण…गण…गणात बोते….

.

उन्मत्त वारं- फूल कविता

वाऱ्याने  काबीज केले
कोवऴ्या कऴी चे मन
कऴी कऴीही उमलली
फुलांचे सांगणे झुगारून
कऴ्याकऴ्यांची होता फुले…..
अविरत रमुन  वाऱ्यासंगे डोले……
अल्प समयी चा सुखा ची ओढ…..
त्याला विरह आणी दुख्खा ची जोड…..
कोमेजले ते लावण्यमयी फूल…..
पडले ते सर्व स्वप्न मलूल……
गऴून एकएक फूलांची पाकऴी ……
संपले अस्तित्व त्या मनसुमनांचे…..
गंधाऴलेली दरवऴ घेउन
वारा हिंडतोय चहुकडे
फुलणाऱ्या प्रत्येक कऴी वर
नव्याने त्याची नजर पडे…

आरसा मनाचा

आयुष्या चा कठिण समयी
सर्वांनी नाकारतांना…
हेटाऴणी करतांना
मनास अपुरेपण वाटले
धैर्य सुटले ..
मन गहिवरले .
चहुकडे
अंधारे घन दाटले
जेव्हा
घाबरला जीव एकांताला
निमित्त
नव्हते जगण्याला
तेव्हां……..तेव्हां
तुच आरश्या
तेव्हां
हे आरश्या
तुच मला पुकारले
तुच मला स्वीकारले
ढासऴल्या या मनास माझा
तुच असे कुरवाऴले
मी हसता
हसने तुझे
अश्रु ढाऴता
पुसणे तुझे….
प्रत्येक प्रसंगी पुढ्यात माझा
उभा ठाकला बिंब होऊनी
जगता यावे सजग होऊनी
तुच. असे समजावले
आरश्या तुच मला
पुकारले कुरवाऴले
समजावले स्वीकारले..

ही कविता ऐकण्यासाठी खालील ही कविता ऐकण्यासाठी खालील YOU TUBE लिंक बघा

https://youtu.be/LyCc94rwaTc

 

उनाड पाऊस

उनाड पाऊस बरसत येतो.
झोंबतो या हळव्या मनाला
किती बरसतो व्याकुऴ करतो
काय झाले या पावस घनाला
लबाड कसा.झुरवतो जीवा
न कऴत छऴतो बघ या देहा
चिंब नाहतो हा देह सारा..
अलगद स्पर्शतो गार वारा
कसा आवरू भावनेचा पसारा
मानस न लाभे निवांत निवारा
बरसत्या ओल्या टपोर सरींनी…
एक अनामिक ऊर ओढीनी..
शहारे बघ रे मम गात्र
नसे तरी शील मनी कण मात्र
आठवते., आठवते ते सार सार
क्षण मोहरलेला नी ते उन्मत्त वार
सऴसळते ती विरह वेदना
गळुन पडे त्या भावभावना ….
बोथडल्या रे स्नेह संवे्दना
नूरे मनात या कोवळी कामना
तु तर नेमाने येतो दर वर्षी
भिजवुन जातो पुन्हा पुन्हा
उरतो ,मागे उरतो केवळ
ओसाड आणी कोरडेपणा
हिरवळ आठवता प्रेमा ची
आठवती त्या साऱ्या खुणा
गहिवर दाटुन य़ेई मजला
अश्रु येई दोन्ही नयना
जरा ही का रे भीत नाहीस तु
ह्या भाव शुन्य विंश्वाला
प्रेम विखारी ,,प्रेम विषारी म्हणत
हे जग जगु देत का कुणाला
फांदी वरील दोन पाखर ही
खुपतात या निष्ठुर जगाला
खडा मारुनी उडवुन लावितसे
ते प्रीती आतुर त्या जोड्याला……

 

दाह —मराठी ग़ज़ल

दिवाणगी दिला ची ,सांगु कशी कळेना
हा दाह अंतरी चा शब्दात मांडवेना

मज का कुणास ठाऊक रितेरितेच वाटे
एकांत हा मनाचा ,सोसुन साहवेना..
.
रोमरोमी तरळे तरहा प्रीती ची न्यारी
विरहात मात्र मजला हा मोह टाळवेना

 

रामराम मंडई

काय माय करोना …
काय माय करोना
जो तो सांगते
ये करोना वो करोना
कपाट पायते व
केविलवान्या डोयान
आता तुले नाई हुरुप
मोट्टी आवरे नेमान
त्याले काय सांगु बैना
लाकडाऊन ची दैना
सरच बंद
सपसेल बंद
न लगन ना पंगत
ना सन ना वार
संपलीच समदी गंमत
दिस असे आले बेकार
काही बाही येते
बैना इपरितच मनात
कुटीकुटी लक्ष द्याव
कायकाय ठेवाव ध्यानात
कटायला जीव बाई
या नादुरुस्त वक्ताले
पांडुरंगा तु च वाचव
तुया या भक्र्ताले.
बुहारा करोना च
वाटोळ होउ दे देवा
उतेल मातेल समदे
करतीन तुहि सेवा
कयली कसी केली ते
निसर्गा ची धुईधान
पाय तुच आता
समदे राखतेत कस इमान
यक डाव देवा
देऊन टाक माफी
घालव हे अवकया
जगन होवु दे सोपी…..

