निंबोणीच्या झाडामागे- मराठी अंगाई गीत
सौ. दर्शना भुरे..
बाळा गाऊ कशी अंगाई ..१९७७ मध्ये प्रदर्शित झालेला चित्रपट…
वसंत हा वैद्यकीय अभ्यासक्रमाचे शिक्षण घेण्यासाठी माधुरीच्या घरी राहत असतो. माधुरी आणि वसंत बालपणापासून चे सोबती.. साध्यासुध्या, घरेलू माधुरीला वसंत मनोमनी आवडत असतो..पण वसंतचे बेळगावला शिकत असताना अलकावर प्रेम जडते. आणि तो अलकासोबत लग्न करतो.. त्याला तिच्यापासून मुल होते.
फॅशनेबल आई अलका मुलाच काहीच करत नाही.. त्यामुळे
त्याचा सर्व सांभाळ माधुरीच करते.. माधुरी एक दिवस मुलाला घेऊन गॅलरीत उभी असताना तिच्या हातून मुल निसटून जमीनीवर खाली पडून मरण पावते.. पोटचे मुल मरण पावलेले पाहून अलकाला मानसिक धक्का बसतो.. ती वेडी होते.. घडलेल्या या सर्व प्रकारामध्ये माधुरी स्वत;ला दोषी मानून अलकाला सुधारण्याचे ठरविते आणि घाईघाईने श्रीधर नावाच्या माणसाशी लग्न करते व स्वतः चे मुल तिच्या कुशीत टाकते.. कुशीत बाळ बघून अलका पुर्ववत होते. पण घरी पाळण्यात आपले बाळ दिसत नाही आहे. हे पाहून माधुरीचा नवरा तिला घरातून हाकलून लावतो. वसंत अलका ला तिचे मुल मरण पावले असून तुझ्या जवळील हे मुल तुझे नसून माधुरीचे आहे हे सत्य सांगतो.. पण तोपर्यंत
माधुरी अपघातात मरण पावलेली असते..
मेल्यानंतर माधुरी चा आत्मा तिच्या पोटच्या मुलासाठी घुटमळतो
व येवून मुलाला खेळवतो, अंगाई गातो, सांभाळतो..
निंबोणीच्या झाडामागे…
मातृत्वाने ओतप्रोत असे शब्द असलेले…
अंगाई गीत ऐकून आपली प्रत्येक पीढी लहानाची मोठी झाली..आजही निंबोणीच्या झाडामागे..ऐकताना आपल्याला आईच्या कुशीत शिरल्यासारखे वाटते..अभिनेत्री आशा काळे हिने आईच्या मनातील बाळाविषयीच्या प्रेमळ भावना तिच्या सहज, सोज्वळ अभिनयाने या गीतातून व्यक्त केल्या आहेत..प्रत्येक मराठी घरातून नवजात बाळाच्या बारशाच्या वेळी गायले जाणारे हे अंगाईगीत ..
आपल्या सुमधुर आवाजात गायिका सुमन कल्याणपूर यांनी अजरामर केले..
एका अलग दुनियेत घेऊन जाणारे हे जादुई अंगाई गीत प्रत्येक पिढीतील आई, आजी आपल्या नटखट मुलाला, नातवाला ऐकवते..
निंबोणीच्या झाडामागे चंद्र झोपला गं बाई…
आज माझ्या पाडसाला झोप का गं येत नाही..
बाळा चंद्र ही थकून भागून निंबोणीच्या झाडामागे झोपी गेला
.पण तू अजूनही जागीच आहे..
आता तरी झोपी जा..
गाय झोपली गोठयात, घरटयात चिऊताई…
परसात वेलीवर झोपल्या गं जाई जुई
मिट पाकळ्या डोळ्यांच्या, गाते तुला मी अंगाई…
गाय तिच्या गोठ्यात झोपली.. चिऊ ताई तिच्या घरट्यात..
जाई जुई सुध्दा अंगणात आपापल्या वेलींवर गाढ झोपून गेल्या.. तू सुद्धा माझे अंगाई गीत ऐकून तुझ्या इवल्याशा डोळ्यांच्या पाकळ्या मिटून घे ..
देवकी नसे मी बाळा, भाग्य यशोदेचे भाळी…
तुझे दुःख घेण्यासाठी, केली पदराची झोळी..
जगावेगळी ही ममता, जगावेगळी अंगाई …
माझे नि तुझे नाते कृष्ण आणि यशोदेसारखे आहे.मी तुला जन्म जरी दिला नाही तरी यशोदेसारखाच तुझा सांभाळ केला आहे… तुझे सारे दु:ख माझ्या पदरात घेण्यासाठी मी पदराची झोळी केली आहे..
गीतकार…मधुसूदन कालेलकर ..
संगीतकार.. एन पी दत्ता..
गाण्याचे बोल.. निंबोणीच्या झाडामागे..
चित्रपटाचे नाव… बाळा गाऊ कशी अंगाई. ..
गायिका.. सुमन कल्याणपूर..
कलाकार.. विक्रम गोखले, आशा काळे, नयनतारा…
शब्दपर्णवरील इतर साहित्य वाचण्यासाठी खालील लिंक बघा
मातृत्वाचे आर्त स्वर छान रेखाटले
Wahh
सुंदर रसग्रहण