 

 

सर्वधर्मसमभाव

विविधतेने नटलेला
भारत माझा देश
संस्कृती दरवळ
भिन्न् भिन्न जरी
लेऊनी गंध विशेष
अभंग ओठी मानवतेचे
ह्दयी दुजा न भाव
.भुमाते ची सर्व लेकरे
ठेवामनी समभाव
कर्म वर्ण अन जाती वैविध्य
माणूसकीचा धर्म् वैशिष्ठ
राम म्हणा रहिम म्हणा
अनेक पुकारा नाव
भूमाते ची सर्व लेकरे
ठेवा मनी सम भाव
धर्म पांगळा इथे न कुठला
कुणी न दुबळा कुणी न सुटला
एकमेका साह्य करुनीया
ज्ञानज्योती ची कास धरुनीया
भवसागरी वादळात नेऊ
मानवतेची नाव
भुमातेची सर्व लेकरे
ठेवा मनी समभाव
तरी माणसा माणूस रहा तु
माणुसकी जपुनी
धर्म ग्रंथतत्व न आचरी
व्यर्थ जीणे वाचुनी
अध्यात्मा चा स्पर्श ह्दयी न
देवा म्हणती पाव
भुमाते ची सर्व लेकरे
ठेवा मनी सम भाव
संत संगती ठेवा अपुला
विज्ञानाशी सांगड घालु
नव्या युगाचे नवीन लेणे
नवेलोण अन नीती पुकारु
सार्थकतेची ध्वजा फडकवु
वसवु या मानवते चे गाव
भुमाते ची सर्व लेकरे
ठेवा मनी समभाव…

 

काव्याचे सादरीकरण बघण्यासाठी  आमची YOU TUBE ची खालील लिंक बघा.

https://youtu.be/246roB3IN2g

 

 

शामलाक्षरी काव्य

‘नाद’ वेणु चा मधुर
भासे चहुफेर मनी
‘नाद’ जडला कृष्णा
बावरली रे मानिनी
‘माया’आली तुज वर
आसुसली बघ काया
‘माया’ वाटे अर्थहीन
तव माये विन जगाया
‘राग’ मनी धरु नको
कृष्णप्रिया राधे चा ह्या
‘राग’ मारवा गाऊ रे
सुरावटी च्या संगे या
‘घन’ गर्दनीळी प्रभा
‘घन’दाट सावल्या
आठवणींच्या नभा
‘श्याम’ भावला मनी
प्रीत दाटली नयनी
‘श्याम’ रंग लोपविता
धवल छटा जीवनी….
वाट दिसे वैकुंठा ची
मज नयनी मधुसुदना.
ओढ अंतरी सम्मती ची
वाट पाहे मधुमिलना

ह्या शामलाक्षरी काव्याचे सादरीकरण बघण्यासाठी  आमची YOU TUBE ची खालील लिंक बघा.

 

https://youtu.be/sR8TngOmPPM

 

सरण

का सरण रचावे
आपुले
आपण
उगा मनाने
थकताना
पूरुन उरावे या
जगताला
आपुले स्वत्व
जपताना
प्रमाण पाण्या सम
वहावे
गंतव्या स जाताना
खाचखऴगे येती
वाटे
अडथळ्यांची शर्यत
दाटे
पण प्रवाहास विराम
नसे ..
नसे दुर ते ध्येय तुझ्यात
जर
मनस्वीते चा ध्यास
वसे
हिरवळ द्यावी नियती ला….
आणि उधऴून न्यावे
दुःखाला  …..
संकटा स तोंड द्यावे….
आमंत्रणे धाडावी
सुख्खाला
दैवी देण जीण सतत
स्मरावे
अमूल्य जीवन
जगताना……….

 

हि कविता ऐकण्यासाठी खालील लिंक बघा

ttps://youtu.be/tZxILBYP6Zs

प्रिय वाचक,तुम्हीही तुमचे साहित्य शब्दपर्णवर प्रकाशित करु शकता.
Email
whatsapp no,
9867408400
शब्दपर्णचे इतर साहित्य वाचण्यासाठी फेसबुक पेज अवश्य like,follow करा.

शब्दपर्णवरील इतर साहित्य वाचण्यासाठी खालील लिंक बघा

 

 

2 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!